Bhor Education Society

Bhor Education Society Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Bhor Education Society, Elementary School, BHOR, Pune.

मनःपूर्वक अभिनंदन !💐
08/06/2025

मनःपूर्वक अभिनंदन !💐

मनःपूर्वक अभिनंदन !💐      भोर तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या भोर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरो...
05/06/2025

मनःपूर्वक अभिनंदन !💐

भोर तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्था असलेल्या भोर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या प्रक्रियेत बिनविरोध निवडूण आलेल्या सभासदांच्या पार पडलेल्या सभेत नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. 1897 साली स्थापण झालेली ही संस्था शतकोत्तर रौप्यमहोत्सव पार करून दिमाखदार वाटचाल करत आहे. अशा या शैक्षणिक क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेल्या संस्थेमध्ये कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून *श्रीमंत राजेशराजे पंतसचिव *यांची तर उपाध्यक्षपदी *श्री. मधुकर पैठणकर*, *श्री. अरविंद गुजर*, * श्री. बाळकृष्ण देव*,* श्री. प्रफुल्ल आंबेकर*, * श्री. धनंजय आंबवले*, *श्री. महादेव मळेकर*यांची एकमताने निवड झाली. नियामक मंडळाच्या चेअरमन पदी उत्तम कार्य केलेल्या *प्रमोदशेठ गुजर*यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. व्हा. चेअरमन म्हणून तालुक्यातील जेष्ठ विधीतज्ञ *अॅडव्होकेट श्री. मुकुंद तांबेकर* यांची तर सचिव पदी जेष्ठ संचालक *डॉ. सुरेश गोरेगावकर* यांची निवड करण्यात आली. सर्व कार्यकारी मंडळ व नियामक मंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन!

02/11/2024
सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !😊
26/10/2024

सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा !😊

भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांत...
18/10/2024

भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमांतर्गत "lपुणे जिल्हास्तरावरविद्यालयाचा "प्रथम क्रमांक" आला. विद्यालयाच्या यशस्वी परंपरेत मानाचा आणखी एक तुरा...

२ हजार विद्यार्थ्यानी गायले सामूहिक राष्ट्रगीत भोर दि.१७       शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ...
17/08/2022

२ हजार विद्यार्थ्यानी गायले सामूहिक राष्ट्रगीत

भोर दि.१७
शहरातील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २ हजार विद्यार्थ्यानी आज (दि.१७) तहसीलदार कार्यालय परिसरातील राजवाडा चौकात प्रांत राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील,सचिव विकास मांढरे,प्राचार्य दीपक शिवतरे,गजानन झगडे यांचे प्रमुख उपस्थितीत सामूहिक राष्ट्रगीत गायले असून भारत माता की जय,वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
राज्यशासनाने (दि १६ )काढलेल्या आदेशानुसार शहरासह तालुक्यातील सर्वच शाळा,महाविद्यालय,प्रांत कार्यालयासह,
तहसीलदार कार्यालय ,पंचायत समिती,नगरपालिका तसेच सर्व शासकीय कार्यालयामध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायले गेल्याचे पहावयास मिळाले.याप्रसंगी राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी क्रांतीकारकांसह राष्ट्र पुरुषांच्या व्यक्तिरेखा असलेला चित्ररथ फेरी शहरातून काढल्याने सामूहिक राष्ट्रगीतापूर्वी सुंदर वातावरण निर्मिती झाल्याचे पहावयास मिळाले.राजवाडा चौकात चित्ररथ फेरी येताच उपस्थित नागरिकांसह विद्यार्थांनी राष्ट्रगीत म्हटले.याप्रसंगी प्राताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार सचिन पाटील,नायब तहसीलदार आजिनाथ उजागरे यांना भेट वस्तू देवून गौरविण्यात आले.यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🇮🇳आज १५ ऑगस्ट !🇮🇳        भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली.या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा...
15/08/2022

🇮🇳आज १५ ऑगस्ट !🇮🇳
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे पूर्ण झाली.या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत.विद्यालयात नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर सचिव विकास मांढरे यांचे उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाला.अत्यंत उत्साहपूर्ण मंगलमय वातावरणात पावसाचे थेंब अंगावर घेत स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला.विद्यालयाचे प्राचार्य दीपक शिवतरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थितांना स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यालयातील ध्वजारोहणासह राजवाडा चौकातील शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाची काही क्षणचित्रे !

मशाल फेरी !      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर,सचिव विकास मांढरे यांच्या म...
14/08/2022

मशाल फेरी !
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नियामक मंडळ अध्यक्ष प्रमोद गुजर,सचिव विकास मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१४ ऑगस्ट २२ रोजी भोर शहरातून मशाल फेरी काढण्यात आली.यावेळी प्राचार्य दीपक शिवतरे,उपमुख्याध्यापक घोडके डी के,पर्यवेक्षक कडू संजय,शरद जाधव ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण काम आज पूर्ण !
13/08/2022

मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण काम आज पूर्ण !

Address

BHOR
Pune
412206

Telephone

+912113222568

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhor Education Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share