प्रिय मित्रांनो,
आज शनिवार दिनांक २३ जूलै २०२२ सायंकाळी ६ पासुन शाळेत वाद्यदुरुस्ती करीता भेटायचे आहे आणि
*सोमवार दिनांक २५ जूलै सायंकाळी ६:३० वाजता सरावाचा शूभारंभ होईल!*
नवीन सभासद नोंदणी मंगळवार दिनांक २६ जूलै पासून सूरू होईल.
भेटुयात लवकरच फर्शीच्या चौकात!
रमणबाग युवा मंच (ट्रस्ट), पुणे
मंगल मूर्ती मोरया ।।
New english school ramanbaug
PROUD TO Be RAMANBAUGIYA This page is for all current and past guys.
ताशाच्या काडीला...थापीचे उत्तर...
जल्लोशाच्या धुंदीत वादनाची परंपरा निरंतर
याच परंपरेचे पाईक असणार्या आपणा सर्वांना यंदाच्या सरावासाठी हे सस्नेह निमंत्रण....
स्थळ:- तेच (फरशीचे मैदान)
वेळ:- तीच जीची आपण सर्वच जण आतुरतेने वाट पाहातोय (सायं ६ते ९)
दिनांक:- पंचमी श्रावण शके १९३७ (१९ आॅगस्ट)
रमणबाग युवा मंच
परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
झाली का तयारी?
14/03/2014
दिनांक१५ मार्च २०१४ रोजी संध्याकाळी ६ वाजता,
आपल्या शाळेने माजी विद्यार्थी महामेळावा आयोजित
केलाआहे. या दिवशी आपली उपस्थिती अनिवार्य आहे.
त्यासाठी माजी विद्यार्थी महासंघाची स्थापना करण्याचे
ठरविले आहे. याप्रसंगी आपल्या शाळेतील
काही माजी विद्यार्थ्यांनी शाळेची वेब-साईट तयार
केलेली आहे तरी आपण या साईट वर जाउन आपले नाव रजिस्टर
करावे आणि आपल्या शाळेच्या या उपक्रमास सहकार्य करावे
आणि आपल्या संपर्कात
असलेल्या मित्रांना सुद्धा यासंबंधी माहिती द्यावी.
कार्यक्रम आणि वेब साईट रजिस्ट्रेशन नि:शुल्क आहे. http://
www.ramanbaugmvms.org/
आणि अखेर रमणबाग ऊतीर्ण झाल
प्रेक्षकांच्या परिक्षेत.नाटक किती भारी झाले हे श्री.पुरंदरे
सरांच्या अश्रुतूनच कळाले.सरांच्या कल्पनेला सर्व
क्षिक्षक,विद्यार्थी-विद्यार्थीनी,सेवक,वसर्व रमणबाग
परिवाराने न्याय दिला.व नाटक लई भारी म्हणत
प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.. आता सगळे वाट बघतायत
नवा विक्रम झाल्याची घोषणा होण्याची.....आण
ि तो व्हावी अशी तर सर्व रमणबागीयांची ईच्छा आहे...
10/10/2013
आपली भाषा- ढोल ताशा
आत्तापर्यंत टी-शर्टसाठी उत्तम प्रतिसाद मिळालाय.. असाच मिळत
रहो ही बाप्पा चरणी प्रार्थना..
ज्यांना ती-शर्ट हवे असतील त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क
साधावा..
(आपले नाव - साइज़ आणि किती शर्ट्स हवेत ते सांगावे)
सूरज झोरे - ८००७६७७७७९
विनायक बेलोसे - ९८५०८८७४३२
राहुल बुलबुले - ९७६२४५८४७३
21/09/2013
वादकांनो आपल्या टी-शर्ट ची किंमत ३३० रुपये आहे.........
ज्यांना टी-शर्ट हवे असतील त्यांनी खालील व्यक्तींशी संपर्क करावा...
सुरज झोरे - पाटील -८००७६७७७७९
विनायक बेलोसे -९८५०८८७४३२
राहुल बुलबुले - ९७६२४५८४७३
टी-शर्ट संख्या आणि माप द्या ......
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the school
Telephone
Address
Shaniwar Peth
Pune
411030