RSM Girls High School

RSM Girls High School RSM Girls High School Pune

‘माझी रेणुका’"माझी शाळा" म्हटलं की आठवतं आपल्या म.ए.सो.च्या (मुलींच्या भावे हायस्कूल) रेणुका स्वरूपमध्ये घेतलेलं दहावी –...
16/11/2017

‘माझी रेणुका’
"माझी शाळा" म्हटलं की आठवतं आपल्या म.ए.सो.च्या (मुलींच्या भावे हायस्कूल) रेणुका स्वरूपमध्ये घेतलेलं दहावी – बारावीपर्यंतचं शिक्षण!
शाळेतली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा त्याचबरोबर कुलपध्दती, क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा, वाद्यवृंद , मिस रेणुका स्पर्धा, पी.जी.एस.एस.ए. चं विजेतेपद आणि चिंचेच्या झाडाजवळ मोठ्ठ्यानं दिलेल्या आरोळ्या .......
यातूनच मिळाला आत्मविश्वास आणि झाला नेतृत्व गुणांचा तसंच व्यक्तिमत्वाचा विकास ! आज समाजात यशस्वी स्त्री म्हणून आपल्याला मिळालेली ओळख ! या सर्वांचं मूळ आहे आपल्याच ‘रेणुके’त.....
मैत्रिणींनो, आज ८१ वर्षानंतरही आपली शाळा दिमाखात उभी आहे. एकविसाव्या शतकातली आव्हानं पेलताना, शाळेला ओढ लागली आहे तुमच्या सार्थ भेटीची!
शाळेतली शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखण्यासाठी शाळेतल्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास, ई- क्लासरूम, डिजीटलायझेशन आता अनिवार्य ठरलं आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी तिच्या सर्व रेणुका सदैव पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत याची शाळेला खात्री आहे.
शाळेने साद दिली की माजी विद्यार्थिनींकडून "प्रतिसाद" मिळतोच!
त्यासाठी एकत्र येण्याची मात्र गरज आहे. म्हणूनच स्वरमयी संध्याकाळ अनुभवण्याच्या निमित्ताने शनिवार, दि. २५ नोव्हेंबर १७ रोजी सायंकाळी ५ ते ९ यावेळात आपल्या मैत्रिणींना ! बाल मित्रांना !! आणि शिक्षकांना भेटा !!!
तेव्हा न विसरता आपला वेळ राखून ठेवा ... २५ नोव्हे.१७ ची संध्याकाळ ... जी तुमच्या रेणुकेसाठी खरोखरच ‘अर्थपूर्ण’ ठरेल!

21/08/2015

Address

Pune
411030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when RSM Girls High School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category