09/01/2026
*🌸 भावपूर्ण श्रद्धांजली !🌸*
*काही माणसं रोज भेटतात…*
*गप्पा होतात…*
*हसणं-बोलणं होतं…*
*आणि अचानक एक दिवस कळतं —*
*ती भेटच शेवटची होती...*
*श्री. महेन्द्र कांबळे सर यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने झालेले निधन ही आमच्यासाठी अत्यंत वेदनादायक आणि मन सुन्न करणारी घटना आहे. हे दुःख शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे.*
*१९९७ -९८ साली ते जेव्हा शाळेत नोकरीसाठी आले होते, तेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू घेण्याचा योग मला आला. त्या पहिल्याच भेटीत त्यांच्या डोळ्यांतून झळकणारी प्रामाणिकता, नम्रता आणि शिक्षकी पेशाबद्दलची तळमळ आजही ताजी आहे. त्या दिवसापासून ते अखेरच्या क्षणापर्यंत ते एक जबाबदार, मनापासून शिकवणारे आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे शिक्षक म्हणून कायम लक्षात राहतील.*
*ते रोज भेटायचे, आपुलकीने गप्पा मारायचे, मनमोकळेपणाने संवाद साधायचे. ज्या दिवशी ते आपल्यातून निघून गेले, त्याच दिवशी सकाळीही आमची भेट झाली होती—सामान्य गप्पा, हसू, नेहमीसारखाच तो दिवस… आणि काही तासांतच ते कायमचे निघून जातील, याची कुणालाही कल्पना नव्हती. ही जाणीव आजही मनाला अस्वस्थ करून जाते.*
*वय अवघे ५३/५४… अजून खूप काही करायचं होतं, द्यायचं होतं. त्यांचा अनुभव, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांची माणुसकी यांची उणीव संस्था, विद्यार्थी आणि आम्हा सर्वांना कायम जाणवत राहील.*
*कांबळे सर, तुम्ही शरीराने आमच्यातून गेलात असाल, पण तुमचं काम, तुमची आठवण आणि तुमचा सहवास आमच्या मनात सदैव जिवंत राहील.*
*ईश्वर तुमच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो आणि तुमच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याचे सामर्थ्य देवो.*
*संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या सर्व विभागांतर्फे आपणास भावपूर्ण श्रद्धांजली.*
🌸🌸🙏🏻🙏🏻🙏🏻🌸🌸
*विनायक लक्ष्मीकांत जांभोरकर*
*संस्कृत विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक बंधु-भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, अभिनव बालक मंदिरम्, ब्र. पंडित दत्तमहाराज धुंडिराज महाराज कविश्वर संस्कृत पाठशाळा, विद्या विकास विद्यालय (प्राथमिक विभाग), विद्या विकास विद्यालय प्रशाला (माध्यमिक विभाग), संस्कृत विद्या मंदिर क्रीडा संकुल.*