19/04/2026
✨ अभिव्यक्ती प्रात्यक्षिक ✨
शके १९४८ / सन २०२६
🎭🎨🎤🎹✒️🎨🎭
🙏🏻आग्रहाचे निमंत्रण!🙏🏻
येताय ना!
Jnana Prabodhini in Marathi means Awakener of Knowledge. As long as the urge to change the society is there, other details prove to be of less significance.
‘‘Motivating Intelligence’, according to Jnana Prabodhini, is an universal theme cutting economic, social, religious, or ideological differences. In fact, Jnana Prabodhini realizes that changing our society is a Herculean task and what is perhaps needed is a ‘meeting of minds’, thinking minds who want to change things for better.
19/04/2026
✨ अभिव्यक्ती प्रात्यक्षिक ✨
शके १९४८ / सन २०२६
🎭🎨🎤🎹✒️🎨🎭
🙏🏻आग्रहाचे निमंत्रण!🙏🏻
येताय ना!
16/04/2026
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
इ. १० वी शालान्त निर्णय
🌷 चि. अथर्व भिडे ९८ % गुण मिळवून सन २०२५-२६ च्या तुकडीमध्ये प्रथम आला.
📍परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी - ८०
📍उत्तीर्ण विद्यार्थी - ८०
📍शालेय सरासरी (सर्व विद्यार्थ्यांच्या टक्क्यांची सरासरी) - ९०.५%
📍९५% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - २५
📍९०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ५६
📍८०% पेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी - ७३
विषयश: पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी
📍संस्कृत- १०० पैकी १०० - २९
📍गणित - १०० पैकी १०० - १
📍विज्ञान - १०० पैकी १०० - २
विषयश: सरासरी -
📍संस्कृत – ९७%
📍सामाजिक अध्ययन – ८९.८७%
📍विज्ञान – ८८.२६%
📍इंग्रजी - ९२.२३ %
📍गणित – ८५.१६%
गुणानुक्रमे पहिले ५ विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
१. अथर्व भिडे
२. आर्य देशपांडे, निनाद गोखले, सर्वज्ञ सरोदे,
३. अरायना जाधव, अनुश्री पाठक, निनाद गोडबोले
४. अभिजात वाळंबे
५ तेजस खोत
08/02/2026
सौर दिनांक १८ माघ १९४७ म्हणजे ७ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता आठवीतील युवकांचा vidyavrat संस्कार समारंभ संपन्न झाला. या प्रसंगी गणित प्राध्यापक श्री. श्रीराम चौथाईवाले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थी आणि उपस्थित पालकांनी व्यक्तिमत्व विकासासाठी विद्याव्रत स्वीकारण्याची प्रक्रिया समजावून घेतली. युक्ताहारविहार, इंद्रियसंयमन, दैनंदिन उपासना, स्वाध्याय-प्रवचन, सद्गुरुसेवा, राष्ट्रअर्चना ही सहा व्रते स्वीकारून त्यांचे पालन करण्याचा तसेच ब्रह्मचर्यव्रत व त्याचे यमनियम याचे पालन करण्याचा निश्चय विद्यार्थ्यांनी केला.
त्याचे प्रतीक म्हणून आचार्य मिलिंद नाईक यांच्याकडून व्रतचिन्ह स्वीकारून धारण केले.
त्यानंतर उपप्राचार्या मा. मुकुलिका थत्ते यांनी विद्याव्रताचे महत्त्व विषद केले. "रूप पालटू देशाचे" हे भव्य स्वप्न साकार होण्यासाठीची स्वयंप्रेरणा जागृत होणे, स्वयंमूल्यमापन, विकासाची प्रक्रिया, संकल्पशक्ती आणि सातत्य अत्यंत महत्वाचे असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्याव्रत घेतलेल्या अथर्व जुवेकर, अक्षज चिपळूणकर, तेजस मोघे, व या पूर्वी असे व्रत घेतलेल्या शौर्य नाईक, अनिश एकबोटे, आमोद अरगडे या विद्यार्थ्यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करणारी मनोगते व्यक्त केली.
त्यानंतर पालकांनी देखील मनोगत व्यक्त केले. विद्याव्रत म्हणजे सुपरपॉवर, विवेक बुद्धी, दीर्घकालीन जडणघडण विश्वास असे मत पालकांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुण्यांनी माघ महिना समर्थ रामदास स्वामी यांचे, दासनवमी, गणेश, विष्णू, सूर्य उपासना यांचे महत्त्व सांगतो, असे त्यांनी सांगितले.
आळस हा शत्रू आहे त्यापासून सावध रहा, आपल्या अभ्यासाच्या विषयाचा ध्यास घ्या, भारतीय ज्ञान परंपरा जाणून घ्या याचा असे ते म्हणाले. संख्यांचे सृजन आणि शून्य ह्या संकल्पना भारताने दिल्या. खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट,पौधायन भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त याची महती सांगितली.आणि ह्या परंपरांचा सखोल अभ्यास करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
मा. संचालक गिरीशराव यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास करून त्यात भर घालावी असे मत व्यक्त करून आभारप्रदर्शन केले.
08/02/2026
सौर १९ माघ, १९४७, रविवार दि ८ फेब्रुवारी २०२६ रोजी युवतींचा विद्याव्रत संस्कार समारंभ झाला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रुबी हॉलमधील अतिदक्षता विभागाच्या संस्थापक-संचालक आणि माजी पालक डॉ प्राची साठे या उपस्थित होत्या.
उपासनेनंतर सभा झाली. सभेचे प्रास्ताविक प्रा. मुकुलिकाताई थत्ते यांनी केले. स्वतःला ओळखण्याची सुरुवात म्हणजे विद्याव्रत संस्कार असे सांगून त्यांनी या संस्काराचे महत्त्व विषद केले.
आठवीतील सिया देशपांडे (वर्षभराची प्रक्रिया), अन्विता अवधूत (सज्जनगडावरील विद्याव्रत शिबिर), नववीतील सई लिमये (संकल्पपूर्तीचे अनुभव), दहावीतील रमा चव्हाण (विद्याव्रत संस्कार संकल्प आणि दहावी) या विद्यार्थिनींनीची मनोगते झाली. प्रज्ञाताईने युवतींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना विद्याव्रताच्या छोट्या संकल्पांपासून तृतीय प्रतिज्ञेपर्यंतचा प्रवास मांडला.
गार्गीचे बाबा राहुल पाटील यांनी पालक म्हणून आम्हाला काय वाटलं आणि पालक म्हणून काही अपेक्षा मांडल्या. एका आजोबा पालकांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. अन्विता अवधूतच्या आईने अन्विताचा आतापर्यंतचा प्रवास सांगितला.
डॉ प्राची साठे यांनी त्यांच्या शालेय वयात घेतलेले स्वरूपवर्धिनी, युवती दल येथील अनुभव, पालक म्हणून ज्ञान प्रबोधिनीतले अनुभव सांगितले. आत्मविश्वास, आत्मभान, खरं सौंदर्य, ‘वर्क लाईफ बॅलन्स’, वेगवेगळ्या क्षेत्रातील करिअर निवडताना कसा विचार करायचा इ वैविध्यपूर्ण विषयांवर मुलींशी संवाद साधला. ‘प्राप्तकाल हा विशाल भूदल, सुंदर लेणी त्यात खोदा । निजनामे त्यावरती नोंदा…॥’ असे सांगून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
समारोप करताना मा. संचालकांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
06/02/2026
Pariksha Pe Charcha- 2026
Students of Jnana Prabodhini Prashala watching the live telecast of "Pariksha Pe Charcha", an interactive programme with Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi.
26/01/2026
७७ वा प्रजासत्ताक दिन
२६ जानेवारी २६, सौर ३ माघ १९४७
मा. प्राचार्य, प्र. पाहुणे प्र. के. घाणेकर, संकेत दादा भंडारी आणि अनुज दादा भारद्वाज, विद्यार्थी आणि इतर सदस्यांच्या उपस्थितीत मा. संचालकांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यानिमित्ताने मोठ्या गटासाठी ‘पर्यावरण आणि आर्थिक विकास’ या विषयावर संकेत दादा भंडारी आणि अनुज दादा भारद्वाज यांचे व्याख्यान झाले.
छत्तीसगड अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने बैलाडिला खाणीसंदर्भात तेथील स्थानिक लोक, विकास आणि पर्यावरण या त्रिसूत्रांवर त्यांनी मांडणी केली.
बैलाडिला खाण १४ डोंगरांच्या
परिसरात आहे. खनिज तेल, दगडी कोळसा ही तिथली महत्त्वाची खनिजं आहेत. 3000 कोटी कर इथून सरकारला मिळतो.
विकासाचा विचार करताना या खाणींमुळे तिथे रस्ते निर्मिती झाली, स्थानिक लोकांसाठी रोजगार निर्मिती झाली, अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, लोकांचे जीवनमान सुधारले, हा पट सुरुवातीला संकेत दादांनी मांडला.
या खाणकामामुळे पर्यावरणाला किती हानी पोचली याचा आलेख छत्तीसगडचे भौगोलिक महत्त्व सांगून अनुज दादानी मांडला. खूप मोठ्या प्रमाणावर याभागात जंगलतोड झाली आहे. खोदकाम करताना लावलेल्या स्फोटक गोष्टींमुळे प्रचंड प्रमाणात ध्वनी प्रदूषण आणि त्यातून उठणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषणही मोठ्या प्रमाणात झाले. मानवाच्या उत्क्रांतीच्या साक्षीदार असणाऱ्या अनेक वनस्पती त्यामुळे नामशेष झाल्या. पारंपरिक वनौषधी नष्ट झाल्या. सरकारी नियम धाब्यावर बसवून खाणकाम/खोदकाम आजही तिथे जोरात सुरू आहे. छत्तीसगडचा हा भाग ‘टायगर कॉरिडॉर’ म्हणून प्रसिद्ध आहे, त्यालाही या वृक्षतोडीमुळे छेद बसत आहे. शिवाय तिथली नदीही पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे आरोग्याचेही गंभीर प्रश्न त्या भागात निर्माण झाले आहेत.
विकास पर्यावरण या मुद्द्यानंतर संकेत दादांनी स्थानिक लोकांची नाराजी, त्यांच्या श्रद्धेला बाधा शिवाय स्थानिक राजकारण याकडेही लक्ष वेधले. ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार प्रत्येकाने आपली मागणी विवेकाने केली पाहिजे. कुठलाही विकास प्रकल्प हा पाच दहा वर्षाचा असतो. पण त्यामुळे पर्यावरणावर दूरगामी नकारात्मक परिणाम होतात. आणि
पर्यावरण पूर्ववत होण्यासाठी शतकानुशतकं लागतात, याचे भान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक आहे.
ही परिस्थिती बदलण्यासाठी काही कल्पक उपाययोजना कराव्या लागतील.
26/01/2026
दिनांक - २६ जानेवारी २०२६
७७ वा प्रजासत्ताक दिन
व्याख्यान - ५ वी ते ७ वी
व्याख्याते - प्रा. प्र. के. घाणेकर
व्याख्यान विषय - शिवरायांनी केलेली दुर्गनिर्मिती
कार्यक्रमाची सुरुवात ७ वी मुलींनी गायलेल्या 'आज प्रचिती द्या ' या पद्याने झाली. प्रा. श्रेयश दादा यांनी प्रस्तावना व घाणेकर सरांचा परिचय करून दिला.
प्रा. घाणेकर सरांनी व्याख्यानात गडकिल्ले आणि शिवरायांचं अतूट नातं स्पष्ट केलं. ज्या किल्ल्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळते तेव्हा त्यात काय वेगळेपण आहे, महाराष्टातील किल्ले आणि उत्तरेकडील / दक्षिणेकडील आलिशान किल्ले अशी तुलना सर्वांसमोर मांडली. महाराष्ट्रातील किल्ले बांधणी रचनेमध्ये खूप वैविध्य आहे. कारण जगभरातील अनेक सत्ताधीशांनी आपल्या पद्धतीने किल्ले बांधले आहेत. शिवरायांनी बांधलेले किल्ले आणि परकियांनी बांधलेले किल्ले यात सहज फरक करता येतो. जुन्या काळच्या साहित्यात किल्ल्यांचा उल्लेख येतो. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांबद्दल विस्तृत मांडणी केली. किल्ले राजगड निर्मिती आणि त्याचा अनेकांनी केलेला गौरव सांगितला. शिवरायांनी युद्ध तंत्र म्हणून अतिशय दूरदृष्टी ठेवून प्रदेश संरक्षणार्थ, नियोजन बद्ध किल्ल्यांची रचना कशी केली हे उदाहरणासह स्पष्ट केले. जलदुर्ग निर्मिती तंत्र सुद्धा किती शास्त्रशुद्ध, स्थापत्य युक्ती पूर्ण होते हे पण उदाहरणासह स्पष्ट केले. शेवटी सरांनी मुलांना पण प्रश्न विचारण्याची संधी दिली.
गडकिल्ल्यांचे माहिती असलेली एक शिव स्मरणिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. याची निर्मिती करणारे सारंग मांडके यांचे आभार रागिणी ताई यांनी भेटवस्तू देऊन मानले.
शेवटी प्रा. रागिणी ताई नाईक यांनी घाणेकर सरांना भेटवस्तू देऊन आभार मानले.
23/01/2026
Jnana Prabodhini Prashala Entrance Exam 2026
23/12/2025
Today, Director of NCERT, Prof. Dr. Dinesh Sakalani, visited Jnana Prabodhini. An exhibition showcasing the work of Jnana Prabodhini was arranged on this occasion.
Students of Jnana Prabodhini Prashala presented their Project work and Abhivyakti products. Jnana Prabodhini’s Institute of Psychology, Educational Research Center, Educational Activities and Resource Center, Leadership Development Center, Chhatra Prabodhan, and Santrika presented their work. Separate exhibits on Kreedakul and Gurukul were also arranged.
He appreciated the exceptional work done by Jnana Prabodhini in the education sector across a diverse range of areas. He also appreciated the contribution of Jnana Prabodhini in content generation for the DIKSHA platform. The Director was welcomed by Secretary Shri Mahendra Sethiya, Principal Dr. Milind Naik (JPP), and Principal Shri Shriram Inamdar (JP Gurukul). Dr. Vivek Kulkarni (JPCEC) , Dr. Savita Kulkarni (HOD, JPCEC), and Dr. Anagha Lavalekar (Director, JPIP) were present during the interaction.
23/12/2025
22/12/2025
On 22.12.2025, Jnana Prabodhini was visited by the Central Education Secretary (Additional), Hon. Anandrao Patil; the Education Commissioner of Maharashtra, Hon. Sachindrapratapsingh; and the Director of SCERT, Hon. Rahul Rekhawar.
They were informed about Jnana Prabodhini’s educational philosophy and practices, and testing. They interacted with students. They discussed gifted education, how the school functions, and how Jnana Prabodhini can contribute to the Dhurva Project. They appreciated the efforts taken by Jnana Prabodhini for the holistic development of students and for motivating them towards nation building.
Dr. Girishrao Bapat (Director), Shri Mahendra Sethiya (Secretary), Shri Ashutosh Barmukh (Joint Secretary), Dr. Milind Naik (Principal, Jnana Prabodhini Prashala), Dr. Anagha Lavalekar (Director, JPIP), Dr. Vivek Kulkarni (JPCEC), Dr. Savita Kulkarni (Head, JPCEC), Dr. Mukulika Thatte (Vice Principal, JPP), Dr. Akash Chowkase ( President, JPF) , Ms. Kshama Datar (JPIP) , Ms. Isha Kanhere (JPIP) , Mr. Shreyash Phapale (JPP) , Mr. Nikhil Sonone (Kreedakul), Ms. Medha Devalekar (Kreedakul) were present.
| Monday | 11am - 5:30pm |
| Tuesday | 11am - 5:30pm |
| Wednesday | 11am - 5:30pm |
| Thursday | 11am - 5:30pm |
| Friday | 11am - 5:30pm |
| Saturday | 8am - 12pm |