नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा वळती

  • Home
  • India
  • Pune
  • नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा वळती

नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा वळती school

Permanently closed.
*२२ सप्टेंबरआज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिन या जयंती निमित्ताने 🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏जन्म.२२ सप्टेंबर १८८७  कोल्हाप...
22/09/2023

*२२ सप्टेंबर
आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्मदिन या जयंती निमित्ताने 🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏
जन्म.२२ सप्टेंबर १८८७ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज येथे.
सांगली जिल्ह्यातील ‘ऐतवडे’ हे त्यांचे मूळगाव. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘विटा’ या गावी झाले.
पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी शिक्षण होत असताना महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे व राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यामुळे ते प्रभावित झाले. याच दरम्यान त्यांचा सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीशी परिचय झाला व ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले. भाऊराव पाटलांनी ओगले ग्लास वर्क्सर, किर्लोस्कर ब्रदर्स या कंपन्यांचे फिरते विक्रेते म्हणून काम करीत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. त्यांच्या भ्रमंतीमुळे त्यांना ग्रामीण विभागातील जनतेच्या प्रचंड दारिद्रयाची, भयंकर अज्ञानाची व अंधश्रद्धेची जाणीव झाली. त्यांच्या या बहुतेक समस्यांवर ‘शिक्षण’ हा एकमेव महत्त्वाचा उपाय आहे असा विचार त्यांनी केला.
ग्रामीण भागातील प्रश्न जर सोडवायचे असतील तर तेथे शिक्षणाचा प्रसार होणे अत्यंत जरूरीचे आहे असे त्यांना वाटते, म्हणून त्यांनी १९१९ मध्ये ‘रयत शिक्षण संस्थेची’ स्थापना केली. रयत या शब्दांमध्ये सर्वसामान्य जनता आणि तिचे कल्याण असा भाव त्यांना अपेक्षित होता. समाजातील सर्व जातीच्या मुलांना, गरीब शेतक-यांच्या मुलांना शिक्षण घेता यावे असा प्रयत्न त्यांनी केला. संस्थेच्या वतीने सातारा येथे ‘छत्रपती शाहू बोर्डिग हाऊस’ हे वसतिगृह सुरू केले. प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे ‘सिल्व्हर ज्युबिली रूरल ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.
‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहून शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी ‘कमवा व शिका’ ही योजना सुरू केली. विद्यमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी जे कमवा व शिका योजना सुरू आहे त्या योजनेचे नाव कर्मवीर भाऊराव पाटील कमवा व शिका योजना असे आहे. बॅरिस्टर पी जी पाटील पुण्यामध्ये महाविद्यालयात शिक्षण घेत असताना. अण्णा त्यांना भेटावयास आले. त्यावेळी पाटील सर आणि एम ए इंग्रजी वर्गातील सर्व विद्यार्थी शिक्षक इंग्रजी सिनेमा पाहण्यासाठी जाणार होते. प्रत्येक आलेले अण्णा म्हणाले मी पण येतो. सिनेमा सुरू झाला त्यातील एक प्रसंग असा होता सेनापतीला गोळी लागली मात्र त्याच्या हाती ध्वज होता. आपण पडलो तरी चालेल आपल्या सैन्याचा ध्वज पडता कामा नये म्हणून तो दुसऱ्या सशक्त सैनिकाकडे ध्वज देण्यासाठी प्रयत्न करत होता. दुसऱ्या सैनिकाच्या हवाली केल्यावर तो खाली कोसळला. हा प्रसंग पाहताच अण्णा म्हणाले पाटील रयत शिक्षण संस्थेची धुरा अशा सक्षमपणे सांभाळणारा वारसदार आपल्याला निर्माण केला पाहिजे. कोणत्या प्रसंगातून काय घ्यावे हे झाला कळले त्याला शिक्षण नावाची गोष्ट कळली.
अण्णा म्हणत शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ आहे. शिक्षणाने माणूस बहुश्रृत व विवेकी बनतो.
शिक्षण हे साध्य नाही, साधन आहे. भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी नुसते डोक्यावरचे केस वाढवायचे नसतात, तर त्याने डोक्यातले विचार वाढविले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
समतेच्या तत्त्वांचा त्यांच्या संस्थेमार्फत व व्याख्यानामार्फत प्रसार केला. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व बहुजन समाजाचा सर्वागीण विकास हीच उद्दिष्टय़े भाऊरावांनी डोळ्यासमोर ठेवली होती. प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. एकदा वस्तीगृहामध्ये अण्णा यांचे कामकाज पाहण्यासाठी एक मोठी राजकीय व्यक्ती आली. त्यांना अण्णांनी जेवणाचे आमंत्रण दिले. भाजी थोडी तिखट होती. त्यावर अण्णा म्हणाले अरे महाराजांना पेढा घेऊन या. रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रत्येक शब्दाला एक वेगळा आणि अर्थ आहे. त्यांचा पेढा म्हणजे रात्रीच्या उरलेल्या भाकरीला तव्यावर गरम करून त्यात थोडा गुळ घालून त्याचे लाडू बनविणे किंवा पेढ्याच्या आकाराचे लहान लाडू बनविणे. खरोखर अण्णा आपण धन्य आहात. आपल्या एकट्याचा दृष्टीमुळे महाराष्ट्र भूमितील लाखो लोकांचे जीवन सुजलाम सुफलाम झाले आहे. आज आम्हा सर्वांच्या घरातील चूल पेटते आणि दोन घास जेवणाचे मिळतात ते आपल्यामुळे आम्ही आपल्या प्रति तन-मन-धनाने कृतज्ञता व्यक्त करत आहोत. यासाठी आपले स्थान ईश्वराप्रमाणे आहे. आपण खऱ्या अर्थाने रयत शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या हृदयात आहात. कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्वातंत्र्यलढयात सुद्धा भाग घेतला होता. त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीसाठी भूमिगत पुढा-यांना बरीच मदत केली. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांना ‘कर्मवीर’ ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला.
भारत सरकारने ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले. पुणे विद्यापीठाने त्यांना १९५९मध्ये ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर’ ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा सत्कार केला.

भाऊराव पाटील यांचे निधन ९ मे १९५९ रोजी झाले.

25/12/2021
पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील जयंती (२२ सप्टेंबर)कर्मवीर.कर्मवीर म्हणजे सतत कार्यरत असणारे व्यक्तित्व.अण्णांना (भाऊरा...
22/09/2020

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील जयंती (२२ सप्टेंबर)

कर्मवीर.कर्मवीर म्हणजे सतत कार्यरत असणारे व्यक्तित्व.अण्णांना (भाऊरावांना) ही पदवी कोणत्याही शासनाने दिलेली नाही.भारतीय प्रजासत्ताकाचे राष्ट्रपिता गांधीजी जसे सगळीकडे 'महात्मा' म्हणून ओळखले जातात, तशीच भाऊराव पाटील यांना महाराष्ट्रातील बहुजनसमाजाने 'कर्मवीर' ही पदवी प्रदान केली.अण्णांनी आयुष्यभर अवाह्यत त्याग आणि कष्ट करून या समाजाची जी महान सेवा केली तिच्यासंबंधीची उत्स्फूर्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा 'कर्मवीर' असा सार्थ गौरव करण्यात येतो.

बहुजन समाजामध्ये शिक्षणप्रसार करणे या आपल्या जीवनध्येयाकडे भाऊराव कसे वळले ही कहाणी जेवढी रंजक तेवढीच विलक्षण.स्वत:. भाऊरावांना शालेय जीवनात फारशी प्रगती करता आली नाही.या अपयशामुळे अण्णांना काही काळ 'छत्रपती शाहू महाराज' यांच्या राजवाड्यात राहण्याचा योग आला.त्यामुळे त्यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा बराच प्रभाव पडला.आपल्या संस्थानातील बहुसंख्य करदाते आपल्याच मराठा समाजामध्ये असले तरी हा समाज शिक्षणात मागासलेला राहिला आहे आणि त्यामुळे संस्थानाच्या प्रशासनामध्ये किंवा एकूणच सार्वजनिक जीवनामध्ये या समाजाचा जेवढा आढळ व्हावयास हवा तेवढा होत नाही, याचा शाहू महाराजांना विषाद वाटे. ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी महाराजांनी बरेच प्रयत्न केले. तसेच आपल्या अनुयायांमध्ये त्यांनी ही प्रेरणा निर्माण केली. महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक आणि राजकीय दुर्दशेविरुद्ध 'महात्मा फुले' यांनी आयुष्यभर किती निधडी झुंज दिली होती हे जेव्हा भाऊरावांना कळले तेव्हा त्यांचे हे कार्य आपण पुढे चालू ठेवावे, असे भाऊरावांच्या मनाने ठरवले.

भाऊराव पाटील यांचे घराणे गरीब होते.शाळा सोडल्यानंतर सुरुवातीची काही वर्षे त्यांनी व्यवसायात घालविली. या व्यावसायिक जीवनाच्या काळातही अण्णांनी गरजू आणि गुणी मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून मदत करत. आपण एखादी शाळा काढावी,असे प्रथम त्यांच्या मनात आले नव्हते. शाळेत जाणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करावे, एवढेच त्यांनी ठरविले होते. आपल्या सर्व वसतिगृहांची स्थापना ज्या तत्त्वांवर उभारणी केली त्या तत्त्वांवर हे वसतिगृह अजुनही चालतात.ती तत्तवे म्हणजे साधी राहणी, स्वावलंबन आणि जात,धर्म,पंथ आणि आर्थिक स्थिती यावरुन कोणताही भेदभाव न करता सर्वासंबंधी बंधुभाव. पुढे भाऊरावांनी 'रयत शिक्षण संस्था' स्थापन करून बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी आयुष्यभर अथक परिश्रम केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे कॉलेजला दिलेले नाव बदलून दुसरे नाव द्या मोठी देणगी देतो असे एका सावकाराने सांगितल्यावर ‘एक वेळ बापाचे नाव बदलीन पण शिवरायांचे नाव बदलणार नाही’ असे ठणकावून सांगणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,थोर शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील(डी.लिट.) यांची आज जयंती...
कर्मवीर अण्णांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

#कर्मवीरभाऊरावपाटील #कर्मवीर #अण्णा

आज दिनांक 09/05/2020 कर्मवीर भाऊराव पाटीलयांची पुण्यतिथीत्या निमिताने हे पुण्यस्मरणनिसंग योगी आणि तपस्वी कसा असावा.त्यान...
09/05/2020

आज दिनांक 09/05/2020
कर्मवीर भाऊराव पाटील
यांची पुण्यतिथी

त्या निमिताने हे पुण्यस्मरण
निसंग योगी आणि तपस्वी कसा असावा.
त्याने विजनवासात जाऊन बसले तरच
तो योगी होत नाही
तर कर्म विरांसारखा समाजात
वावरूनही आपली निसंग वृत्ती दाखवत असतो.
कर्मवीरांनी आपल्या मुलाला आप्प्साहेब
पाटील यांना पत्र लिहून
त्यांनी संस्थेवर भार बनून राहू नये कारण
त्यामुळे रयत वर विनाकारण आर्थिक बोजा पडेल
तेंव्हा स्वतःसाठी अन्यत्र नोकरी बघावी असे
आग्रहपूर्वक पत्र लिहून कळवले होते.
वंशपरंपरेने संस्थानिक
या कल्पनेला त्यांनी या पत्रातून विरोध
केला होता.
आजकाल मुलगाच काय जावई, भाचे पुतणे
यांची आणि
त्यांच्या पोराबाळाची ७ जन्माची सोय
कशी लावता येईल
असा विचार करणार्यांच्या जमान्यात कर्मवीर
म्हणूनच वेगळे ठरतात.
आता महापुरुषाची त्यागी आणि निर्मम
मानसिकता मुलाबालात येत नाही हे तर खरेच.
निवृत्तीचे जीवन जगत असताना आता मला चार
चाकी गाडीची गरज नाही
ती परत घेऊन
जावी आणि रयतच्या कामासाठी तिचा वापर
करावा
अशी सूचना करायला आपल्या कामावर प्रखर
निष्टा, आणि त्यागी वृत्ती लागते
ती असते म्हणूनच भाऊराव पाटील कर्मवीर
होतात.
नाहीतर शक्यतो लाल दिव्याची किमान
पिवळ्या दिव्याची ती नसेल तर
किमान सरकारी खर्चातून
स्वतः आणि बायकापोरांना चंगळ
करायला मिळावी
असे मानणार्यांची आणि सार्वजनिक
पैसा बरबाद करणाऱ्यांची संख्या कमी नाही
या वेगळे पणाने कर्मवीर अमर होतात
अन्यथा कितीएक ते जन्मले आणि मेले
अशांची संख्या वारेमाप.
कर्मवीरांना मनापासून नमन!

आंबेगाव तालुक्यातील वळती ग्रामपंचायत  व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्यसेविका, अंगणवाडी मदतनीस, आणि आशा सेविका यांचे पथक ...
15/04/2020

आंबेगाव तालुक्यातील वळती ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्यसेविका, अंगणवाडी मदतनीस, आणि आशा सेविका यांचे पथक घरोघरी जाऊन नागरिकांना कोरडा खोकला, तीव्र ताप असल्यास त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रापर्यंत पुढील उपचाराकरिता पोहोचवीत आहेत. तसेच पुणे, मुंबई व इतर बाहेरगाव येथून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करत आहेत. याच बरोबर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता घ्यावयाच्या खबरदारी बाबत जनजागृती करत आहेत.
वळती ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या वतीने

श्रीमती, अलका गाढवे (आरोग्यसेविका)
श्रीमती, आसावरी भोर (LSV सुपरवायझर)
श्रीमती, रेखा शेवाळे ( आरोग्य परिचारिका)
श्रीमती, गीता शेळके (आशा सेविका)
श्रीमती, मुक्ता क्षिरसागर (आशा सेविका)

ह्या सर्व जण घरोघरी जाऊन आरोग्य संदेश देत आहेत,
तरी सर्व वळती ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्याकडे असा कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास कृपया वळती ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधावा हि विनंती

Address

Pune
410504

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नरसिंह विद्यालय रांजणी भागशाळा वळती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category