11/06/2019
*जाहीर अवाहन*
*शिक्षण मंडळ पुणे म. न. पा. शाळेतच प्रवेश घ्या*
*सुवर्ण संधीचा लाभ घ्या.*
*पालकांना नम्र विनंती आहे.*
चालु शैक्षणिक वर्षात इयत्ता १ ली ते ८वी महानगरपालिकेच्या शाळेतच प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक ,भावनिक, बौद्धिक ,शारीरिक व सामाजिक ज्ञानाची जय्यत तयारी करुन घ्या.
शासनाच्या अनेक मोफत अनेक योजना व अध्यापनास साजेसा *डिजिटलक्लास आणि सामान्य ज्ञानाची भरपूर माहीती*ही आपल्याच भागातील म. न. पा. शाळेतुन मिळत आहे.
उगीच एकाचं बघून एक चालूच असलेल्या खाजगी शिकवणीच्या बाजारीकरणास भूलून न जाता प्रत्येक पालकांनी *स्वतःच्या मुलांना दररोज एक तास वेळ देऊन दररोजचा गृहपाठ*करुन घेतला की मग कोणत्याही शिकवणीची आवश्यकता नाही.
*म. न. पा. शाळेत मोफत मिळणाऱ्या योजना पहा.*
१)मोफत प्रवेश.
२) दफ्तर,गणवेश,वह्या,स्वेटर,बूट -मोझे तसेच इतर शैक्षणिक साहित्य मोफत
३)पहिल्याच दिवशी पाठयपुस्तके.
४)उपचारात्मक वर्ग.
५)अवांतर वाचनासाठी वाचनालय.
६)आनंददायी शिक्षण .
७)सांस्कृतिक कार्यक्रम .
८)डिजीटल क्लासरुम.
९)सर्व शिष्यवृती साहित्य मोफत
१०)मध्यान भोजन.
११)पिण्यासाठी स्वच्छ पाणी.
१२)खेळाचे भरपुर साहित्य .
१३)अनुभवी शिक्षक .
१४)पालक मेळावे.
१५)संगणक ज्ञान.
१६)सुसज्ज इमारत.
१७)बसण्यासाठी डेस्क बेंच.
१८)ज्ञानरचनावाद.
१९)शैक्षणिक सहल मोफत
२०)स्नेहसंम्मेलन.
२१)शालेय आरोग्य तपासणी.
२२) ABL साहित्याद्वारे शिक्षण.
२३) क्षेत्रभेट
२४) सुसज्ज व आधुनिक इ - वाचनालय
२५) प्रयोगशाळा
२६)मूल्यशिक्षणाची रुजवणूक
२७ ) मराठी,सेमीइंग्रजी, व इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची सोय.
अशा अनेक योजना विनामुल्य मिळण्याकरीता आपल्याच भागातील *म. न. पा. शाळेत* आपल्या मुलांचे प्रवेश निश्चित करा.....................................
*सुवर्ण संधी*
*शाळा शुभारंभ*
*-दिनांक १७ /जुन/२०१९*
*सौजन्य : - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा - पुणे शहर*