08/03/2026
"महिला दिनानिमित्त सौ. विमलाबाई गरवारे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘स्त्रीशक्ती सन्मान’"
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत जागतिक महिला दिनानिमित्त ‘स्त्रीशक्ती सन्मान’ सोहळा उत्साहात पार पडला. प्रशालेतील पुरुष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन महिला सहकाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली, हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
या प्रसंगी प्रशालेच्या चार यशस्वी माजी विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये निवृत्त अधिकारी श्रीमती भूषणा करंदीकर, उद्योजिका श्रीमती ऋचा वाटवे, कथ्थक नृत्यांगना श्रीमती आभा वांबूरकर आणि व्हायोलिन वादक श्रीमती चारुशीला देव यांचा समावेश होता. आपल्या मनोगतात श्रीमती भूषणा करंदीकर यांनी शाळेत मिळालेले शिक्षण व शिक्षकांनी दिलेले संस्कार यामुळेच जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याचे बळ मिळाल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक श्री रोहिदास भारमळ यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीत महिला सहकाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे नमूद केले. श्री योगेशचंद्र देवळालकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर श्री अनंत कुलकर्णी यांनी जागतिक महिला दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेंद्र पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री अतुल सरडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे महामात्र डॉ. निर्भय पिंपळे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी महिलांचा सन्मान, समान संधी आणि प्रोत्साहन हे समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विशेषतः श्री प्रवीण भोईटे, श्री सुनील जोशी, श्री सोमनाथ भोये, श्री गणेश हिले, श्री योगेशचंद्र देवळालकर,श्री अनंत कुलकर्णी, श्री राजेंद्र पावरा, श्री प्रभय्या हंद्राळमठ, श्री धनराज प्रजापती, श्री अतुल सरडे, श्री लौकिक वांजळे, श्री भीम कोंढाळकर, श्री पंडित महाले, श्री सागर फाजगे, श्री गणेश फडकले यांच्यासह मुख्याध्यापक श्री रोहिदास भारमळ यांच्या सक्रिय सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
https://youtu.be/kIwrQvtSgBs