Kapee Robotics And Innovations Club

Kapee Robotics And Innovations Club Its an after school program for kids. STEM based concepts that is, Science Technology, Enginnering a

शाळेच्या बसपासून ऑफिसच्या कॅबपर्यंत… ❤️नवीन शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं पाहिली की एक गोष्ट लक्षात येते—या सगळ्या मुलांना...
10/08/2026

शाळेच्या बसपासून ऑफिसच्या कॅबपर्यंत… ❤️

नवीन शाळेत जाणारी छोटी छोटी मुलं पाहिली की एक गोष्ट लक्षात येते—या सगळ्या मुलांना शाळेत जायची आवड असेलच असं नाही. आईला सोडून इतका वेळ दूर राहण्याची त्यांची तयारी असेलच असंही नाही.

मग आया त्यांना वेगवेगळी आमिषं दाखवतात. कुणाच्या हातात चॉकलेट, कुणाच्या हातात लॉलीपॉप… आता तर छत्री, रेनकोट, कार्टूनच्या छान छान बॅगा आणि असं काहीबाही दाखवून मुलांना शाळेत पाठवलं जातं.

हे सगळं चित्र पाहिलं आणि मला वीस वर्षांपूर्वीची माझ्या मुलाच्या शाळेच्या ॲडमिशनची आठवण झाली.

तेव्हा माझा मुलगा नुकताच दोन वर्षांचा झाला होता. पण त्याला अजून स्पष्टपणे पूर्ण वाक्यात बोलता येत नव्हतं. तो एक-एक शब्द बोलायचा. आणि आई म्हणून काळजी वाटणं स्वाभाविकच आहे ना?

माझ्या मनात सारखं येऊ लागलं—
“हा का बोलत नाहीये? हा का बोलत नाहीये?”

तो एकटाच खेळत बसायचा. फार फार तर माझ्यासोबत असायचा. त्याचा जास्तीत जास्त वेळ माझ्याच सोबत जायचा. पण तो बोलत का नाही, हा विचार मात्र माझ्या मनात सतत घोंगावत राहायचा.

शेवटी मी माझ्या आईला विचारलं,

“तूच सांग आता, याला बोलण्यासाठी मी काय करू?”

माझी आई पटकन हसली आणि म्हणाली,

“अगं, त्याला शाळेत घाल.”

मी म्हटलं, “पण अभ्यासासाठी?”

ती म्हणाली,

“शाळेत अभ्यासासाठी घालायचं नाही. त्याला तुमच्या घरातल्या माणसांव्यतिरिक्त वेगळी मुलं भेटायला हवीत, वेगवेगळी माणसं भेटायला हवीत. आणि वेगळी माणसं भेटली की त्याला जे काही बोलायचं आहे, त्याला जे काही हवं आहे, ते सांगण्यासाठी तरी तो बोलेल ना! बोलण्याचा प्रयत्न करेल.”

मग तिने एक खूप सुंदर गोष्ट सांगितली—

“शेवटी व्यक्त होणं महत्त्वाचं असतं. घरातली माणसं त्याला समजून घेतील. पण बाहेरची माणसं त्याला कशी समजून घेणार? त्यांच्याशी बोलावंच लागेल.”

तिचं हे सगळं ऐकल्यानंतर मी त्याचं नाव घराजवळच्या एका छोट्याशा शाळेत घातलं.

पण शाळेत जायचं आणि आईला सोडून जायचं या विचाराने त्याने घरात अक्षरशः थयथयाट केला!

आणि मग घरातले बाकीचे सगळे मोठे मला रोज रागवायला लागले—

“त्याला रडत कशाला नेतेस शाळेत? त्याला नाही जायचं ना? मग नको घालूस!”

पण मी मनावर दगड ठेवून त्याला रोज शाळेत सोडायला जायचे.

कित्येकदा शाळेच्या बाहेर उभी राहिल्यावर माझ्या डोळ्यात पाणी यायचं. कारण तो आतमध्ये खूप रडायचा.

पण हळूहळू त्याला शाळेची सवय झाली.

तो बोलायला लागला…
पूर्ण वाक्यात बोलायला लागला…

आणि कसेबसे सहा महिने त्या शाळेत गेले.

त्यानंतर त्याच्या बाबांच्या कामाच्या निमित्ताने आम्ही स्वित्झर्लंडला गेलो. जवळपास वर्षभर आम्ही तिथे राहिलो. तिथून परत आल्यानंतर नवीन घराचं पझेशन, शिफ्टिंग आणि बाकीची गडबड सुरू होती. त्यामुळे मी लगेच त्याच्या शाळेचा विचार केला नाही.

तेव्हा नोव्हेंबर-डिसेंबरचा काळ होता. मी विचार केला—जूनपासून शाळेत घालू.

अभ्यासासाठी शाळा लावायची नव्हती, त्यामुळे तो विषय तिथेच थांबला.

पण जूनमध्ये पुन्हा त्याला शाळेत घालायची वेळ आली, तेव्हा मात्र मला भीती वाटायला लागली.

“हा आता पुन्हा रडेल का? पुन्हा तीच परिस्थिती आपल्याला अनुभवावी लागेल का?”

पण या सगळ्यामध्ये एक मजेशीर गोष्ट घडली होती.

नवीन घरात राहायला आल्यापासून माझे मिस्टर बसने ऑफिसला जायला लागले होते. आम्ही त्यांना चिडवायचो किंवा कधी त्यांचं कौतुक करायचो—

“अरे वा! आता तुम्हाला दारात बस येते घ्यायला!”

बहुधा हे वाक्य त्याने खूप दिवस ऐकलं होतं.

आणि जेव्हा त्याचं शाळेत ॲडमिशन केलं, तेव्हा मी शाळेच्या बसचे पैसे भरले. घरी आल्यावर मी त्याला फक्त एवढंच सांगितलं—

“आता आपल्या घराखाली बस येईल तुला घ्यायला.”

बस्स!

मग शाळेत सोडण्याचा किंवा शाळेत जायचं की नाही, याचा प्रश्नच उरला नाही.

हे ऐकून तो इतका खुश झाला!

“बाबांसारखी माझ्यासाठी पण बस येणार? मला शाळेत न्यायला?”

आणि त्या आनंदातच तो शाळेत जायला लागला.

अजिबात एक दिवसही रडला नाही.

शाळेबद्दल त्याने कधी तक्रार केली नाही. शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा नाही, असा हट्टही त्याने कधी केला नाही.

उलट तो आनंदाने शाळेत जायचा.

आणि आज?

आज माझा तोच मुलगा इंजिनियर झाला आहे.

आज त्याची इंटर्नशिप सुरू झाली.

आणि योगायोग बघा…

आज त्याला ऑफिसची कॅब दारात न्यायला आली.

सकाळी तो जेव्हा म्हणाला,

“आज मला कॅब येणार आहे न्यायला…”

तेव्हा मला त्याचा शाळेतला पहिला दिवस आठवला.

त्या दिवशी त्याला शाळेत पाठवताना माझ्या मनाची जी अवस्था झाली होती, ती आठवली.

तेव्हा डोळ्यात पाणी होतं…
आणि आज?

आज त्याच दारात उभं राहून मी तेवढ्याच अभिमानाने त्याला टाटा केलं.

“Yes! Enjoy your day!”

असं म्हणत.

खरंच…

काळाची गम्मत दुसरं काय!

कधीकाळी आईचा हात सोडून शाळेच्या बसमध्ये बसायलाही तयार नसलेलं ते छोटंसं मूल…

आज स्वतःच्या पायावर उभं राहून ऑफिसच्या कॅबने आपल्या नव्या प्रवासाला निघालं आहे.

आणि आई म्हणून मनात फक्त एकच भावना आहे—

अभिमान… कृतज्ञता… आणि त्या सगळ्या जुन्या आठवणींचं एक सुंदर हसू. ❤️

09/08/2026

🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺
मुलं प्रतिभावान जन्माला येतात की प्रतिभावान बनवता येतात?

हंगेरीतील लास्लो पोल्गार यांच्यासाठी हा केवळ चर्चेचा विषय नव्हता.
त्यांनी ठरवलं—याचं उत्तर प्रयोगातून शोधायचं.
आणि तो प्रयोग त्यांनी स्वतःच्या मुलांवर केला.
आज Susan, Sofia आणि Judit Polgar या तीन बहिणी बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात विलक्षण खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखल्या जातात.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे वडील स्वतः महान chess player नव्हते.
ते Grandmaster नव्हते. आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडूही नव्हते.
लास्लो हे शिक्षक होते. त्यांना psychology आणि education मध्ये प्रचंड रस होता.
तरुणपणी त्यांनी वैज्ञानिक, गणितज्ञ, संगीतकार, कलाकार आणि इतर असामान्य व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला. त्यामध्ये त्यांना एक पॅटर्न वारंवार दिसत होता.

अनेक महान लोकांनी आपल्या क्षेत्रात खूप लहान वयात सुरुवात केली होती. त्यांना सातत्याने exposure मिळालं होतं. त्यांनी हजारो तास सराव केला होता. त्यांच्या आसपास त्या विषयाला प्रोत्साहन देणारं वातावरण होतं.
यातून लास्लो यांच्या मनात एक धाडसी विचार तयार झाला—
“Geniuses are made, not born.”
याचा अर्थ genes किंवा जन्मजात क्षमता अजिबात महत्त्वाची नाही, असा त्यांचा दावा नव्हता.
त्यांचा मुद्दा वेगळा होता.
आपण “talent”ला जितकं श्रेय देतो, त्यापेक्षा environment, early exposure, training आणि सातत्यपूर्ण सराव यांची ताकद खूप मोठी आहे.
योग्य वातावरण मिळालं, तर सामान्य मूलही एखाद्या क्षेत्रात असामान्य कामगिरी करू शकतं.

लास्लो यांना या विचारावर इतका विश्वास होता की लग्नाआधीच त्यांनी आपल्या होणाऱ्या पत्नी Klara यांच्याशी या प्रयोगाची चर्चा केली होती.
आता प्रश्न होता—
मुलांना कोणत्या क्षेत्रात विकसित करायचं?
गणित? भाषा? संगीत?
शेवटी त्यांनी बुद्धीबळ निवडलं.
कारण बुद्धीबळामध्ये performance मोजता येतो.
एखादं मूल “खूप creative” आहे का, यावर मतभेद होऊ शकतात.
पण बुद्धीबळामध्ये तुम्ही जिंकता किंवा हरता.
तुमचं rating असतं.
ranking असते.
tournaments असतात.
international titles असतात.
म्हणून बुद्धीबळ ही लास्लो यांच्या थिअरीसाठी जवळजवळ perfect laboratory होती.

त्यात आणखी एक व्यावहारिक फायदा होता. बुद्धीबळ हा स्वस्त खेळ होता.
मोठं infrastructure लागत नव्हतं.
बुद्धीबळाचे पट, पुस्तके, बुद्द्धीबळाची कोडी असलेली कार्ड्स आणि प्रतिस्पर्धी खेळाडू एवढेच पुरे होते.

पोल्गार घरात बुद्धीबळ हा फक्त एक खेळ राहिला नाही.
तो त्यांच्या घराचा भाग बनला.
Chess books.
Puzzles.
Games चे analysis.
स्पर्धा.
मोठ्या खेळाडूंचे सामने पाहणे.
एक बहीण खेळत असेल तर दुसरी पाहत असे. तिसरी ऐकत असे.

आपल्या घरात वडील business बद्दल सतत बोलत असतील, तर मुलांना “customer”, “profit”, “sales” हे शब्द नकळत समजू लागतात.
घरात संगीत असेल तर सूर ओळखीचे वाटतात.
Polgar घरात बुद्धीबळ तसंच नैसर्गिक होतं.
आणि हेच त्यांच्या प्रयोगाचं महत्त्वाचं रहस्य होतं.
Exceptional performance साठी त्यांनी फक्त सराव वाढवला नाही.
त्यांनी वातावरण बदललं.
परिणाम असामान्य होते.
Susan Polgar Grandmaster झाली आणि पुढे Women’s World Chess Champion बनली.
Sofia Polgar International Master झाली आणि तिने काही अत्यंत प्रभावी खेळ करत मोठ्या टुर्नामेंट्स जिंकल्या.

पण धाकटी ज्युडिथ सगळ्यांच्या पुढे गेली.
वयाच्या 15 वर्षे 4 महिन्यांत ती Grandmaster झाली आणि त्या वेळी Bobby Fischer चा सर्वात कमी वयात Grandmaster होण्याचा विक्रम तिने मोडला.
पुढे ती world ranking मध्ये क्रमांक 8 पर्यंत पोहोचली.
केवळ महिलांमध्ये नाही.
तर संपूर्ण जगात.
तिने Garry Kasparov, Viswanathan Anand आणि Anatoly Karpov यांसारख्या World Champions ना पराभूत केलं. (गॅरी कास्पारोव्हला हरवलं त्याची गोष्ट पण रंजक आहे. त्याबद्दल पुढील लेखात लिहेन !)

आजही ती इतिहासातील सर्वोत्तम महिला बुद्धीबळपटू मानली जाते.
पण या प्रयोगात आणखी एक महत्त्वाची गोष्ट लपलेली होती.
लास्लो यांना तीनही मुली होत्या.
त्या काळात स्पर्धात्मक बुद्धीबळावर जवळजवळ पूर्णपणे पुरुषांचं वर्चस्व होतं.
महिला नैसर्गिकरित्या बुद्धीबळामध्ये कमी सक्षम असतात, असा समजही अनेक ठिकाणी होता. खुद्द बॉबी फिशर, गॅरी कास्पारोव्ह यांनाही असेच वाटत होते. तसे ते उघडपणे बोललेही होते.

लास्लो यांनी हा समज स्वीकारला नाही.
त्यांचा प्रश्न साधा होता—
माझ्या मुलीचं ध्येय “best female chess player” होणं का असावं?
“Best chess player” का नाही?
हा छोटा वाटणारा फरक फार मोठा आहे.
एका मुलीला सांगितलं—
“तू मुलींमध्ये सर्वोत्तम होऊ शकतेस.”
दुसऱ्या मुलीला सांगितलं—
“समोर कोण बसलं आहे याने फरक पडत नाही. त्याला हरव.”
दोन्ही वाक्यं प्रोत्साहन देतात.
पण पहिल्या वाक्यात एक अदृश्य ceiling आहे.
दुसऱ्यात नाही.
विशेषतः ज्युडिथ ला women-only tournaments पुरतं मर्यादित ठेवण्यास तिच्या कुटुंबाने विरोध केला.
ती open tournaments मध्ये खेळली.
तिला महिला चॅम्पियन बनवण्याचा उद्देश नव्हता.
तिला world-class player बनायचं होतं.

1988 च्या Chess Olympiad मध्ये हंगेरीने चार मुलींची टीम पाठविली होती त्यात तीन मुली पोल्गर बहिणी होत्या.
Polgar sisters असलेल्या या Hungarian women’s team ने gold medals जिंकून Soviet Union चं दीर्घकाळाचं वर्चस्व मोडलं.

एका घरातून तीन international-level players.
एक World Champion.
आणि एक world top-10 player. ज्युडिथ बारा वर्षांची असल्यापासून ते २ ० १ ४ ला निवृत्त झाली तोपर्यंत म्हणजे तब्बल २५ वर्षे जगातील सर्वात जास्त रेटिंग असलेली महिला बुद्धीबळपटू होती . तिची रँकिंग एवढी जबरदस्त होती की निवृत्त झाल्यानंतरही पुढे एक वर्षभर तीच प्रथम होती.

याला केवळ एक योगायोग नक्कीच म्हणता येणार नाही.
Polgar sisters ची कथा हे सिद्ध करत नाही की प्रत्येक मुलाला पुरेसं training दिलं, तर तो world champion बनेल.
Genetics महत्त्वाची असू शकते.
Personality महत्त्वाची असते.
पण Polgar experiment आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारायला भाग पाडतो.
आपण “मुलांत टॅलेंट नाही” हा निष्कर्ष किती लवकर काढतो?
दोनदा गणितात कमी गुण आले—
“याचं गणित कमजोर आहे.”
स्टेजवर एकदा घाबरला—
“याचा confidence कमी आहे.”
व्यवसायात अपयश आलं—
“माझ्यात business sense नाही.”

आपण परफॉर्मन्सचा एक छोटासा तुकडा पाहतो…
आणि त्याला कायमची ओळख (permanent identity) बनवतो.
आपला प्रश्न “या मुलात टॅलेंट आहे का?” हा नसावा.
प्रश्न असा असायला हवा—
“हे टॅलेंट विकसित होण्यासाठी आवश्यक वातावरण आपण तयार केलं आहे का?”

आपल्याकडे अनेक पालक मुलांना वेगवेगळे classes लावतात.
Swimming. Coding. Keyboard. Cricket. Drawing. Abacus.
सगळ्या गोष्टींची माहिती होणे ठीक आहे.
पण excellence साठी "खोली" (depth) लागते.
एकाच गोष्टीत शेकडो चुका कराव्या लागतात.
त्या चुकांमधून शिकावं लागतं.
आपल्यापेक्षा चांगल्या लोकांसोबत बोलावं लागतं.
प्रगती दिसत नसतानाही टिकून राहावं लागतं.

Polgar sisters ना हे वर्षानुवर्षे मिळालं.
आणि त्याहूनही महत्त्वाचं—
त्यांच्या घरात मोठं ध्येय “मोठं” वाटत नव्हतं.
Judit साठी Grandmasters हे दूरचे स्वप्न नव्हते.
ते तिच्या जगाचा भाग होते.
वातावरण आपल्याला फक्त स्किल्स शिकवत नाही.
ते आपल्या मनात एक सीमा आखतं—
“माझ्यासारख्या माणसासाठी काय शक्य आहे?”

म्हणून Polgar sisters ची कथा genius तयार करण्याची recipe नाही.
ती आपल्या निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह आहे.
आपण “talent” हा शब्द कधी कधी फार सोयीस्करपणे वापरतो.
यश दिसलं—talent आहे.
अपयश दिसलं—talent नाही.
आणि त्यामुळे एक अधिक अवघड प्रश्न विचारायचा राहून जातो—
योग्य वातावरण, योग्य training, योग्य अपेक्षा आणि पुरेसा वेळ मिळाला असता… तर हा माणूस काय बनू शकला असता?

(१ . ज्युडिथ पोल्गार वर नेटफ्लिक्समध्ये एक डॉक्युमेंटरी पण आहे. Queen of chess. बुद्धीबळात रस असेल तर नक्की बघा !
२ . जवळपास अशीच कथा टेनिस विश्व गाजवणाऱ्या विलियम्स बहिणींची आहे. यावरही king Richards हा सिनेमा उपलब्ध आहे.)

Kapee Club- Nurturing Genius Minds!
===========================

तुमची मते नक्की सांगा…

23/07/2026

Six European countries just admitted their digital classroom experiment didn't work as planned. Sweden, Finland, Norway, France, Italy, and Denmark are bringing back printed textbooks, quiet reading time, and handwriting practice after years of tablets and screens in schools. 📚 Sweden invested over 100 million euros restoring physical books after reading scores dropped among fourth graders between 2016 and 2021. Denmark has committed hundreds of millions of kroner to swap tablets for books, aiming for fully mobile free schools by 2027.

Researchers say handwriting slows the brain down, forcing students to truly process information instead of just typing it out. ✍️ Studies link heavy early screen use to weaker focus and comprehension, one reason these governments are shifting back to paper. 📖 For parents who always sensed something was missing, this feels like quiet vindication. Sources The European, Undark, Manila Times. Paper never needed an update to work.

📌Sources: The European, Undark, Diane Ravitch's blog, Manila Times, Think Academy, Highbrow Magazine

17/07/2026

Parenting is a shared responsibility, not a favor. ❤️ Fathers shouldn't be praised simply for caring for their own children while mothers are judged for doing the same. True equality begins when caregiving is seen as the responsibility of both parents, regardless of gender


*हर हर महादेव!!!*स्वराज्य मिळावे ही ईच्छा, हे स्फुल्लिंग घेवून त्या दिशेने पावले टाकताना छोट्या शिवबाला कधी ते बोअर झाले...
19/02/2026

*हर हर महादेव!!!*

स्वराज्य मिळावे ही ईच्छा, हे स्फुल्लिंग घेवून त्या दिशेने पावले टाकताना छोट्या शिवबाला कधी ते बोअर झाले नसेल का?😂
ही गंमत नाही, ही हकिकत आहे… लहानच होता तो.. पण १००% प्रयत्न केले ते जिजाऊंनी.. स्वराज्याची ईच्छा बाल शिवबाच्या मनात रूजवली ती या धाडसी मातेने, त्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी, दांडपट्टा चालवायला शिकवला, त्यासाठी अट्टाहास केला तो या मातेने, जहागिरी असतानाही यवनांची चाकरी करण्यापेक्षा स्वत:चे राज्य निर्माण करावे ही रूजवात घालणे च किती मोठा निर्णय होता. आणि त्यासाठी तिने स्वत:च्या मुलाला तयार केले, तेवढे तरबेज, कर्तबगार केले.
आई ही नेहमी आईच असते… लेकरू मोहिमेवर असताना तिचाही जीव घाबरलाच असेल ना? बलाढ्य परकिय शत्रुपुढे तुटपुंज्या मावळ्यासोबत लढणार्या शिवबाची काळजी वाटलीच असेल ना?
खरे धाडस जिजाऊंचेच… आज आपल्या महाराजांचा वाढदिवस आपण मोठ्या ऊत्साहात साजरा करत आहोत… हा महान राजा जन्माला घालणारी आई होणे म्हणजे फार मोठे दिव्य ! या महान आईला मानाचा नमस्कार!
एक पालक, एक आई, एक समुपदेशक म्हणून एकच सांगते… आपला मुलगा महाराजांसारखा कर्तबगार घडवायचा असेल तर तुम्हाला जिजाऊ व्हायला हवे.
बोर होणार्या मुलांना मोबाईल देण्यापेक्षा संस्कारांची, स्वयंप्रेरणेची तलवार त्यांच्या हातात द्यायला हवी.
जय शिवराय! जय भवानी!
सौ. प्रणाली कुलकर्णी
कपी क्लब, पुणे

02/02/2025

Hello,

Today isn’t just another day.

It’s Vasant Panchami—the festival of wisdom, learning, and fresh starts.

Goddess Saraswati, the deity of knowledge and arts, is honored today. Starting something new—especially in learning—on this day is considered extremely auspicious.

Why?

Because it’s a day of clarity, creativity, and intellect—a perfect moment to take a step forward in your growth.

Students begin their first lessons today. Writers start their next masterpiece. Entrepreneurs make bold moves.

14/11/2024
"Calling all parents and caregivers!I'm excited to share my YouTube channel "Parenting Coach Pranali" with you!As a pare...
24/10/2024

"Calling all parents and caregivers!

I'm excited to share my YouTube channel "Parenting Coach Pranali" with you!

As a parenting coach, I share practical tips, expert advice, and real-life experiences to help you raise happy, confident, and successful kids.

To help me reach more parents and make a greater impact, I challenge YOU to:

LIKE this message
SHARE this message with your friends and family
SUBSCRIBE to my YouTube channel (link in comments below)

Let's work together to build a supportive community of parents who want the best for their kids!

And, if you're feeling extra enthusiastic, I challenge you to share a parenting win or a question you have in the comments below!

Let's do this! "

*Kapee Club*Happy to announce that conducting special one day workshop on *Vedic Maths* for maths lover students. Detail...
17/10/2024

*Kapee Club*

Happy to announce that conducting special one day workshop on *Vedic Maths* for maths lover students. Details as below:
*Eligibility: grade 5th to 10*
*Date: Sunday 27th October 2024*
*Timing: first session Morning*
*9 am to 12 noon*
*Second session- 2 pm to 5pm*
*Fees: Rs. 599/-*

Workbook and pencil will be provided here.
Pls carry water bottle.
*Venue: Kapee Club*
*Shop No 4, Rajyog Annexe,*
*Near Kodre Ground, Beside* *Laigude Hospital, Sinhgad* *Road, Pune- 411041*

Admission will be confirmed only after full payment of fees.
Gpay, phonepay- 9970061140

*Pranali Kulkarni*
*Kapee Club*
*Mob- 9970061140*

After fee payment share screenshot with-
Student Name-
Grade-
DOB-
School-
Mobile no-
E-mail-

24/07/2024

*कपी क्लब*
====================
काल परवा एक संदेश व्हाट्सअप्प वर पाहिला, एका लाकडी फळी वर ४/५ वाकडे खिळे होते, आणि एक सरळ खीळा होता. जो सरळ खीळा होता त्यावर हातोडीचा दणका मारताना दाखवले होते. आणि खाली लिहले होते

"वाकड्याना सोडून सरळ जे असतात त्यानाच ठोकले जाते"

मॅसेज वाचला व मनात विचार आला हे खिळे जन्मतः वाकडे असतील का.? मग मी एका हार्डवेयर च्या दुकानात जाऊन १०० ग्राम
खिळे घेतले ते सगळेच सरळ होते.
मी दुकानदारास विचारले भाऊ वाकडे खिळे नाहीत का.?

त्याचे उत्तर "दादा कारखान्यातून सर्वच खिळे सरळ येतात. फक्त हातोडी चा चुकीचा दणका किंवा मग खिळ्याची प्रहार सहन करण्याची क्षमता कमी असल्याने हे खिळे वाकतात"
मग मी विचारले केला की मग ह्या वाकड्या खिळ्याचे करायचे काय.?

तर तो सहजतेने बोलला
*"साहेब यांना पहिले जमिनीवर आणा मग हातोडीने हळू हळू सरळ करा,*
*जोरात घाव घालू नका, ते तुटतील बिचारे*
*एकदा सरळ झाले की मग त्यांना परत हळू हळू भिंतीत ठोका एकदा जर त्याचा वाकडा भाग भिंतीत गेला की मग हाच अर्धा ग्राम चा खिळा १० किलो वजन धरुन ठेवेल".*
परंतू
*तसे न करता तुम्ही त्याची जबाबदारी दुसऱ्यावर सोपवता*

*त्याला खुशाल मोकळे सोडता ( फेकुन देता )*
बर
*फेकल्यावर सुद्धा तो खिळा काय करतो*
तर
*चालती गाडी पंचर करणे*
*चालत्याच्या पायास रुतून जखम करणे*
*असे उपदव्याप करतो*

त्या अशिक्षितने माझे डोळे उघडले,
आणि कोणताच खिळा हा जन्मतः वाकडा नसतो, त्याच्यावर योग्य संस्कार न झाल्याने तो वाकतो आणि जर आपण त्याला तसेच फेकून दिले तर त्या पासून चांगल्या चांगल्या गाड्या पंचर होऊ शकतात.

म्हणून त्याला प्रेमाने सरळ करा व जबाबदारी द्या तो निश्चितच निभावेल ही जाण मला झाली.

*दृष्टीकोन बदलला*
*आणि*
*वास्तवाची जाणीव आली*

Address

Shop Number 4, Rajyog Annexe Society, Near Laigude Hospital, Sinhgad Road, Near Lokmat Press
Pune
411041

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kapee Robotics And Innovations Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Kapee Robotics And Innovations Club:

Shortcuts

Share

Category