Happy Kids Nursery School

Happy Kids Nursery School Happy Kids Nursery school and Day Care center is an activity center which focuses on the overall development of the child.

14/08/2025
*गणपती मेकिंग कार्यशाळा* -मित्रांनो आणि पालकांना कदाचित तुम्ही अनेकदा अशा कार्यशाळेबद्दल ऐकले असेल किंवा सहभागी घेतला अस...
28/07/2024

*गणपती मेकिंग कार्यशाळा* -

मित्रांनो आणि पालकांना कदाचित तुम्ही अनेकदा अशा कार्यशाळेबद्दल ऐकले असेल किंवा सहभागी घेतला असेल. या कार्यशाळेतून मुलांना किंवा जो गणेश मूर्ती बनवतो त्याला नेमकं काय मिळतं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे.

श्री गणेशा म्हणजे आपला लाडका बाप्पा जो दहा दिवस येतो आणि आपल्या घरातला एक सदस्य बनून राहतो आणि निरोप देताना आठवणींची शिदोरी देऊन जातो.

दुकानात जाऊन गणपती बाप्पाची मूर्ती आणताना आपण त्याचे पालक म्हणून दहा दिवस संगोपन करतो आणि मग त्याला पुढच्या प्रवासासाठी निरोप देतो.

पण जेव्हा आपण गणपतीची म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी बनवतो तेव्हा आपण आपल्या लाडक्या बाप्पाला स्वतः घडवत असतो, त्या मूर्ती स्वरूपाला जन्म देत असतो.

*अगदी माती आणण्यापासून म्हणजेच पोषणापासून*

*माती भिजवणे आणि त्याचा गोळा बनवणे म्हणजेच संस्कार करणे*

*त्या गोळ्याला सुंदरसा मूर्तीचा आकार देणे, त्या प्रत्येक आकारात मन घालणे म्हणजेच त्या मूर्तीशी एकरूप होऊन तिला घडवणे, तिला या जगात आणण्यासाठी तयार करणे*

*मग गणेश चतुर्थीच्या दिवशी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करणे म्हणजेच आपण घडवलेल्या त्या बाप्पाच्या स्वरूपाचे बारसे करणे, त्याचे स्वागत करणे*

असा हा संपूर्ण अनुभव क्षणोक्षणी तुम्ही अनुभवत असता त्यात तुमचं मन, जीव, जी मेहनत आणि वेळ या सर्व गोष्टींनी खतपाणी टाकल्या गेलेले असते.

सोबतच ही आपल्या बाप्पांची मूर्ती बनवताना, घडवताना बाप्पांच्या गोष्टी आपण ऐकतो, कधी गाणे ऐकतो, आनंदाने त्या कलाकृतीत सौंदर्य आणतो म्हणजे सूर्जनाचे कार्य आपण करत असतो.

गणपती बाप्पांची ही मूर्ती स्वतः बनवण्याचा अनुभव एकदा तरी नक्की घ्या. आणि हा अनुभव घेतल्यानंतर नक्की कसे वाटले हेही सांगा.

आज शाळेमध्ये मुलांनी छत्री वर पेंट केले. खरंच किती साधी गोष्ट होती. त्यामधून त्यांना इतका आनंद मिळाला की बघूनच छान वाटले...
22/06/2024

आज शाळेमध्ये मुलांनी छत्री वर पेंट केले. खरंच किती साधी गोष्ट होती. त्यामधून त्यांना इतका आनंद मिळाला की बघूनच छान वाटले. मग असा विचार आला की पालक म्हणून इतका साधा आनंद आपण मुलांना देऊ शकत नाही का?विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

Getting ready for the monsoons... Spent a lovely morning painting umbrellas at Happy Kids Nursery school!
22/06/2024

Getting ready for the monsoons... Spent a lovely morning painting umbrellas at Happy Kids Nursery school!

Enjoy with ur kids.
19/06/2024

Enjoy with ur kids.

Address

Mahavir Aparatments, Opp Krishna Hospital, Paud Road
Pune
411058

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+91 9226880312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Happy Kids Nursery School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category