15/07/2025
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांना ५ वर्षांपूर्वी 5 जिल्ह्यातील सुशिक्षित पदवीधर मतदारांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलं… पण आज मतदार प्रश्न विचारतोय:?
▪️ MSBTE आणि विद्यापीठांतली गोंधळलेली परीक्षा पद्धती — तुमचा आवाज कुठं गेला?
▪️ युवक बेरोजगारी, MSCIT सारख्या फुकट कोर्सेसचं थातुरमातुर समाधान — यावर ठोस उपाय का नाही?
▪️ शैक्षणिक धोरणांमध्ये पदवीधरांचं प्रतिनिधित्व शून्य — तुम्ही गप्प का?
▪️ शासकीय नोकऱ्यांमधील मर्यादित संधी, मागासवर्गीयांवरील अन्याय — प्रश्नच उपस्थितच नाही?
▪️ शिक्षक, प्राध्यापक, अभ्यासक्रम, संशोधन यावर आपली भूमिका कुठेच नाही?
आमदारांचं आता विधान परिषदेतील अस्तित्वच अदृश्य झालं आहे!
म्हणजे काय? एकदा निवडून आलो की, प्रश्न विसरायचे?
पदवीधर मतदारसंघ फक्त सत्तेचं पाऊलपाटणं आहे का?
🔍 आम्हाला कामं हवीत, भाषणं नाहीत.
📣 आवाज हवा आहे, प्रत्यक्ष कृतीचा!
#अरुणलाड #पुणे_पदवीधर #विधानपरिषद #पदवीधरांचेप्रश्न
#बेरोजगारी #शिक्षणधोरण #निष्क्रियआमदार