09/06/2022
करिअर क्षेत्रातील एक अतिशय तज्ञ व्यक्ती म्हणजे डॉ.श्रीराम गीत सर'. सरांनी एमबीबीएस, एमडी झाल्यावर तीस वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर "करियर कौन्सिलिंग " क्षेत्राकडे त्यांचे लक्ष केंद्रित केले. सर सॉफ्टवेअर ची प्रसिद्ध कंपनी "पर्सिस्टंट" हिचे कौन्सिलिंग डिपार्टमेंट प्रमुख, "सिंबायोसिस फोरेन लांग्वेज डिपार्टमेंट" चे प्रमुख ,शासनाच्या MSCIT संस्थेचे प्रमुख होते, तसेच शेकडो पुस्तके त्यांनी लिहिली आहेत, अशा प्रचंड विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शन, रविवारच्या व्याख्यानामध्ये मुलांना झाले. खूप महत्त्वाचा विषय म्हणजे "इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी" मधील करियर , याविषयी विस्तृतपणे त्यांनी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. आयटीमध्ये करिअर करायच असेल तर, प्रामुख्याने फिजिक्स आणि मॅथ्स या विषयावरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. पिंपरी-चिंचवड मध्ये व्याख्यानासाठी प्रथमच आलेले "डॉक्टर श्रीराम गीत" सर आणि लोकसत्ताचे माजी उपसंपादक, "भवताल" पर्यावरण संस्थेचे ,प्रमुख "अभिजित घोरपडे सर" यांचे आभार.