21/11/2025
*म.ए. सो. वर्धापन दिन *
पारतंत्र्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात देश प्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच स्थानिक लोकशिक्षणाचे काम अधिक परिणामकारक होण्यासाठी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, श्री वामन प्रभाकर भावे व श्री लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी लोकशिक्षणाचा ध्यास घेतला, योगदानाने व ज्ञानदानाने त्यांची स्वप्नपूर्ती झाली. यांचे फलित म्हणजे आज 165 वर्षांचा भरलेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा ज्ञानवृक्ष.
म. ए. सो. संस्थेचा 165 वा वर्धापन दिन दिनांक १९/११/२०२५ रोजी बाल शिक्षण मंदिर शाळेत उत्साहात
साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी कर्नल डॉक्टर प्रमोद माधव वेलणकर (भूलतज्ञ) लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख सौ. मंजुश्री गायकवाड बाई यांनी करून दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. मोनिका खेडलेकर मॅडम यांनी संस्थेच्या भरीव कामगिरी विषयी माहिती दिली. शिक्षक श्री. विजय कंक सरांनी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा इतिहास वृत्तांत सादर केला.
प्रमुख अतिथी डॉक्टर श्री प्रमोद माधव वेलणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाल शिक्षण मंदिर शाळेचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व सांगितले.
या दिनाचे औचित्य साधून शाळेत इयत्ता १ ली ते इयत्ता ४थी विद्यार्थ्यांचे मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. संगीत खुर्ची ,ठसे गेम्स , बादलीत चेंडू टाकणे या खेळातील विजेत्यांना आकर्षक शालोपयोगी वस्तू बक्षीस स्वरूपात देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. गौरी जोशी बाई यांनी केले.
अशाप्रकारे म. ए. सो. संस्थेचा 165 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
To Know More Contact us
☎️ 020-25654982
📍 Address -
M.E.S. Bal Shikshan Mandir, Deccan Gymkhana, Pune - 411004.