01/03/2026
विज्ञान दिन २०२६
संस्थाभेट वृत्त
कुमार: ११
किशोर: १३
मार्गदर्शक:
विज्ञान दिनानिमित्त IISER व IUCAA या दोन्ही संस्थाना भेट दिली.
सकाळी 9:45 ला IISER च्या front gate वर सर्व एकत्र भेटलो व पाहिल नमस्ते घेतल. तिथून IISER मध्ये NLH मध्ये lecturesला गेलो.
10:30 ला पाहिल lecture सुरू झाले... "what research means?" यावर डॉ. सौरभ दुबे यांचे lecture मुलाना फार relatable वाटले, दलात शिकतो तशी research process त्यांनी छान समजवून सांगितली.
11:15 ला दुसरे lecture सुरू झाले (bioactive lipids). याचे वक्ते सिद्धेश कामत हे स्वतः chemical engineer असून biology च्या क्षेत्रात काम केलं आहे हे मुलाना फार भारी वाटलं.
12:00 ला तिसरं lecture सुरू झालं(proteins). यात proteins मधील अनेक संशोधनामुळे मानव जातीला कसा फायदा झाला हे सांगितलं. Blood group कुठल्या proteins वर ठरतात, हे समजून घेतले, व त्याचा प्रयोग सादर केला. या सत्रात बर्याच मुलाना प्रश्न पडले होते त्यांनी वक्त्यांबरोबर संवाद साधला.
या नंतर बाहेर, IISER campus मध्ये, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व IISER येथील प्रोफेसर डॉ. नीरजा ताई दशपुत्रे यांना भेटलो. मुलानी त्यांच्याशी बोलून त्यांचे काम समजून घेतले.
त्यानंतर सर्व जण, IUCAA ला गेलो.
IUCAA मध्ये बरेच exhibits होते- उदा. satelite, cosmological phenomena, aerodynamics इत्यादी. हे exhibit तिथले शास्त्रज्ञ व त्यांचे विद्यार्थी समजवून सांगत होते, ती पद्धत मुलांना फार आवडली व तशा प्रकारे आपण गणपतीच्या प्रदर्शनात सांगूया अशी चर्चा झाली.
पुढे IUCAA मध्ये दोन lectures होते त्यातील पाहिल lecture हे जेन गुप्ता ह्या भारतीय वंशाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञांच होत, त्यात त्यांनी EM spectrum चा वापर करून universe कसे समजून घेता येते हे सांगितले. त्या पुढचे lecture सुषमीता दास यांचे 'journey of stars' यात त्यांनी पूर्ण तार्यांचे life cycle समजून सांगितले, व आपण ज्या आणू(atoms) ने बनले आहोत त्यातले बरेचसे हे एके काळी तार्यांचे भाग होते हे पटवून दिले.
IUCAA मधील या दोन्ही lectures मधील content जरी मुलांना संपूर्ण समजले नाही तरी त्यातून त्यांना science चा scope व astrophysics मध्ये आवड निर्माण झाली.
IUCAA मध्ये बाहेर गोलात बसून चर्चा झाली. आज काय नवीन पाहिल, observe केल, समजल, अचंब वाटल यावर प्रत्येक जण बोलला.
अशा visits का कराव्या, त्याच्या मागचा goal काय, व visit गटात का कराव्यात हे मार्गदर्शकांनी सांगितले.
प्रार्थना झाली व दुसरं नमस्ते होऊन दल संपले.