29/01/2026
नवीन वर्षातले पहिले workshop!
माझी शाळेपासूनची मैत्रीण भाग्यश्री, तिचा डिसेंबरच्या सुरुवातीला फोन आला.
आभाचा म्हणजे तिच्या मुलीचा वाढदिवस जानेवारी मध्ये असतो, आणि दर वर्षी bday celebration चे planning नेहमीपेक्षा वेगळे, thoughtful आणि creative असावे असा भाग्यश्रीचा, being an artist, विचार असतो.
या वर्षी आभाच्या मित्र मैत्रिणींसाठी तिला माझे workshop ठेवायचे होते.
Bday celebration ची ही कल्पना मला फारच आवडली आणि आम्ही त्यावर काम सुरू केले.
आभा आणि तिचे मित्र मैत्रिणी म्हणजे अक्षरनंदन चे पाचवीतले students! त्यांच्यासाठी काय बरं करता येईल हा विचार चालू झाला. भाग्यश्रीने आणि आभाने inputs दिल्यावर माझे काम जरा सोपे झाले. काही games आणि activities paln केल्या.
एक तास workshop आणि मग bday celebration असे ठरले तर होते, पण दीड तास झाला तरी मुले उत्साहीच! त्यांना अजून खेळायचे होते..!
फार छान झाले हे workshop!
Activities and games मधून passively मुले फार छान शिकतात. आणि हो! मला ही खूप शिकायला मिळतं त्याच्याकडून!
भाग्यश्री, तुला खूप धन्यवाद या संधी बद्दल!
या bday celebration workshop ची काही क्षणचित्रे!
नेहा काटदरे देशपांडे
सुहृद म्युझिक स्कूल