Turiya Lab

Turiya Lab Turiya Lab is a non profit initiative to help build entrepreneurial mindset in students using STEM

Soon…
31/08/2025

Soon…

10/09/2024

काही दिवसापूर्वी फेसबूक पाहता पाहता , अचानक वैभव पाटील ची एक पोस्ट पाहण्यात आली ,

"शिवछत्रपतींच्या नावाने अनेक सोहळे,
एवढ्या लक्षावधी कोट्यवधी जनतेतून गड रोहिडा साठी लोकवर्गणीत आर्थिक योगदान देणाऱ्यांची संख्या: १४
आणि म्हणे आम्ही छत्रपतींचे मावळे"

जरा खटकलं पण म्हटलं हा तरी काय करतोय ते पाहुयात कि इतरांसारखा पोस्टसम्राट आहे , म्हणून सहज त्याला मेसेंजर वर पिंग केला, काही दिवसात त्याचा रिप्लाय आला आणि फोन वर बोलू म्हणालो यांवर. मला वाटलं २-४ मिनिट बोलू आम्ही पण रात्री ११.३० वाजता आलेला फोन मध्यरात्र उलटून गेल्यावर हि चालूच होता. १२.३० पर्यंत. या तासाभरात वैभव , Shri Shivadurga Samvardhan श्री शिवदुर्ग संवर्धन, त्यांचं काम , तो स्वतः रोहिडा किल्ल्यावर करत असलेल काम या बद्दल भरभरून बोलला. स्वतःला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या बहुतेक लोकांची या दुर्ग संवर्धनाबद्दलची उपेक्षा हि त्याची खंत पण त्याच बरोबर तो आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था करत असलेल्या कामाचा अभिमान यात सगळं वेळ गेला. श्री शिवदुर्ग संवर्धन हि संस्था गेलेबारा वर्षांहून अधिक काळ शौर्यस्थळ गड रोहिडा, भोर इथेसंवर्धन कार्य करत आहे. रोहि डा जगाच्या नकाशावर आणणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे,

मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो कि Turiya Lab तुरीय लॅब च्या माध्यमातून आम्ही रोहिडा गडावर वायफाय व ब्लूटूथ स्पिकर लावायच्या प्रकल्पात सहभागी व्हायचे ठरवले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खालील कामे वैभव करणार आहे

- गडावर WIFI (वायफाय ) ची सोय करणे. महाराष्ट्रातला पहिला WIFI गड असा मान रोहिडा ला मिळवून देणे
- WIFI आल्यानंतर डिजिटल तंत्रज्ञान वापरून माहिती फलक लावणे जेणे करून जागतिक भाषांमध्ये गडाची माहिती पर्यटकांना मिळेल
- IOT (इंटरनेट ऑफ थिंग्स) व sensors (सेन्सर्स) वापरून गडाची वेगवेगळ्या प्रकारची माहि ती संकलि त करत राहणे- उदा० गडावरचे तापमान , वाऱ्याचा वेग, येणाऱ्या पर्यटकांची संख्या इत्यादी

माझ्या मित्र मंडळींना व सहकार्यांना सगळ्यांना आवाहन आहे कि आपणस यात मदत कार्याची असेल तर आपण माझ्याशी किंवा वैभव बरोबर संपर्क करू शकता. Turiya Lab तुरीय लॅब व आपल्या सगळ्याच्या सहकार्यामधून आपण आपल्या राज्याची हि संपत्ती, आपले दुर्ग यांचं संवर्धन करूयात. मी लवकरच वैभव आणि श्री शिवदुर्ग संवर्धनचे एक ऑनलाईन सेशन ठेवणार आहे, त्या माध्यमातून आपणाला जास्त माहिती मिळू शकेल

आपला , अजय वालगुडे व Turiya Lab तुरीय लॅब

Shri Shivadurga Samvardhan

After successfully exceeding the target of 400+ tree plantation, Turiya Lab is launching its next avenue - "Vertical Far...
05/09/2024

After successfully exceeding the target of 400+ tree plantation, Turiya Lab is launching its next avenue - "Vertical Farming". We will be experimenting with Vertical farming technique in coming days and weeks. Rajnikant Mendhe Rahul Walgude

Anyone who is willing to join this initiative please reach out to me. We are also seeking help from mentors who can help and guide us in this process. Our objective is to have at least 2 startups by March next year. One run by a Woman self help group another by an young farmer.

यंदाच्या पावसाळ्यात ४००+ झाडांचे वृक्षारोपण केल्यानंतर , तुरीय लॅबचा नवीन महत्वाकांक्षी प्रकल्प "व्हर्टिकल फार्मिंग" अर्थात "उभी शेती". आम्ही येत्या काही दिवसांत , आठवड्यामध्ये प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा अभ्यास व प्रयोग करणार आहोत. Rajnikant Mendhe Rahul Walgude

जर कुणी या क्षेत्रातले तज्ञ असतील , आम्हाला आपल्या मार्गदर्शनाची , मदतीची गरज आहे. तरी कृपया आपण आमच्याशी संपर्क साधावा. हा जर प्रयोग यशस्वी झाला तर येत्या मार्च पर्यंत तुरीय लॅबच्या भागीदारी मध्ये २ स्टार्टअप चालू करायचा मानस आहे. १ स्टार्टअप महिला बचत गटाबरोबर तर दुसरा स्टार्टअप तरुण प्रगतिशील शेतकरीमित्रांबरोबर ...

so watch this space...

Happy to meet the principal and Assistant Prof of Bharti Vidyappeth college of Engineering for WomenWe have already been...
26/03/2022

Happy to meet the principal and Assistant Prof of Bharti Vidyappeth college of Engineering for Women

We have already been associated for sustainability program with them

Address

Walgude Wada
Pune
412301

Telephone

+919850964293

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Turiya Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share