Anandibai Karve Primary School.

Anandibai Karve Primary School. MKSSS alumni

आज आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 ची नव्या दिमाखात सुरुवात झाली. इयत्ता पहिली चा प्रवेशोत्स...
16/06/2025

आज आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 ची नव्या दिमाखात सुरुवात झाली. इयत्ता पहिली चा प्रवेशोत्सव अत्यंत उत्साहात व दिमाखात झाला.

आज बुधवार दि.11/12/2024 रोजी वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शांतता पुणेकर वाचत आहे. या उपक्रम...
12/12/2024

आज बुधवार दि.11/12/2024 रोजी वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शांतता पुणेकर वाचत आहे. या उपक्रमाचे आयोजन आमच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत करण्यात आले. परिपाठातील प्रार्थना घेऊन प्रत्येक विद्यार्थिनीला वर्ग वाचनालयातील पुस्तकाचे वाटप करण्यात आले व सर्वांना ते पुस्तक वाचण्यास सांगण्यात आले मूकवाचनाने विद्यार्थिनींनी दिलेल्या पुस्तकातील गोष्टीचा व आशयाचा आनंद घेतला विद्यार्थिनींबरोबरच शिक्षकांनीही पुस्तके वाचण्याचा आनंद दु.12.00 ते 1.00 या वेळात विद्यार्थिनींनी दिलेल्या पुस्तकाचे मनापासून वाचन केले. आपण काय वाचलं याचा थोडक्यात सारांश सर्व विद्यार्थिनींना वर्गात गेल्यानंतर लिहिण्यास सांगितले. मा. मुख्याध्यापिका प्रा. सौ.सुनंदाताई देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांचे कौतुक केले.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ऊर्जा क्रीडा स्पर्धा अंतर्गत आमच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेला सूर्यनमस्काराच्...
07/09/2024

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या ऊर्जा क्रीडा स्पर्धा अंतर्गत आमच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेला सूर्यनमस्काराच्या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटाला उपविजेते पद प्राप्त झाले आहे . सहभागी सर्व स्पर्धक ,मुख्याध्यापिका सविताताई रानडे व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन, तसेच चित्रकला स्पर्धा मध्ये इयत्ता ७ वीची जिजाऊ शेंडगे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले!!!!!!

आज शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४, रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत आनंदवार शनिवार मा. मुख्याध्यापिका श्रीम. सविताताई रानड...
03/08/2024

आज शनिवार दिनांक ३ ऑगस्ट २०२४, रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत आनंदवार शनिवार मा. मुख्याध्यापिका श्रीम. सविताताई रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली “दीपपूजन कार्यक्रमाचे” आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. प्राचार्या सविताताई रानडे उपस्थित होत्या. तसेच आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेच्या सर्व इ.१ली ते ७ वी तील विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग, पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाच्या सर्व छात्राध्यापिका व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रथमतः पारंपारिक दिव्यांचे पूजन करण्यात आले. दीपस्तुतीने आजच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांना आजच्या दिवसाची माहिती सांगण्यात आली. विद्यार्थ्यांना बहुविध दिव्यांविषयी माहिती देण्यात आली. माननीय प्राचार्या श्रीम. सविताताई रानडे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.त्यानंतर नियोजन केल्यानुसार सर्व विद्यार्थिनींनी मातीचे नाग तयार करण्याचा आनंद लुटला !!

गुरुपौर्णिमा       दि. २२ जुलै २०२४ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत “गुरुपौर्णिमा” अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली....
22/07/2024

गुरुपौर्णिमा
दि. २२ जुलै २०२४ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत “गुरुपौर्णिमा” अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी शालासमिती अध्यक्ष मा.श्रीम. सीमाताई कांबळे उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम.सविताताई रानडे, शाळेतील सर्व विदयार्थिनी, शिक्षक वर्ग व पार्वतीबाई अध्यापिका विदयालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, व सर्व छात्राध्यापिका कार्यक्रमास उपस्थित होत्या. कार्यक्रमात प्रशालेचा मंत्रिमंडळ निवडणूक निकाल जाहीर झाला व निवडून आलेल्या मंत्र्यांचा ‘शपथविधी’ पार पडला. तसेच इ. १ ली ते ७ वी तील विद्यार्थिनींचे प्रातिनिधिक स्वरूपातील शालेय किट वाटप झाले. कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्या मा. सीमाताई कांबळे यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेनिमित्त मार्गदर्शन केले. इ. १ ली ते ३ री च्या विद्यार्थिनींसाठी प्रशालेने “मातृपूजनाचे” आयोजन केले होते त्यानुसार विद्यार्थिनींनी मातृपूजन केले. तसेच माननीय सीमाताईंनी पालकांशी संवाद साधला. शेवटी माजी विद्यार्थिनी कु. शृंगेरी देशपांडे यांनी त्यांच्या गोड “किर्तन” शैलीतून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अशा विविध कार्यक्रमांची गुंफण असलेला आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम पार पडला.
जे जे आपणासी ठावे, ते दुसऱ्यासी देई, शहाणे करून सोडी सकळ जना,
तो ची गुरू खरा, आधी चरण तयाचे धरा.. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा !!!

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची       आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा,                                               कर...
27/06/2024

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची
आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा,
कर्वेनगर,पुणे-५२
🔹आज गुरूवार दिनांक २७ जून २०२४ रोजी नवीन शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा संस्थेच्या ' इचलकरंजी हॉलमध्ये ' शाळेच्या मा. मुख्या. श्रीमती सविताताई रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले. पालकांना उद्बोधनपर मार्गदर्शन मा. मुख्या. श्रीमती. सविताताई रानडे यांनी केले. ही सभा खालील विषयांसंदर्भात घेण्यात आली.
🌸 सभेत पालकांना शाळेची व संस्थेची माहिती,तसेच विविध योजनांची ओळख करुन देण्यात आली.
🌸 पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्यांची निवड देण्यात आली.
🌸 शालेय शिस्ती संदर्भात सूचना पालकांना देण्यात आल्या.
🌸 पालकांना वर्षभरातील विविध परीक्षा व बाह्य स्पर्धा या संदर्भात मार्गदर्शन आणि माहिती देण्यात आली.
सभेसाठी सर्व पालक उस्फूर्तपणे सहभागी झाले . कार्यक्रमाची सांगता आश्रमगीताने करण्यात आली.

दि. २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान द...
29/02/2024

दि. २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे हे आहे. दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ आपण साजरा करतो. इ. ५ वी ते ७ वी तील विद्यार्थिनींनी विविध शास्त्रज्ञांचा पेहराव करून त्यांची माहिती व त्यांनी लावलेला शोध याविषयी माहिती करून दिली. उदा. सी.व्ही.रमण, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, सर आयझॅक न्यूटन... इ.
माननीय मुख्याध्यापिकांच्या मार्गदर्शनातून विज्ञान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ज्ञानप्रबोधिनी संस्थेतील मान्यवर उपस्थित होते तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. सविताताई रानडे, सर्व प्राध्यापकवर्ग, शिक्षकवर्ग, इ. ६ वी व ७ वी तील सर्व विद्यार्थिनी व अध्यापिका विद्यालयाच्या सर्व छात्राध्यापिका उपस्थित होत्या. विज्ञान गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ज्ञान प्रबोधिनी संस्थेतून आलेल्या ताई व दादांनी विद्यार्थ्यांचे चार गट करून त्या प्रत्येक गटात ध्वनी व त्यावर आधारित कृती, जीवशास्त्रावरील कृती, भौतिक शास्त्रातील सोप्या कृती व त्यांची कारणे कृतीतून समजावून सांगितली. जसे की विद्यार्थिनी कडून सोप्या साहित्यातून माऊथ ऑर्गन, दृष्टी सातत्य, गर्जनारा कप, एकदल-द्विदल वनस्पती या सर्वांचा समावेश असलेल्या कृतींचा सहभाग घेऊन विद्यार्थिनींना विज्ञान म्हणजे ज्या गोष्टी दिसतात त्या का असतात असा विचार करण्यासाठी प्रवृत्त करतील अश्या कृतींचा समावेश केला. तसेच १ ली ते ५ वी तील विद्यार्थिनींनी वर्गात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला त्यामध्ये विद्यार्थिनींना स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून माहिती दाखविणे तसेच वर्गात प्रयोग घेणे हे उपक्रम घेण्यात आले. अशाप्रकारे आजचा विज्ञान दिन शाळेमध्ये साजरा झाला.

मराठी राजभाषा गौरव दिवसलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी,धर्म, पंथ एक जाणतो मराठी,एवढ्या जगात मा...
29/02/2024

मराठी राजभाषा गौरव दिवस
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी…
आज दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेत “मराठी राजभाषा दिन” साजरा करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिन हा दिवस प्रख्यात लेखक कवी कादंबरीकार कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. या दिनानिमित्त शाळेत मा. मुख्याध्यापिका सविताताई रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीम.सविताताई रानडे, पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाचे सेवाज्येष्ठ प्राचार्य मा. श्री. पिसे सर, प्रशालेच्या सेवाज्येष्ठ शिक्षिका मा. सौ. छायाताई लोखंडे, सर्व शिक्षक व इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींनी मराठी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात मराठी दिनाविषयी माहिती, गाणी, पोवाडा, पाळणा विविध समूहगीते जसे की ही मायभूमी ही कर्मभूमी, वेडात मराठे वीर दौडले सात, अभिमान गीत.... व छोट्या छोट्या बालचमुंनी राम जन्मला ग सखे, गीत रामायण यावर आधारित गाणी सादर केली. तसेच कवी कुसुमाग्रजांच्या कविता देखील सादर करण्यात आल्या. मा. पिसे सरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने झाली.
माय मराठी
साद मराठी भाषांचा भावार्थ मराठी
बात मराठी सात मराठी
जगण्याला या अर्थ मराठी

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांचा निमित्ताने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने...
04/02/2024

22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यांचा निमित्ताने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने श्रीराम प्रतिमा पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय सुट्टी असूनही विद्यार्थीनी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या व उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाल्या शाळेमध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

आज 26 जानेवारी 2024 भारताचा 75 वा. प्रजासत्ताक दिन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा ...
26/01/2024

आज 26 जानेवारी 2024 भारताचा 75 वा. प्रजासत्ताक दिन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मैदानावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. कर्नल सुहास पाठक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. जयंत इनामदार, सचिव मा. डॉ पी व्ही एस शास्त्री सर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
आमच्या आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी योगासनांचे उत्तम प्रात्यक्षिक सादर केले
प्रजासत्ताक दिनाची काही निवडक क्षणचित्रे !!
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!💐💐💐

13/01/2024

Address

Karvenagar
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anandibai Karve Primary School. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category