BloomFields..The pre-school

BloomFields..The pre-school BloomFileds.. House of Knowledge.. We help your child bloom the right way.. Please Gift your child a

अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब! 🌸🏆ब्लूमफिल्ड्स नर्सरी स्कूलच्या संस्थापक सदस्या व मुख्याध्यापिका मा. सौ. नूतन संदीप बड...
18/07/2026

अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब! 🌸🏆

ब्लूमफिल्ड्स नर्सरी स्कूलच्या संस्थापक सदस्या व मुख्याध्यापिका मा. सौ. नूतन संदीप बडदे मॅडम यांना शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय व अमूल्य योगदानाबद्दल “यशस्विनी महिला गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे, ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.

हा सन्मान त्यांच्या बालशिक्षणातील अविरत समर्पणाचा, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जोपासना, सांस्कृतिक जाणीव आणि दर्जेदार शिक्षण देण्याच्या त्यांच्या अथक प्रयत्नांचा गौरव आहे.

सन २०१७ मध्ये “ना नफा – ना तोटा” या उदात्त तत्त्वावर, समाजातील सर्व स्तरांतील मुलांना समान संधी देत मूल्याधिष्ठित शिक्षण मिळावे या ध्येयाने ब्लूमफिल्ड्स प्री-स्कूलची स्थापना करण्यात आली.

या उदात्त कार्यात संस्थापक सदस्या सौ. हेमलता निलेश घुले यांच्या सहकार्याने, सौ. नूतन बडदे मॅडम गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अपार समर्पणाने कार्य करत असून असंख्य बालकांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवत आहेत.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारताना मा. नूतन बडदे मॅडम यांनी हा सन्मान संपूर्ण ब्लूमफिल्ड्स परिवाराला—समर्पित शिक्षकवृंद, उत्साही विद्यार्थी आणि विश्वासू पालक—यांना समर्पित केला. हा पुरस्कार केवळ त्यांचा नसून, आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मा. सौ. नूतन बडदे मॅडम यांचे या मानाच्या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐

आपले समर्पण, संवेदनशीलता आणि निःस्वार्थ सेवाभाव आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील. आपल्या या यशाचा आम्हाला मनापासून अभिमान आहे. भविष्यातही आपल्या हस्ते अनेक पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल घडत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

🙏 विशेष आभार
मा. श्री. गणेश गायकवाड – महागणपती मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.
आणि
मा. सौ. स्वाती योगेश टिळेकर – राधिका स्वयं सहायता महिला बचत गट, हडपसर
यांचे, या सन्मानासाठी आणि त्यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

🌸 ब्लूमफिल्ड्स परिवारासाठी हा खरोखरच अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे! 🌸

परंपरेची शिदोरी आणि संस्कृतीचा गंध घेऊनBloomFields..The pre-school चे वार्षिक स्नेहसंमेलन यंदाही आनंद, उत्साह आणि अभिमान...
04/01/2026

परंपरेची शिदोरी आणि संस्कृतीचा गंध घेऊन
BloomFields..The pre-school चे वार्षिक स्नेहसंमेलन यंदाही आनंद, उत्साह आणि अभिमानाच्या वातावरणात दिमाखात पार पडले. या स्नेहसंमेलनाने केवळ एक कार्यक्रम न राहता, महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जिवंत सोहळा साकारला.

यावर्षीची संकल्पना होती - “महाराष्ट्राची लोकधारा”.
रामप्रहरी येणाऱ्या वासुदेवाच्या मधुर हाकेने कार्यक्रमाचा श्रीगणेशा झाला आणि त्यानंतर भूपाळी, महाराष्ट्र गीत, अभंग-भजन, भारूड, जागरण-गोंधळ, शौर्याने ओतप्रोत पोवाडा आणि ठसकेबाज लावणी अशा लोककलेच्या रंगांनी रंगमंच सजला.
चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेल्या या लोककलेच्या अविष्काराने प्रमुख पाहुणे, पालकवर्ग, हितचिंतक आणि उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद, निरागस भाव आणि आत्मविश्वास पाहून प्रत्येकाचे मन भरून आले.

या स्नेहसंमेलनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीपासून सुरू करण्यात आलेला “महादेववाडी भूषण” पुरस्कार. महादेववाडी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांचा गौरव करण्याचा हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम आहे.

या वर्षीचा पहिला मानाचा पुरस्कार अशा व्यक्तिमत्त्वाला देण्यात आला, ज्यांनी शून्यातून विश्व उभे केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून “Eagle Eyes Bouncer and Guard Services” या संस्थेच्या माध्यमातून सुमारे ५,००० युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारे, आणि भविष्यातही हजारो हातांना काम मिळावे या ध्येयाने कार्यरत असलेले, थोर गणेशभक्त — आमचे स्नेही, संस्थापक व CEO श्री. Manesh Ghule Patil (मनेश शंकरराव घुले पाटील) यांना “महादेववाडी भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले.

या प्रसंगी संकल्प सामाजिक संस्था, ढगाई ग्रामविकास संस्था तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आमचे बंधू श्री. उमेश कोंढाळकर यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

हा संपूर्ण सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. सपना बोटे, सौ. अंकिता श्रीवास्तव आणि सौ. विजयामावशी आल्हाट यांनी पडद्यामागे अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन शाळेच्या संस्थापिका सौ. हेमलता घुले आणि मुख्याध्यापिका सौ. नुतन बडदे यांनी अत्यंत कौशल्याने केले. नेहमीप्रमाणे संस्थापक श्री. निलेश घुले आणि श्री. संदीप बडदे यांनी मार्गदर्शनाची भक्कम साथ दिली. तसेच कु. आर्या घुले आणि कु. वेदांत बडदे यांनी पालकांसाठी छान प्रश्नोत्तरी घेऊन कार्यक्रमात रंगत आणली.

“ही शाळा केवळ शिक्षण देणारी नसून संस्कार घडविणारी संस्कारशाळा आहे,” असे गौरवोद्गार प्रमुख पाहुण्यांनी काढले. यावेळी गेल्या वर्षभरात शाळेत राबविण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

संस्कार, संस्कृती आणि समाजभान यांची सांगड घालणारे हे स्नेहसंमेलन उपस्थित प्रत्येकाच्या मनात एक सुंदर आठवण ठरून राहिले.

🌸 BloomFields..The pre-school - where vlaue Begin Early 🌸With immense pride and joy, BloomFields – The Pre-School cordia...
22/12/2025

🌸 BloomFields..The pre-school - where vlaue Begin Early 🌸

With immense pride and joy, BloomFields – The Pre-School cordially invites you all to celebrate our 9th Annual Day Function — a special milestone in our journey of nurturing young minds and strong values.

This year marks a meaningful beginning for us. Along with celebrating our little stars, we are introducing a new tradition — honouring an inspirational personality from our local community, someone whose life and work have created a positive impact on society.

The award, proudly instituted by BloomFields, is titled
🏆 “MahadeoWadi Bhushan” 🏆

This honour is presented to individuals who have made remarkable contributions in fields such as social service, entrepreneurship, education, healthcare, spirituality, and economic development, and who continue to inspire society through their journey.

🌟 The first recipient of the “MahadeoWadi Bhushan” Award is a true symbol of determination and self-made success —
a man who started his journey from zero, faced countless challenges, and today has become a source of livelihood for 5,000+ people.

It is our honour to announce:
Mr. Manesh Shankarrao Ghule Patil
Founder & CEO – Eagle Eyes Bouncers & Guards Services

His journey stands as a powerful reminder that dreams backed by courage, hard work, and social responsibility can transform lives — not just one, but thousands.

✨ We warmly invite you to join us in celebrating this inspiring journey, community pride, and the spirit of giving back.

With Atul Shivajirao Ghule Patil – BloomFields..The pre-school just got recognised as one of their top fans! 🎉Thank you ...
18/11/2025

With Atul Shivajirao Ghule Patil – BloomFields..The pre-school just got recognised as one of their top fans! 🎉
Thank you so much AtulJi!!

15/11/2025

Today we the BloomFields..The pre-school have a blast celebration of children's day with children and enthusiastic participation of grandparents.
Grandparents living their best life, reliving their childhood, and making unforgettable memories with their mini-mes! 🎉 It's heartwarming to see the enthusiasm and love they share with their grandkids. Those moments are truly priceless! 🙌 Kudos to all the grandparents and kids who made this Children's Day so special! 💕

🎉 Congratulations, Dr. Rajesh Khude! 🎉Proud moment for all of us at BloomFields Nursery School as our guide and constant...
20/09/2025

🎉 Congratulations, Dr. Rajesh Khude! 🎉

Proud moment for all of us at BloomFields Nursery School as our guide and constant supporter is elected Secretary of the Hadapsar Medical Association.

Your dedication, hard work, and selfless service to society are truly inspiring. Wishing you continued success and a positive impact in this new role!

Address

S. No. 33, Near Mahalaxmi Mandir, Krisha Nagar Road, Mohamadwadi
Pune
411060

Opening Hours

Monday 9am - 12:30pm
Tuesday 9am - 12:30pm
Wednesday 9am - 12:30pm
Thursday 9am - 12:30pm
Friday 9am - 12:30pm

Telephone

+919623824678

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BloomFields..The pre-school posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category