MSCE Pup Pss Pse Ups

MSCE Pup Pss Pse Ups In the academic year 1954-55, the Maharashtra State Government started a scheme to seek out
intellectual students and encourage them with a Scholarship.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ ची अंति...
29/05/2026

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६ ची अंतिम उत्तरसूची जाहीर करण्यात आलेली आहे.
📍 पुणे.

18/05/2026
📢 * महत्त्वाची सूचना * 📢इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रु...
18/05/2026

📢 * महत्त्वाची सूचना * 📢
इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

🌐 निकाल पाहण्यासाठी परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ :
www.mscepune.in
https://2026.puppssmsce.in

🗓️ गुणपडताळणी व शाळा माहिती प्रपत्र / विद्यार्थी आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती कालावधी :
१८ मे, २०२६ ते २७ मे, २०२६

खालील बाबींसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल :
• गुणपडताळणी
• विद्यार्थ्याच्या आवेदनपत्रातील माहितीत दुरुस्ती

⚠️ अर्ज फक्त शाळेच्या लॉगिनमधून स्वीकारले जातील. मुदतीनंतर किंवा ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

🏫 मुख्याध्यापकांनी विशेष लक्ष द्यावे :
• शाळेचे क्षेत्र (शहरी / ग्रामीण)
• शाळेचा अभ्यासक्रम
यामध्ये चूक असल्यास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संचावर परिणाम होऊ शकतो.

👨‍👩‍👧 पालकांसाठी सूचना :
विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख व इतर माहिती शाळेच्या जनरल रजिस्टरप्रमाणे अचूक आहे का ते तपासून घ्यावे. त्रुटी आढळल्यास त्वरित शाळेशी संपर्क साधावा.

📌 अंतिम गुणवत्ता यादी सर्व दुरुस्त्या व गुणपडताळणीनंतर जाहीर करण्यात येईल.

📢महत्त्वाची सूचना इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 - अंतरिम उत्तरसूची व आक्षेप नोंदणीमहाराष्ट्र राज्य प...
07/05/2026

📢महत्त्वाची सूचना

इ. 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 - अंतरिम उत्तरसूची व आक्षेप नोंदणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 4 थी व इ. 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

✅ उत्तरसूची पहा : https://2026-2.puppssmsce.in/

📍 ​महत्त्वाचे मुद्दे :

आक्षेप नोंदणी : उत्तरसूची किंवा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास, ते संबंधित संकेतस्थळावर दिनांक 14/05/2026 पर्यंत नोंदवता येतील.

नोंदणी पद्धत : शाळांना त्यांच्या लॉगीनमधून, तर पालकांना संकेतस्थळावरील थेट लिंकद्वारे आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहिती दुरुस्ती : शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहितीत काही दुरुस्ती (उदा. नाव, जन्मतारीख इ.) आवश्यक असल्यास, त्याबाबतचा अर्जही शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध आहे.

मुदत : विहित मुदतीनंतर (14 मे 2026 नंतर) प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा किंवा दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६विद्यार्थ्यांसाठ...
25/04/2026

प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी) व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी) दि. २६ एप्रिल, २०२६
विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा संदेश.💐💐💐

*📢 _शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ : 'अंतिम उत्तरसूची' (Final Answer Key) प्रसिद्ध !!!_ 🎓*महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फ...
30/03/2026

*📢 _शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ : 'अंतिम उत्तरसूची' (Final Answer Key) प्रसिद्ध !!!_ 🎓*

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या *पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी)* शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय *अंतिम उत्तरसूची (Final Answer Key)* परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

*📍 महत्त्वाचे मुद्दे :*

✅ *अंतिम उत्तरसूची :* १० मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या *'अंतरिम'* उत्तरसूचीवरील आक्षेपांची विषय तज्ज्ञांमार्फत पडताळणी करून ही उत्तरसूची *सुधारित (Final)* करण्यात आली आहे.

✅ *निकाल प्रक्रिया :* या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

✅ *सूचना :* या उत्तरसूचीतील उत्तरे *अंतिम* असून, यापुढे यासंदर्भात कोणताही पत्रव्यवहार किंवा आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत.

🌐 *येथे पहा आपली अंतिम उत्तरसूची :*
👉 https://2026.puppssmsce.in/

📌 *सर्व शाळा, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व संबंधित ग्रुपवर ही माहिती शेअर करावी.*

📢 अत्यंत महत्त्वाचे: इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ - प्रवेशपत्र जाहीर! 🎓सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, प...
27/03/2026

📢 अत्यंत महत्त्वाचे: इ. ४ थी व इ. ७ वी शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल २०२६ - प्रवेशपत्र जाहीर! 🎓

सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, परीक्षार्थी व पालकांनो,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक २६ एप्रिल, २०२६ रोजी आयोजित 'प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ४ थी)' व 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ७ वी)' ची प्रवेशपत्रे (Admit Cards) परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. 📝

✅ प्रवेशपत्र मिळवण्यासाठी प्रक्रिया :

१. 🌐 अधिकृत संकेतस्थळ https://2026-2.puppssmsce.in/ ला भेट द्या.
२. 🔑 शाळेचा युजर आयडी (User ID) आणि पासवर्ड (Password) वापरून लॉगिन करा.
३. 📄 विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा.
४. ✒️ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांचा शिक्का व स्वाक्षरी घ्यावी.

📍 महत्त्वाच्या सूचना :

१. 🔍 प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, वेळ, सूचना आणि परीक्षार्थ्याची सर्व माहिती काळजीपूर्वक तपासून योग्य असल्याची खात्री करावी.
२. 🚫 परीक्षेच्या दिवशी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.
३. ⏳ तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रवेशपत्रे वेळेत डाऊनलोड करून घ्यावीत.

- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे. 🏛️

📢महत्त्वाची सूचना शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ - अंतरिम उत्तरसूची व आक्षेप नोंदणीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेम...
10/03/2026

📢महत्त्वाची सूचना

शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी २०२६ - अंतरिम उत्तरसूची व आक्षेप नोंदणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची इयत्तानिहाय, माध्यमनिहाय व संचनिहाय अंतरिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

✅ उत्तरसूची पहा : https://2026.puppssmsce.in/

📍 ​महत्त्वाचे मुद्दे :

आक्षेप नोंदणी : उत्तरसूची किंवा प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांबाबत काही आक्षेप असल्यास, ते संबंधित संकेतस्थळावर दिनांक १७/०३/२०२६ पर्यंत नोंदवता येतील.

नोंदणी पद्धत : शाळांना त्यांच्या लॉगीनमधून, तर पालकांना संकेतस्थळावरील थेट लिंकद्वारे आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

माहिती दुरुस्ती : शाळा किंवा विद्यार्थ्यांच्या अर्जातील माहितीत काही दुरुस्ती (उदा. नाव, जन्मतारीख इ.) आवश्यक असल्यास, त्याबाबतचा अर्जही शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध आहे.

मुदत : विहित मुदतीनंतर (१७ मार्च २०२६ नंतर) प्राप्त होणाऱ्या आक्षेपांचा किंवा दुरुस्ती अर्जांचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

06/03/2026

📌 अत्यंत महत्त्वाचे: शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ ऑनलाईन अर्ज सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी विशेष सूचना!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह आवेदनपत्र भरण्याचा आज दि. ०६/०३/२०२६ हा शेवटचा दिवस आहे.
🔹 त्वरा करा! अंतिम क्षणी सर्व्हरवर येणारा ताण टाळण्यासाठी उर्वरित विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र तातडीने भरा
🔹 लक्षात ठेवा: नियमित शुल्काची सवलत आज रात्रीपर्यंतच उपलब्ध असेल.
माहिती पुढे शेअर करा जेणेकरून एकही पात्र विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही. 🤝

Address

MSBSHSE BUILDING, BEHIND AGHARKAR INSTITUTE, BHAMBURDA, SHIVAJINAGAR
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when MSCE Pup Pss Pse Ups posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MSCE Pup Pss Pse Ups:

Shortcuts

Share