MES Renuka Swaroop Memorial Girls High School,

MES Renuka Swaroop Memorial Girls High School, This is official page of Renuka Swaroop Memorial Girls Highschool and Jr. College. Pune 30.

                                                मंडळप्रमुख निवडणुक पदांसाठी नुकतीच लोकशाही पद्धतीने निवडणूक उत्साहात पार...
16/07/2026




मंडळप्रमुख निवडणुक पदांसाठी नुकतीच लोकशाही पद्धतीने निवडणूक उत्साहात पार पडली. या निवडणुकीत विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
निवडणुकीपूर्वी उमेदवारांनी विद्यार्थिनींसमोर आपले मनोगत व्यक्त करून प्रशालेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सर्व विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध रांगेत उभे राहून गुप्त मतदानाद्वारे आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केले. मतदान प्रक्रिया शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शांततेत, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली.
मा.मुख्याध्यापिका कांबळे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.जाधव सर,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी यांनी मतदान केले व त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या निवडणुकीमुळे विद्यार्थिनींना लोकशाही मूल्ये, मतदानाचे महत्त्व, जबाबदारीची जाणीव तसेच नेतृत्वगुण विकसित करण्याची मौल्यवान संधी मिळाली.

                                                            **महाकवी कालिदास दिन**आज दि.१५ जुलै २०२६ रोजीशाळेमध्ये महाकव...
15/07/2026




**महाकवी कालिदास दिन**

आज दि.१५ जुलै २०२६ रोजीशाळेमध्ये महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच संस्कृत भाषा व भारतीय संस्कृतीबद्दल त्यांच्यामध्ये आवड निर्माण व्हावी या उद्देशाने कालिदास दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कालिदास यांच्या काव्य, नाटके आणि साहित्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन, वक्तृत्व आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यात आले. भारतीय सांस्कृतिक वारशाबद्दल अभिमानाची भावना जागृत व्हावी आणि महान साहित्यिकांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतू होता. कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

10/07/2026



नमस्कार
संस्थेच्या वतीने पुढील काळात येणारे सण-उत्सव व आपल्या परंपरा या पर्यावरणपूरक या थीमवर सर्वत्र साजऱ्या व्हाव्यात अशा प्रकारची योजना केली आहे. या माध्यमातूनच आपण माजी विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. माजी विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळा-महाविद्यालयांशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित व्हावा व ज्यांची अद्याप पर्यंत नोंदणी झाली नसेल, त्यांची नोंदणीही करून घेता यावी, म्हणून आपण अनेक उपक्रम पुढील काळामध्ये आयोजित करणार आहोत. त्यातील पहिला उपक्रम हा पर्यावरणपूरक पंढरीची वारी असा असेल. या उपक्रमाद्वारे आपण आपल्या माजी विद्यार्थ्यांना आवाहन करावयाचे आहे की आपण पंढरीच्या वारीच्या मार्गावर अथवा ज्या ठिकाणी त्यांना शक्य होईल त्या ठिकाणी एक भारतीय वंशाचे झाड लावावे व त्याचा फोटो वर दिलेल्या फ्लायर्समध्ये दिलेल्या क्यूआर कोड वरती स्कॅन करून पाठवावा. अशा माजी विद्यार्थ्यांना आपण एक सर्टिफिकेट आणि त्यांना नोंदणीसाठी लिंक पाठविणार आहोत. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत हा फ्लायर पोहोचवण्याची व्यवस्था करावी.
पुढील काळात आपणाला पर्यावरणपूरक पंढरीची वारी याचबरोबर पर्यावरणपूरक रक्षाबंधन, पर्यावरण पूरक गणेशोत्सव व पर्यावरणपूरक दिपावली हे सण साजरे करताना विविध उपक्रम राबवायचे आहेत. तरी आपणा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की, हा फ्लायर जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यांची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करावा.
सर्वांना पंढरीच्या वारीच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद.

                                                                                *आनंदाची बातमी*   सन २०२५-२६ या शैक्षणिक...
08/07/2026




*आनंदाची बातमी*

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी च्या स्कॉलरशिप परीक्षेत रेणुका स्वरूप प्रशालेचे सुयश🎉🎉🎉🎉🎉

आर्या दिलीप बढे🥇
५ वी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत 💐💐💐

मनस्वी महेश देशमुखे🥇
८वी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत 💐💐💐*

आर्या व मनस्वी या विद्यार्थिनींचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन. त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशालेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक व कुटुंबीय या सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐

29/06/2026




#आर्यभट्ट मेन्स स्काॅलरशिप परीक्षा - 2025-26

आर्यभट्ट मेन्स स्काॅलरशिप परीक्षा - 2025-26 बक्षीस समारंभ - दि. 26/6/26 रोजी नितू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. इ. 8वी मधील 10 मुली या परीक्षेस बसल्या होत्या.
शाळेचा निकाल 100% लागला.
महर्षी आर्यभट्ट सुवर्णपदक स्काँलरशिप प्राप्त - कु. सौंदर्या संदीप दुडम.( इ. 8 वी. अबोली.)
रोख रक्कम - 1666 रू
प्रशस्तिपत्रक आणि सन्मान पदके मिळाली.
शाळा समन्वयक म्हणून सौ. दिवटे वर्षा मँडम यांना सन्मान चिन्ह
शाळा सहभाग करीता शाळेला सन्मानचिन्ह मिळाले.

Address

1453-54, Sadashiv Peth, Pune/
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when MES Renuka Swaroop Memorial Girls High School, posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to MES Renuka Swaroop Memorial Girls High School,:

Shortcuts

Share

Category