श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk

  • Home
  • India
  • Pune
  • श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk

श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk ६० वर्षांची यशाची परंपरा! गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी देणारे निमगाव केतकीतील अग्रगण्य

03/09/2026

निमगाव केतकीत 'स्व. अजितदादा AI Innovation Lab चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे दालन खुले!
निमगाव केतकी (प्रतिनिधी) :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संचलित श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निमगाव केतकी येथे दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी 'स्व. अजितदादा AI Innovation Lab' चा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व उद्घाटन
कार्यक्रमाची सुरुवात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा लाडके नेते स्व. अजितदादा पवार आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब आणि सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेब यांच्या शुभहस्ते 'स्व. अजितदादा AI Innovation Lab' चे थाटात उद्घाटन करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेबांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
यावेळी AIRG चे CEO श्री. प्रतापराव पवार, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, नृसिंह प्रतिष्ठानचे दत्तात्रय चादणे, शा.व्य. समितीचे माजी अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ, निलकंठ भोंग, सदस्य श्री. भिमराव बोराटे (नाना), आणि भा.ज.पा. तालुकाध्यक्ष श्री. राजकुमार जठार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशामुळे या सोहळ्याची शान आणखी वाढली. कार्यक्रमात खालील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला:
* आदित्य जाधव: गोळाफेक (Shot Put) राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा व त्याचे मार्गदर्शक: क्रीडा शिक्षक श्री. जाधव डी. डी. आणि श्री. मुजावर एस. आय यांचा तसेच
ईश्वरी चव्हाण: B.I.S. मधून राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा व तिचे मार्गदर्शक: विभागप्रमुख श्री. खंडागळे D. B. यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. बी. भोंग सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर इ. १० वी 'ड' मधील विद्यार्थिनी श्रावणी संतोष गदादे हिने आपले मनोगत व्यक्त केले, तर श्री. हैद्रे S. V. सर यांनी अध्यापक मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब, श्री. अतुलआप्पा मिसाळ आणि श्री. प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेबांनी शाळा भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी कटिबद्ध राहील, असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रामाणिक व आकर्षक सूत्रसंचालन श्री. योगेश आदलिंग सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मायादेवी मिसाळ यांनी मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) लॅब सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक व आनंदाचे वातावरण पसरले आहे. श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk Rajendra Ghadge Pramod Jadhav Adv Sachin Raut

निमगाव केतकीत 'स्व. अजितदादा AI Innovation Lab चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक...
03/09/2026

निमगाव केतकीत 'स्व. अजितदादा AI Innovation Lab चा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे दालन खुले!
निमगाव केतकी (प्रतिनिधी) :
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संचलित श्री केतकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, निमगाव केतकी येथे दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी 'स्व. अजितदादा AI Innovation Lab' चा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात संपन्न झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत, यासाठी सुरू करण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण लॅबमुळे विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व उद्घाटन
कार्यक्रमाची सुरुवात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष तथा लाडके नेते स्व. अजितदादा पवार आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबुरावजी घोलप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब आणि सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेब यांच्या शुभहस्ते 'स्व. अजितदादा AI Innovation Lab' चे थाटात उद्घाटन करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्यास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेबांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले.
यावेळी AIRG चे CEO श्री. प्रतापराव पवार, पंचायत समिती सदस्य रणजीत भोंग, नृसिंह प्रतिष्ठानचे दत्तात्रय चादणे, शा.व्य. समितीचे माजी अध्यक्ष अतुल (आप्पा) मिसाळ, निलकंठ भोंग, सदस्य श्री. भिमराव बोराटे (नाना), आणि भा.ज.पा. तालुकाध्यक्ष श्री. राजकुमार जठार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत मिळवलेल्या यशामुळे या सोहळ्याची शान आणखी वाढली. कार्यक्रमात खालील विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला:
* आदित्य जाधव: गोळाफेक (Shot Put) राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचा व त्याचे मार्गदर्शक: क्रीडा शिक्षक श्री. जाधव डी. डी. आणि श्री. मुजावर एस. आय यांचा तसेच
ईश्वरी चव्हाण: B.I.S. मधून राष्ट्रीय पातळीवरील प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल तिचा व तिचे मार्गदर्शक: विभागप्रमुख श्री. खंडागळे D. B. यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम. बी. भोंग सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर इ. १० वी 'ड' मधील विद्यार्थिनी श्रावणी संतोष गदादे हिने आपले मनोगत व्यक्त केले, तर श्री. हैद्रे S. V. सर यांनी अध्यापक मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. राजेंद्रजी घाडगे साहेब, श्री. अतुलआप्पा मिसाळ आणि श्री. प्रतापराव पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सहसचिव श्री. ए. एम. जाधव साहेबांनी शाळा भविष्यातही अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी कटिबद्ध राहील, असे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रामाणिक व आकर्षक सूत्रसंचालन श्री. योगेश आदलिंग सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मायादेवी मिसाळ यांनी मानले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) लॅब सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये सर्वत्र कौतुक व आनंदाचे वातावरण पसरले आहे.

✨ A New Chapter in AI Innovation Begins! ✨We are delighted to invite you to the inauguration of the *AIR G AI Innovation...
01/09/2026

✨ A New Chapter in AI Innovation Begins! ✨

We are delighted to invite you to the inauguration of the *AIR G AI Innovation Lab* ( AN Initiative under the global AI Transformation mission) —a space where ideas meet technology, curiosity meets creativity, and innovation shapes the future.

With the visionary leadership and progressive vision of *Pune District Education Association (PDEA)—an institution committed to shaping future-ready generations*

Your presence will make this special occasion even more meaningful. 🤝✨

📅 02September 2026 | 01:30 PM
📍 Shri. Ketkeshwar Highschool & Jr. College, Nimgaon Ketki.

29/08/2026

🎉 आपल्या श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk येथे आज 🎉
✨ रक्षाबंधन आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा! ✨
शाळेत 'रक्षाबंधन' आणि 'राष्ट्रीय क्रीडा दिन' अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
बंधन स्नेहाचे, नाते प्रेमाचे... रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थ्यांनी एकमेकांना राख्या बांधून हे पवित्र नाते साजरे केले.
त्याचबरोबर, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 'राष्ट्रीय क्रीडा दिन' साजरा करत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांच्या या सुंदर क्षणांची आणि त्यांच्या उत्साहाची एक खास झलक नक्की पहा! 👇

15/08/2026

श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk

🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष : ज्ञानाची गुढी आणि यशाची उत्तुंग भरारी! 🇮🇳​आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 'श्री केतकेश्वर...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिन विशेष : ज्ञानाची गुढी आणि यशाची उत्तुंग भरारी! 🇮🇳
​आज १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 'श्री केतकेश्वर विद्यालय, निमगाव केतकी' येथे ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर निमगाव केतकी गावातील सर्व आदरणीय ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा 'विशेष गुणगौरव सोहळा' संपन्न झाला. 💐✨
​या सोहळ्यात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षा, कला, विज्ञान, क्रीडा आणि पर्यावरण क्षेत्रात संपादन केलेल्या दैदीप्यमान यशाची झलक:
​🏆 स्कॉलरशिप परीक्षा:
• ५ वी - ५५ विद्यार्थी उत्तीर्ण (७ शिष्यवृत्तीधारक)
• ७ वी - ३० विद्यार्थी उत्तीर्ण (६ शिष्यवृत्तीधारक)
• ८ वी - ३ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
​🎓 विशेष सहकार्य व सन्मान: ७ वी स्कॉलरशिपमधील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेचे संचालक श्री. भीमराव नाना बोराटे यांच्या सौजन्याने विशेष गौरव करण्यात आला.
​🌟 इतर उल्लेखनीय यश:
• NMMS परीक्षा: २६ विद्यार्थी उत्तीर्ण (७४.२८% निकाल)
• डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा: १३ विद्यार्थी यशस्वी
• शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा: Elementary (९८.१८%) आणि Intermediate (९८.४८%) मध्ये घवघवीत यश
• BIS Club प्रश्नमंजुषा: कुमारी ईश्वरी शांताराम चव्हाण हिला राष्ट्रीय पातळीवर २५००/- रुपयांचे बक्षीस!
• इन्स्पायर अवॉर्ड (Inspire Award): अभिजित बाळासाहेब दीक्षित यास केंद्र सरकारकडून ₹१०,०००/- चा पुरस्कार
• हरित सेना उपक्रम: २५१ वृक्षारोपण, परसबाग आणि वन अधिकारी श्रीमती आशा भोंग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ₹२ लाख खर्चाची मोफत जंगल सफर
• क्रीडा विभाग: जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर दैदीप्यमान कामगिरी!
​❤️🎤
​सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक आणि पाठबळ देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार! 🙏✨

श्री संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री केतकेश्वर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk चे विद...
12/08/2026

श्री संत सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त श्री केतकेश्वर श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk चे विद्यार्थी, शिक्षक श्री आदलिंग सर Yogesh Adling सौ चांदणे मॅडम, श्रीमती माळी मॅडम विद्यालयाचे प्राचार्य श्री एम. बी. भोंग सर यांच्या समवेत. Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Pralhad Bankar, Dharaj Ajmire, Raj Patil

आजचा दिवस 'श्री केतकेश्वर विद्यालय' परिवारासाठी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे! आपल्या शाळेच्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांनी...
11/08/2026

आजचा दिवस 'श्री केतकेश्वर विद्यालय' परिवारासाठी सुवर्णाक्षरांनी लिहावा असा आहे! आपल्या शाळेच्या ६ गुणवंत विद्यार्थ्यांनी सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत थेट 'जिल्हा गुणवत्ता यादीत' धडक मारली आहे! 🏆🎉
पालकांनो, तुमच्या मुलांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे हे फळ आहे. तुमच्या संयमामुळे आणि पाठिंब्यामुळेच आज ही मुलं इतक्या मोठ्या यशाला गवसणी घालू शकली आहेत. तुमचं सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन! 💐👏
दिव्या, वेदिका, आदित्य, स्वरांजली, ओम आणि धनश्री - तुम्ही खऱ्या अर्थाने शाळेची शान आहात! तुमच्या प्रत्येक यशात आम्ही तुमच्यासोबत आहोत. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
या 'छोट्या चॅम्पियन्स'चे अभिनंदन करण्यासाठी एक 'लाइक' आणि 'कमेंट' नक्की करा! ❤️👍

माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी: वन्य प्राण्यांसाठी माणुसकीचा ओलावा! 🐾💧आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या शाळेच्या इय...
03/04/2026

माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी: वन्य प्राण्यांसाठी माणुसकीचा ओलावा! 🐾💧
आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या शाळेच्या इयत्ता १० वी, १९८७ च्या बॅचचा (अमेझिंग एसकेव्ही ८७ ग्रुप)!
निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर महाराज यात्रेचे औचित्य साधून, या माजी विद्यार्थ्यांनी वनीकरणातील वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी स्वखर्चाने टँकरद्वारे कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. कडक उन्हाळ्यात प्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये आणि त्यांचे अपघात होऊ नयेत, या उदात्त हेतूने गेली ४ वर्षे हा ग्रुप हा उपक्रम अविरतपणे राबवत आहे.
शाळेत मिळालेले संस्कार आजही हे माजी विद्यार्थी समाजकार्यातून जपत आहेत, ही विद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे. तुमच्या या कार्याला 'श्री केतकेश्वर विद्यालय' परिवारातर्फे सलाम! 🫡

*अधिक प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करून ठेवा आणि कृपया like share and subscribe करायला विसरू नका👍🏻*
*👇🏻You tube channel link 👇🏻*
https://youtube.com/?si=uxkOvjSMGPgE0MIh

*👇🏻 school page link👇🏻*
https://www.facebook.com/share/1AYEcR9UGG/

*👇🏻my page link👇🏻*
https://www.facebook.com/share/1CT8LTA2yP/
#माजीविद्यार्थी #सामाजिकबांधिलकी #वन्यप्राणीरक्षण

Address

निमगाव केतकी
Pune
413120

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी pdea skvnk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share