Study Point Academy

Study Point Academy Study Point Academy

     We have started 2 years program ' GURUKUL'  for std 11 th and 12th science students .It is residential and integrat...
07/05/2026





We have started 2 years program ' GURUKUL' for std 11 th and 12th science students .

It is residential and integrated. We work on habits ,hobbies and behaviour of students .

We have included Yoga , pranayam ,Motivational lectures ,balance diet , Art therapy ,Study tour and many more things to halp students to achieve the goal .

We have experience of 24 years in coaching of academic and Competitive exams.

Sanjay Mahajan
Founder Director
Study Point Academy ,Pune

Contact :
9822074488
7620272521

प्रिय विद्यार्थ्यांनो ,आजपासून आपण करियर मध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारी 10 सूत्रे पाहणार आहोत.सूत्र 1  *शिस्त आणि नियमि...
05/02/2026

प्रिय विद्यार्थ्यांनो ,

आजपासून आपण करियर मध्ये यशस्वी होण्यासाठी लागणारी 10 सूत्रे पाहणार आहोत.

सूत्र 1

*शिस्त आणि नियमितता*

शिस्तबद्ध विद्यार्थी ठरवलेले ध्येय पद्धतशीर रीतीने गाठू शकतो. योजना करून त्यानुसार काम केल्याने यशाची शक्यता वाढते.

नियमित अभ्यास, वेळेवर काम, वेळापत्रक पाळणे यामुळे गोंधळ, ताण कमी होतो आणि कामे सहज पूर्ण होतात.

नियमित अभ्यास केल्यास ज्ञान साठत जाते, विषय स्पष्ट होत जातात आणि परीक्षेपूर्वी धावपळ करावी लागत नाही.

शिस्तीत काम करणारा विद्यार्थी स्वतःवर विश्वास ठेवू शकतो, कारण त्याला माहित असते की तो योग्य मार्गाने सतत प्रयत्न करत आहे.

शिस्त आणि नियमितता ही केवळ अभ्यासासाठी नाही; ती आयुष्यभर यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या सवयी निर्माण करते.

म्हणूनच शिस्त आणि नियमितता या यश खेचून आणण्यासाठी लागणाऱ्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत.

Study Point Academy

संजय महाजन
डॉ.रश्मी खैरनार

9822074488
7030179704

02/02/2026


Admission open for std 8 th to 12 th
SSC and CBSE

EXCELLENT COACHING
BEST RESULTS
CONVINIENT LOCATION
AFFORDABLE FEES

25/01/2026
🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳*राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त स्टडी पॉईंट अकॅडमी येथे NDA प्रवेश परीक्षेबाबत मोफत सेमिनारचे आयोजन*राष्ट्...
25/01/2026

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

*राष्ट्रीय लष्कर दिनानिमित्त स्टडी पॉईंट अकॅडमी येथे NDA प्रवेश परीक्षेबाबत मोफत सेमिनारचे आयोजन*

राष्ट्रीय लष्कर दिनाचे औचित्य साधून स्टडी पॉईंट अकॅडमी येथे NDA प्रवेश परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना NDA परीक्षेची तयारी, अभ्यासपद्धती व करिअर संधींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमात पुढील मान्यवर वक्त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
1. प्रा. संजय महाजन
(Mathematician, अकॅडेमिक्स व स्पर्धा परीक्षांमध्ये 20+ वर्षांचा अनुभव)
2. प्रा. गौरव माने
(G*T Expert, अकॅडेमिक्स व स्पर्धा परीक्षांमध्ये 15+ वर्षांचा अनुभव)
3. तन्वी साबळे
(NDA लेखी परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण व एक वेळा SSB क्रॅक केलेली विद्यार्थिनी)
स्टडी पॉईंट अकॅडमीच्या आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांनी NDA परीक्षेत घवघवीत यश संपादन करून NDA मध्ये भरती मिळवली आहे, ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे.
या प्रसंगी प्रा. गौरव माने तसेच NDA लेखी परीक्षा दोन वेळा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी तन्वी साबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
*संस्थेत NDA करिता 2 वर्षाचा अभ्यासक्रम घेतला जातो.*.

*भविष्यातही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल करिअरसाठी अशा प्रकारचे करिअर मार्गदर्शन सेमिनार सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.*

हा सेमिनार यशस्वी करण्यात ॲडमिन डायरेक्टर डॉ.रश्मी खैरनार , सौ.अर्चना महाजन , शहाजी साबळे सर , अभिजित शिंदे , आर्या कहार , प्रणित शेलार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रा.संजय महाजन
डॉ.रश्मी खैरनार

संपर्क:
9822074488
7030179704

CBSE BOARD हे आपल्या देशातील सर्वात आवडते बोर्ड..आणि आता महाराष्ट्रात सुद्धा लोकप्रिय होत असलेले बोर्ड.CBSE (Central Boa...
11/01/2026

CBSE BOARD

हे आपल्या देशातील सर्वात आवडते बोर्ड..आणि आता महाराष्ट्रात सुद्धा लोकप्रिय होत असलेले बोर्ड.

CBSE (Central Board of Secondary Education) हे बोर्ड भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.

*सीबीएसई चा आराखडा* NCERT ( National Council of Educational Research and Training) ने विकसित केलेल्या एनसीएफ ( National Curriculum Framework)वर आधारित आहे. CBSE चा अभ्यासक्रम तयार करतांना , विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची शिक्षण प्रणाली तयार करणे आणि संपूर्ण भारतात एकसारखी शिक्षण पद्धत अंमलात आणणे..हे उद्दिष्ट ठेवण्यात आले .

*CBSE बोर्ड मधून शिक्षण का घ्यावे?*
1) हे बोर्ड CCE ( Continuous Comprehensive Evaluation) ला महत्त्व देत असल्याने सतत परीक्षा आणि त्या आधारे विद्यार्थ्याचे मूल्यमापन करणे , ह्यावर भर देते .

2) CBSE बोर्ड हे विद्यार्थ्याच्या scholastic (अभ्यास ) आणि Co scholastic (सर्वांगीण विकास ) ह्या दोन्ही बाजूंवर कार्य करते .ह्यासाठी बोर्ड त्या प्रमाणे आवश्यकतेनुसार परीक्षा , अनेक उपक्रम आणि कला कौशल्य ,खेळ ह्यांचा समावेश करते.

3) विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी तयार करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास आणि मनोबल तयार करते .ह्या साठी CBSE ची परीक्षा पद्धती उत्कृष्ट अशी आहे.

4)परीक्षेमध्ये फक्त पाठ्य पुस्तकांमधून प्रश्न येत नसल्याने विद्यार्थ्यांना reference books मधून ही जादा अभ्यास करावा लागतो..उदा. R.D.Sharma , R.S.Agrawal, Arihant , Oswal , NCERT Exampler , S.Chand इत्यादी.

5) ह्या मुळे मुलांची विचार करण्याची दिशा आणि शक्ती वाढते .तिन्ही प्रकारचे thinking चा विकास होतो.
1) Logical thinking
2) Creative thinking
3) Critical thinking

6) जे पालक केंद्र किंवा राज्य शासनाची नोकरी करत असतील त्यांना बदली झाल्यास सीबीएसई बोर्ड ची शाळा नवीन शहरात उपलब्ध असते .( सरकारी किंवा खाजगी) .अभ्यासक्रम पूर्ण भारतात सारखा असल्याने विद्यार्थ्याला त्याच्या academic progress मध्ये अडथळा येत नाही.

7) भारतातील उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षा उदा. आयआयटी , आयसर, बिट्स पिलानी , राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( NDA) ,आयआयएम , NID , NIFT , अशा अनेक परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक स्तरावर तयार करण्याचे काम CBSE बोर्ड करते.

8)CBSE बोर्ड संपूर्ण देशात 16 विभागात काम करते तसेच 6 आखाती देशांमध्ये ( Gulf countries )सुद्धा कार्यरत आहे.
ओमान , कतार ,सौदी अरेबिया , कुवैत, बहरीन आणि अरब अमिरतीस
ह्याचा फायदा ह्या देशांमध्ये नोकरी किंवा व्यवसायानिमित्त रहात असलेल्या भारतीय नागरिकांना होतो.त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे भारतीय शिक्षण मिळण्याची सोय होते.

अजूनही अनेक फायदे CBSE बोर्ड च्या विद्यार्थ्यांना मिळतात .

अधिक माहितीसाठी :
www.cbse.nic.in

चला पुन्हा भेटू लवकरच...

प्रा.संजय महाजन
(गणितज्ञ व शिक्षण तज्ञ)
डॉ.रश्मी खैरनार
(समुपदेशक व शिक्षण तज्ञ)

STUDY POINT ACADEMY
आनंदनगर , सिंहगड रोड ,पुणे
संपर्क : 9822074488
7030179704

www.sanjaymahajan.com





Online Education template Based on HTML5.

06/01/2026

आदरणीय पालक मंडळी

नमस्कार 🙏
*आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत शिकवले पाहिजे?*

सध्याच्या काळात सहसा सर्व पालकांना पडणारा हा प्रश्न ..
म्हणून आज आपण *भारतातील शिक्षण पद्धती* विषयी थोडी माहिती घेऊ या.

आपल्या देशात सध्या मुख्यतः 4 प्रकारचे बोर्ड आहेत.
1) STATE BOARD
2) CBSE
3) ICSE
4) IGCSE किंवा IB

आता वर लिहिलेल्या क्रमानेच त्यांची काठिण्य पातळी असते .(म्हणजे सर्वात सोपा अभ्यास हा स्टेट बोर्ड चा असतो तर सर्वात अवघड हा IGCSE चा असतो.)

*स्टेट बोर्ड*
हे बोर्ड प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळाच्या (SCERT ) च्या नियंत्रणाखाली असते .अभ्यासक्रम ठरविणे, क्रमिक पुस्तके तयार करणे ,परीक्षा पद्धती चे स्वरूप ठरवणे असे सर्व काही SCERT ठरवते. त्या राज्या ची भाषा ही अभ्यासक्रमात प्रथम भाषा असते .

*स्टेट बोर्ड मधून शिक्षण कोणी घ्यावे ?*
1) ज्यांना असे वाटते की आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे..म्हणजे concept चांगले समजतात .सर्व विषयांचे आकलन नीट होते.
2) विशेष म्हणजे गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत असल्याने ( सेमी इंग्लिश) उच्च शिक्षणात अडचण येत नाही .
3) इतर विषय समाज शास्त्र ( इतिहास ,भूगोल, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र )वगैरे मराठी ( किंवा मातृभाषेत ) मध्ये असल्याने समजण्यास सोपे जातात .
3) समाजशास्त्र इंग्रजी मध्ये असल्यास काही विद्यार्थ्यांना (vocabulary) शब्दसंग्रह च्या अडचणीमुळे विषय अवघड वाटतो .
4) अभ्यास इतर बोर्डांच्या तुलनेने सोपा असल्याने पाल्यांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी( तबला, कराटे , चित्रकला , मैदानी खेळ इ.) व्यायाम करण्यासाठीं किंवा व्यक्तिमत्त्व विकासा साठी आणखी काही करण्यास वेळ देता येतो.
5) थोडक्यात विद्यार्थ्यांची 360 डिग्री म्हणजेच सर्वांगीण विकास करण्यासाठी थोडा वेळ अधिक मिळतो .
6) इतर बोर्डांच्या शाळेच्या तुलनेने स्टेट बोर्ड च्या शाळेची फी कमी असते .
ह्याशिवाय ही इतर कारणे असू शकतात.

तर मंडळी , पुढील लेखात आपण पाहू या ..
*CBSE बोर्ड ची माहिती...*

प्रा.संजय महाजन
( गणितज्ञ आणि शिक्षण तज्ञ )

डॉ.रश्मी खैरनार
( शिक्षण तज्ञ व समुपदेशक )
STUDY POINT ACADEMY,
सिंहगड रोड , पुणे
आदरणीय पालक मंडळी

नमस्कार 🙏
*आपल्या पाल्यांना कोणत्या शाळेत शिकवले पाहिजे?*

सध्याच्या काळात सहसा सर्व पालकांना पडणारा हा प्रश्न ..
म्हणून आज आपण *भारतातील शिक्षण पद्धती* विषयी थोडी माहिती घेऊ या.

आपल्या देशात सध्या मुख्यतः 4 प्रकारचे बोर्ड आहेत.
1) STATE BOARD
2) CBSE
3) ICSE
4) IGCSE किंवा IB

आता वर लिहिलेल्या क्रमानेच त्यांची काठिण्य पातळी असते .(म्हणजे सर्वात सोपा अभ्यास हा स्टेट बोर्ड चा असतो तर सर्वात अवघड हा IGCSE चा असतो.)

*स्टेट बोर्ड*
हे बोर्ड प्रत्येक राज्याच्या शिक्षण मंडळाच्या (SCERT ) च्या नियंत्रणाखाली असते .अभ्यासक्रम ठरविणे, क्रमिक पुस्तके तयार करणे ,परीक्षा पद्धती चे स्वरूप ठरवणे असे सर्व काही SCERT ठरवते. त्या राज्या ची भाषा ही अभ्यासक्रमात प्रथम भाषा असते .

*स्टेट बोर्ड मधून शिक्षण कोणी घ्यावे ?*
1) ज्यांना असे वाटते की आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे..म्हणजे concept चांगले समजतात .सर्व विषयांचे आकलन नीट होते.
2) विशेष म्हणजे गणित व विज्ञान हे विषय इंग्रजीत असल्याने ( सेमी इंग्लिश) उच्च शिक्षणात अडचण येत नाही .
3) इतर विषय समाज शास्त्र ( इतिहास ,भूगोल, अर्थशास्त्र आणि नागरिकशास्त्र )वगैरे मराठी ( किंवा मातृभाषेत ) मध्ये असल्याने समजण्यास सोपे जातात .
3) समाजशास्त्र इंग्रजी मध्ये असल्यास काही विद्यार्थ्यांना (vocabulary) शब्दसंग्रह च्या अडचणीमुळे विषय अवघड वाटतो .
4) अभ्यास इतर बोर्डांच्या तुलनेने सोपा असल्याने पाल्यांना त्यांचे छंद जोपासण्यासाठी( तबला, कराटे , चित्रकला , मैदानी खेळ इ.) व्यायाम करण्यासाठीं किंवा व्यक्तिमत्त्व विकासा साठी आणखी काही करण्यास वेळ देता येतो.
5) थोडक्यात विद्यार्थ्यांची 360 डिग्री म्हणजेच सर्वांगीण विकास करण्यासाठी थोडा वेळ अधिक मिळतो .
6) इतर बोर्डांच्या शाळेच्या तुलनेने स्टेट बोर्ड च्या शाळेची फी कमी असते .
ह्याशिवाय ही इतर कारणे असू शकतात.

तर मंडळी , पुढील लेखात आपण पाहू या ..
*CBSE बोर्ड ची माहिती...*

संजय महाजन
( गणितज्ञ आणि शिक्षण तज्ञ )

डॉ.रश्मी खैरनार
( शिक्षण तज्ञ व समुपदेशक )

STUDY POINT ACADEMY,
आनंदनगर ,सिंहगड रोड , पुणे

9822074488
7030179704




Address

Sinhgad Road, Hingne Khurd
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Study Point Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category