04/01/2023
स्वयं महेश: श्वसुरो नगेश:
सखा धनेशस्तनयो गणेश :
तथापि भिक्षाटनमेव शम्भो:
बलीयसी केवलमीश्वरेच्छा ll
स्वतः प्रत्यक्ष महादेव, ज्याचा पुत्र गणांचा ईश, विद्या दाता, प्रत्यक्ष कुबेर ज्याचा मित्र असूनही, प्रत्यक्ष हिमालय पर्वत ज्याचा सासरा अशी नात्यांची श्रीमंती असूनही जो व्याघ्रचर्म नेसतो गळ्यात सर्प धारण करतो, आणि भिक्षा मागत फिरतो! काय म्हणावे याला ... खरोखर ईश्वराची इच्छाच बलवती हेच खरे!