26/07/2026
https://www.facebook.com/share/p/1EUp4biGNC/
डॉ. विजयकुमार काळे यांना सायकॉलॉजीमध्ये डॉक्टरेट पदवी प्रदान
दिल्ली, २६ जुलै: मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठात आज झालेल्या विशेष समारंभात डॉ. विजयकुमार काळे यांना सायकॉलॉजी या क्षेत्रात "डॉक्टरेट" म्हणजेच मानद पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या हिप्नोथेरपी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांना हा सन्मान दिला आहे.
मानसिक आरोग्य आणि हिप्नोथेरपीच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याची प्रशंसा यावेळी विद्यापीठ प्रशासनाने केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. अरविंद कुमार (माजी कुलगुरू, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशी), डॉ. इंदुभूषण मिश्रा (कुलगुरू, पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ), डॉ.रेखा चौहान (शिक्षण संचनालय नवी दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.
या मानाच्या सन्मानामुळे डॉ. विजयकुमार काळे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
26/07/2026