Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52

Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52, Education, Karvenagar, Pune.

Parvatibai Adhyapak Vidyalaya is a dynamic institution with unrivalled reputation in pre -service training of elementary teachers, established with the inspiration of Parvatibai Athawale.

07/04/2025
आपल्याला शिक्षिका व्हायचं आहे का ? मग आपला प्रवेश आजच निश्चित करा. 18/05/2023

📚 ☣💫🇵 🇯 🇨 🇪 💫 ☣ 📚
🇰 🇦 🇷 🇻 🇪 🇳 🇦 🇬 🇦 🇷 💫

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे,*
पार्वतीबाई अध्यापिका विद्यालय कर्वेनगर,
पुणे ५२.

➡ *प्राथमिक शिक्षिका व्हायचंय ?*

👉 पुढील link वर जाऊन आजच आपला प्रवेश निश्चित करा. शासनाच्या अनुदानित अध्यापिका विद्यालयात मर्यादित जागा, आपली नावनोंदणी पुढील google form द्वारे त्वरित करा.

https://forms.gle/84aRxyKg1hiQ8mjy8

➡ *डी.एल.एड् प्रवेशाची सुवर्ण संधी !*

➡ माफक शुल्कामध्ये शासकीय *अनुदानित* विद्यालयात प्रवेश

📚 *अध्यापिका विद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :-*
१) १०६ वर्षांची उज्ज्वल परंपरा
२) माध्यम - मराठी
३) सुसज्ज इमारत, क्रीडांगण, भव्य परिसर व निवासाची उत्तम व्यवस्था
४) अनुभवी व उपक्रमशील प्राध्यापक वर्ग
५) वसतिगृहाची सोय
६) गरीब, गरजू विद्यार्थिनीना माफक फी व कमवा आणि शिका योजनेचा लाभ
७) शिक्षक पात्रता परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व मार्गदर्शन
८) आदर्श शिक्षक कौशल्य विकास (Soft Skill Development) मार्गदर्शन
९) Spoken English, MS-CIT, Job-Interview, Personality Development इ. चे विशेष मार्गदर्शन

♦👉 *विद्यालयाच्या खास वैशिष्ट्यपूर्ण माहितीसाठी पुढील website ला भेट द्या.*
website :- pjcekarvenagar.org

➡ *प्रवेशाची पात्रता :-*
१) खुला (Open) संवर्ग :
१२ वी किमान ४९.५०% गुण
२) मागासवर्ग संवर्ग :-
१२ वी किमान ४४.५०% गुण

☎ *अधिक माहितीसाठी संपर्क :-*
१) कार्यालय : 020-25472575
ई मेल - [email protected]
Website - pjcekarvenagar.org
२) श्री. प्रकाश पिसे 9923796537
३) सौ. शुभांगी तांबट 9922419278
४) सौ. अनिता पवार 9921354754
५) सौ. मनिषा लोंढे 7744065385
६) श्री. धर्मेंद्र मोरे 9175494930

आपल्याला शिक्षिका व्हायचं आहे का ? मग आपला प्रवेश आजच निश्चित करा. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीमध्ये १०६ वर्ष अतिशय दिमाखदारपणे उभे अ...

Photos from Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52's post 14/05/2023

प्राथमिक शिक्षिका होण्याची सुवर्णसंधी
शैक्षणिक वर्ष 2023-24

Photos from Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52's post 10/10/2022

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, आनंदीबाई कर्वे व पार्वतीबाई आठवले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ! आज पार्वतीबाई आठवले यांचा ६८ वा स्मृतिदिन संपन्न झाला.

05/10/2022

*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*
*कर्वेनगर, पुणे ४११०५२*

*आग्रहाचे निमंत्रण*

संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आणि सेवक (पुणे शहर) यांचा

*स्नेहमेळावा*

आत्मीय सुहृद,
सस्नेह नमस्कार

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था गेली १२६ वर्षे ‘स्त्री शिक्षणातून स्त्री सबलीकरण’ हा ध्यास घेऊन कार्यरत आहे. विद्यार्थिनी, शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी या नात्याने आपण संस्थेच्या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. त्या अर्थाने आपण सर्व जण संस्थेच्या विशाल कुटुंबाचे सदस्यच आहात.

अशा सर्व परिवार-सदस्यांच्या *कौटुंबिक स्नेहमेळाव्याचे’* आयोजन *शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी संस्थेच्या कर्वेनगर आवारातील इचलकरंजी सभागृहात दुपारी ठीक ४ वा.* संस्थेने केले आहे.

एकत्रित वार्तालाप, संस्थेच्या सध्याच्या कामाविषयी माहिती आणि अल्पाहार असे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे.
आपण या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे.

आपला स्नेहांकित

*सचिव*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था*

Photos from Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52's post 29/01/2022

*आजादी का अमृत महोत्सव*
*SCERT पुणे आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे* यांच्या वतीने आयोजित *आजादी का अमृत महोत्सव* या उपक्रमांतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या *पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाच्या वतीने* २८जानेवारी २०२२ रोजी समूहगीत स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीते सादर केली. सदर स्पर्धा ह्या *मा. प्राचार्या रानडे मॅडम* यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन
पद्धतीने घेण्यात आल्या. स्पर्धेत विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदवला तसेच दर महिन्याला होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा निश्चय केला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या *मा. प्राचार्या डॉ. शोभा खंदारे पवार* यांनी सदर स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थिनींना सहभागाची संधी उपलब्ध करून दिली त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.

09/10/2021

भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवनकार्याची माहिती देणारा विशेष कार्यक्रम

15/08/2021

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!

Photos from Parvatibai Adhyapika Vidyalay Karvenagar Pune 52's post 07/08/2021

डी. एल. एड प्रवेश प्रक्रिया 2021-22

21/06/2021

१०५ वर्धापन दिन
२० जून २०२१ रोजी पार्वतीबाई अध्यापिका विद्यालयाचा १०५ वा वर्धापनदिन अतिशय उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यालयाच्या शाला समिती अध्यक्षा मा. सौ. सीमाताई कांबळे यांनी पार्वतीबाईंच्या जीवन प्रवासातील प्रेरणादायी अनुभव सांगून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सीमाताईंच्या हस्ते वॉटर कूलर व नवीन प्रिंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी देणगी मिळवून देणाऱ्या सौ. स्मिता कर्वे व श्री. उदय कर्वे उपस्थित होते. विद्यालयाच्या प्राचार्या मा. प्रा. सविताताई रानडे यांनी विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचे गोड अनुभव कथन केले. विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत सर्व आजी माजी प्राचार्य, अध्यापकाचार्य, विद्यार्थीनीं, संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचा सिंहाचा वाटा आहे. पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देवून विद्यालयासाठी रु. २१०००/- ची देणगी दिली. यावेळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सौ. अश्विनी बिडकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्वरचित काव्य सादर करून विद्यालयासाठी रु. ५०००/- ची देणगी सीमाताईंकडे सुपूर्द केली. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ. शुभांगी तांबट यांनी केले तर ऑनलाईन प्रक्षेपण श्री. धर्मेंद्र मोरे यांनी केले. विद्यालयाचे श्री. प्रकाश पिसे, सौ. अनिता पवार, सौ. मनिषा लोंढे, सौ. श्रुती धोडपकर, सौ. शीतल कडू, सौ. सविता वेदपाठक, श्री. विक्रम शिंदे, श्री. विजय कांबळे, श्री. अजित पतके, सौ. छाया कोळी आदी उपस्थित होते.

Want your school to be the top-listed School/college in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Karvenagar
Pune
411052