VPS College of Engineering

VPS College of Engineering Science, technology & engineering

तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ८ मार्च २०२३ येथील व्ही.पी.एस.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , लोणावळा...
09/03/2023

तळेगाव स्टेशन (संपादक - डॉ.संदीप गाडेकर) दि. ८ मार्च २०२३ येथील व्ही.पी.एस.कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , लोणावळा येथे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सोनी राघो यांनी महिला दिनानिमित्त थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमावेळी सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या व केक कट करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमावेळी प्रा.सोनी राघो, प्रा. प्रीती चोरडे, प्रा. रश्मी भुंबरे, प्रा. मनीषा कचरे, सौ. पूजा साठे, कु. सुप्रिया पेठकर, कु. स्वाती म्हस्के, कु. प्रीतीजा घोलप, आणि सर्व कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

लोणावळा (प्रतिनिधी):व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रम 2023 चे उद्घाटन दि.27 र...
09/03/2023

लोणावळा (प्रतिनिधी):व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक व कला-क्रिडा कार्यक्रम 2023 चे उद्घाटन दि.27 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच आठवडा भरात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

उद्घाटनाच्या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अशोक ठाकूर व इतर विभाग प्रमुख हरिश हरसूरकर, प्रा. सोनी राघो व प्रा. प्राणेश चौव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आडठवड्याभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाची रूपरेशा ठरवीण्यात आली.

लोणावळा :तळगाव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर, दि. 14 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या स्...
09/03/2023

लोणावळा :

तळगाव स्टेशन (संपादक- डॉ.संदीप गाडेकर, दि. 14 व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग कॉलेज लोणावळा येथे विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फ्रेशर पार्टीचे आयोजन दिनांक १० डिसेंबर २०२२ सेरेनिटी रिसॉर्ट लोणावळा मध्ये करण्यात आले. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त करत असताना संस्थेकडून व महाविद्यालयाकडून काय अपेक्षा आहे याबाबत मनोगत व्यक्त केले.

तिसऱ्या व अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुण सादर केले प्राचार्य डॉक्टर मानव अ. ठाकूर यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते महाविद्यालयातील अध्ययन- अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्यांनी विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कला गुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते

विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयांमधील सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता झाली.

लोणावळा :तळेगांव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन 3 डिसेंबर 2022 रोजी व्ही. ...
09/03/2023

लोणावळा :

तळेगांव दाभाडे (संपादक - डॉ. संदीप गाडेकर) विद्या प्रसारिणी सभेचा 100 वा वर्धापन दिन 3 डिसेंबर 2022 रोजी व्ही. पी. एस. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणावळा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थ्यांसह शिक्षक, प्राध्यापक, मुख्याध्यापक यांनी एकत्र येत या शैक्षणिक उत्सवात सहभाग घेतला.

संस्थेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने शताब्दीमहोत्सवी वर्षाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. गो. व्यं. शिंगरे, सचिव डॉ.स.बी.गवळी तसेच अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य डॉ. मानव आ. ठाकुर हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास श्रीमती निशा नाईक या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. तसेच अभियांत्रिकी शाखेचे तीनही विभागप्रमुख, अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहाराने करण्यात आले होते.

लोणावळा : व्हिपीएस इंजिनिअरिंग कॉलेज, वाकसई लोणावळा येथे 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंत...
09/03/2023

लोणावळा : व्हिपीएस इंजिनिअरिंग कॉलेज, वाकसई लोणावळा येथे 19 फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मानव अ. ठाकूर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ठाकूर यांच्या हस्ते "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या मुर्तीचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. त्यानंतर महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मनोगत व्यकार केले तसेच पोवाडे सादर केले. आणि प्रथम वर्ष इंजिनिअरींगच्या विदयार्थ्यांनी लेझीम सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याचे बहुमोल सहकार्य लाभले.

Computer Lab
02/08/2022

Computer Lab

Address

Lonavala
Pune
410405

Alerts

Be the first to know and let us send you an email when VPS College of Engineering posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to VPS College of Engineering:

Shortcuts

Share