देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

  • Home
  • India
  • Pune University
  • देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कृषि महाविद्यालय, पुणे
अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे देशी गोसंवर्धनाचे काम करत आहे

देशी गोवंश संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल.🇮🇳महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अजितदादा पवार देशी गाय...
24/07/2026

देशी गोवंश संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल.🇮🇳

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे येथे शुध्द देशी गोवंश जतन व संवर्धन दिनानिमित्त भव्य देशी गोवंश प्रदर्शन, परिसंवाद, मार्गदर्शिका प्रकाशन व शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. कृषिमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झाले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी देशी गोवंशाचे संवर्धन, आधुनिक संशोधन, शेतकरी प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि देशी वंशांचे जतन याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. देशी गोवंशाच्या माध्यमातून शाश्वत शेती, नैसर्गिक शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला लाभलेला शेतकरी, पशुपालक, संशोधक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशी गोवंश संवर्धन चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरला.

देशी गोवंश संवर्धन हेच समृद्ध शेती आणि आत्मनिर्भर भारताचे बळ!

23/07/2026

Animal Husbandry Research Centre: देशी गाईंचे महत्त्व दिवसेंदिवस अधोरेखित होत असून, अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र ....

23/07/2026
22/07/2026
22/07/2026
22/07/2026
22/07/2026
22/07/2026

शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

देशी गोवंश हा आपल्या कृषी संस्कृतीचा, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शाश्वत शेतीचा भक्कम आधार आहे. त्याचे जतन व संवर्धन ही काळाची गरज आहे.

महाराष्ट्र शासन देशी गोवंश संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवत असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील 'अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'च्या माध्यमातून संशोधन व संवर्धनाला नवी दिशा मिळत आहे.

या दिनानिमित्त सर्व शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांनी देशी गोवंशाच्या संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या समृद्ध कृषी परंपरेचे जतन करूया.

#देशीगोवंश #गोवंशसंवर्धन #शाश्वतकृषी #शेतकरीहित #महाराष्ट्र

20/07/2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै २०२६ पासून पुण्यात राज्यस्तरीय #कृषी व #पशुधन #प्रदर्शन..
#पुणे
#कृषीपशुधनप्रदर्शन
#अजितपवार
#शेतकरी
#महाराष्ट्रशासन

Address

Shivajinagar Pune
Pune University
411005

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share