Surashree Kesarbai Kerkar High School

Surashree Kesarbai Kerkar High School Surashree Kesarbai Kerkar High School , Located in beautiful keri village SKKHS is run in the beautiful promises which was built by Surashree Kesarbai Kerkar

16/03/2025

Inauguration of Upgraded Computer Lab at the Hands of Dr. Anil Desai

शिक्षा सदन – स्मृतींचे मोहोळ     गोमंतक (24 जुलै 22)मुकेश थळी      आपला पाया शाळा व शिक्षक घडवतात. हायस्कूलचं शिक्षण मी ...
24/07/2022

शिक्षा सदन – स्मृतींचे मोहोळ
गोमंतक (24 जुलै 22)
मुकेश थळी
आपला पाया शाळा व शिक्षक घडवतात. हायस्कूलचं शिक्षण मी प्रियोळच्या शिक्षा सदन हायस्कूलात घेतलं. गोवा मुक्तीनंतर गोव्यात गावोगावी अगोदर प्राथमिक शाळा नंतर हायस्कूलं सुरू झाली. सेंत्रु एदुकादोर सोसायटीने पांच हायस्कूल्स सुरू केली. प्रियोळ, केरी, गावणे, कुंडई, पंचवाडी. शिक्षा सदनात माझे मामा, मावशी शिकल्या होत्या. मी फार लहान होतो. त्यांच्यासमवेत स्नेहसंमेलनाला जात होतो. तिथं कोंकणी संशळ कल्लोळ पाहिलं. मुख्याध्यापक सुमंत केळेकर यांचा ताकदी अभिनय पाहिला. हे बहुविध कलाकार मुंबईत शास्त्रीय गाणं शिकले होते. स्कूलात खेळ, विज्ञान प्रदर्शनं असे भरगच्च कार्यक्रम असायचेच. माशेलहून सुध्दा मुलं या स्कूलात शिकायला यायची.
नंतर 1973 साली मी पाचवीत प्रवेश घेतला. मुलं खूप असायची. पाचवीचे दोन्ही विभाग वर सांतेरी मंदिराकडील अग्रशाळेंत भरत. लाकडी पट्ट्या असलेली एक बाजू. दगडी चिऱ्यांचं प्रकरण. कौले प्राचीन कयल्यांची. सोसाट्याचा वारा आला अथवा फांदी पडली तर कौलं फुटून पाणी यायचं. छोटंसं छिद्र जरी वर झालं तर पावसाची गळती डोक्यावर व्हायची. दुरून चालत मुलं यायची. भरपूर भिजली तर सरळ घरी पाठवत. सुट्टी, मज्जा! पाचवी झाल्यानंतर सहावीत बढती दिल्यासारखे मुख्य इमारतीत बसवत.
तरीही बंदिस्त जागेत सांस्कृतिक कार्यक्रम अथवा वक्तृत्व स्पर्धा असल्यास त्या अग्रशाळेतच घेत. दोन वर्गामधलं लाकडी पार्टीशन काढून, बांक काढून त्याचा हॉल करत. तिथं आम्ही एकांकीका स्पर्धाही घेतल्या.
शिक्षा सदनाला एक वैभवशाली इतिहास आहे. कला, संगीत, खेळ अशी गौरवशाली परंपरा आहे. शाळेसभोवती निसर्गरम्य माहोल आहे. पावसाळ्यात वाघ मागे लागल्यासारखा तुरूतुरू द्रूतगतीने पळणारा ओढा शाळेमागे आहे. भक्ती ही शक्ती हा मंत्र जागवणारं सांतेरी देवीचं मंदीर वरच्या बाजूला आहे. वर टेकडीवर महान साहित्यीक रवीन्द्र केळेकरांचं भव्य घर. त्याच्यामागे डोंगर व पायथ्याशी जायांचे मळे. स्कूलाच्या परीघात माड, पोफळी, केळी, अननस, हिरवेगार शेतीचे गालिचे, थंडगार कुळागर असा जीव वेडापिसा करणारा हरीत प्रांत, अगदी शांत. विसावा आणि आराम यांचे हिंदोळे घ्यावे असे हे ठिकाण.
अशा या आल्हाददायक भवतालाच्या स्कूलात माझ्या व्यक्तिमत्वाची व हाडांची घडण झाली. पोषण झालं. चांगले शिक्षक मिळाले. संस्कारक्षम वयात मुलांवर काय बिंबवलं जातं हे महत्वाचं ठरतं. प्रमोद प्रियोळकर सर हे शास्त्रीय संगीताचं ज्ञान असलेले गायक. ते सकाळी एसेम्ब्लीच्या वेळी समूहगीते संपूर्ण विद्यार्थीवर्गाला शिकवायचे. शांत दांत वज्र कांत वंद्य हिंद देवते, हे बाकीबाबांचे गीत त्यांनी आम्हांला शिकवले. एका ताला- सुरात मुलांकडून घोटवून घेणं हा खेळ नव्हे. त्यांचीच चाल, संगीत रचना होती. अजून मला पाठ आहे. ती गोड रचना मी फार खुषीत असतो व शिक्षा सदनाच्या स्मृती-मोहोळात रमतो तेव्हा गुणगुणत असतो. शाळेच्या रम्य, स्मरणरंजनात्मक यात्रेत सहभागी होणं हा माझा विरंगुळा होय. स्मृतींचे कितीतरी आल्बम दिसू लागतात. दृश्यफितीसारखे सरकत राहतात.
हल्लीच या माझ्या स्कूलच्या मुख्याध्यापिका शोभा प्रियोळकर यांनी मला शिष्यवृती प्रदान सोहळ्यात मुख्य पाहुणा म्हणून बोलावलं. माजी विद्यार्थ्यांकडून मुलांना प्रेरणा मिळावी हा त्यांचा हेतू. बाहेर पाऊस होताच. आतून भावभावनांच्या आठवणींचा पाऊस जोरकसपणे उसळी मारून बाहेर येऊ पाहत होता. मी हेलावून गेलो. अप्रतिम सोहळ्याचं आयोजन मी माझ्या शाळेत पाहत होतो. दोन वर्षांनी सांस्कृतिक कार्यक्रम होत होता. रांगोळी, सजावट, संगीत...लाजवाब. संगीत शिक्षक आता शाळेत येतात. आरंभी दोन गीतं सादर केली. त्यात माझ्या आवडत्या हंसध्वनी रागावर स्वागतम हे गीत होतं. मुलांचं कौतुक करावं तितकं कमी. खास पेहरावात मुली गात होत्या. आनंदाची तीव्रता वाढली.
शिक्षिकांनी आपापल्या सादरीकरणाची तयारी चोख केली होती. त्यांच्या निवेदनाचे उच्चार व वक्तृत्व यात उर्जा, खणखणीतपणा व स्वच्छता होती. टीव्हीवर बातम्या वाचू शकतील इतकी. नाटककार उल्हास नायक भेटले. शिक्षिका सुचिता सतरकर ही गुणी निवेदिका आहे. मला विसर पडलेल्या माझ्या कवितांच्या पंक्ती त्यांनी पेश केल्या. शालेय आठवणी जागवाव्या अशी विनंती त्यांनी मला भाषणापूर्वी केली. मला भावूक झाल्यासारखे वाटले. गहिवरून आलं. कंठ दाटला. मी सुचतील ते स्मृती कपाटातील कप्पे मुलांना उलगडून दाखवले.
शिक्षा सदनने मला घडवले. मुख्य़ाध्यापक रवीन्द्र नमशीकर यांनी मला प्रेम, उत्तेजन दिले. ते हुशार होते. त्यांच्याशी एकाडेमीक वाद घालण्यास मला आवडे. ते संतापून चिडत व लालबुंद होत. मला वक्तृत्व स्पर्धा व कथाकथन स्पर्धेत स्वत: घेऊन जात.
कला अकादमीतील एकांकीका स्पर्धेत आम्ही एकांकिका सादर करत. मुलींचा गट समई नृत्य व इतर नृत्य सादर करीत. बक्षिसे आणली. आनंद आणला.
माझी प्रगती पाहून नमशीकर सरांनी माझ्यासाठी शिक्षकांच्या खास बैठका घेतल्या. अखेरीस 1979 मध्ये एस.एस.सी परीक्षेत मी गोवा बोर्डात दुसरा आलो तेव्हा ते माझ्यापेक्षा जास्त हर्षित झाले. त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू मी विसरू शकत नाही. गुणवत्तेच्या स्तरावर शिक्षा सदन पहिल्यांदाच चमकलं होतं. पुलकीत शिक्षक हर्षभरीत झाले.
तथापि शिष्यवृत्ती सोहळ्यानिमित्त माझ्या शाळेची भरभराट पाहून मला अत्यानंद झाला. शिशुवाटिका सुरू झाली आहे. सभागृह फारच सुंदर. विशेष कारण बाह्य निसर्गसौंदर्य व हिरवाई.
कार्यक्रम संपवून मी बाहेर आलो. शाळेचं आणि आपलं एक प्रेमळ, मधुर, तरल, सुंदर नातं असतं. ज्या शाळेत मी शिकलो, जिथं माझी बुन्याद घडली, त्या शाळेचे चिरे कुणी तरी आणले होते. त्या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी त्या वास्तूला, संस्थेला देणं लागतो ही भावना प्रखरतेने प्रज्वलीत झाली. डोळे पाणावले. पावसाची रिमझिम चालू होती. डोळ्यातील पाणी की ‘वावझडी’चं पाणी हे निरोप देणाऱ्या शिक्षकांना नाही कळालं, ते बरं झालं...

02/06/2022

Its 7th consecutive years
SKK High School SSC results...100%
Congratulations all

padmaawards.gov.in
13/07/2021

padmaawards.gov.in

𝑷𝒓𝒂𝒏𝒂𝒄𝒉𝒂𝒓𝒚𝒂 𝑫𝒂𝒅𝒂 𝑽𝒂𝒊𝒅𝒚𝒂 𝒎𝒖𝒔𝒕 𝒃𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅𝒆𝒅 𝒇𝒐𝒓 𝑷𝒂𝒅𝒎𝒂 𝑨𝒘𝒂𝒓𝒅 ..... 𝑻𝒉𝒆 𝒅𝒆𝒂𝒅𝒍𝒊𝒏𝒆 𝒇𝒐𝒓 𝒐𝒏𝒍𝒊𝒏𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅𝒂𝒕𝒊𝒐𝒏𝒔 𝒊𝒔 𝑺𝒆𝒑𝒕𝒆𝒎𝒃𝒆𝒓 1...
12/07/2021

𝑷𝒓𝒂𝒏𝒂𝒄𝒉𝒂𝒓𝒚𝒂 𝑫𝒂𝒅𝒂 𝑽𝒂𝒊𝒅𝒚𝒂 𝒎𝒖𝒔𝒕 𝒃𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅𝒆𝒅 𝒇𝒐𝒓 𝑷𝒂𝒅𝒎𝒂 𝑨𝒘𝒂𝒓𝒅 ..... 𝑻𝒉𝒆 𝒅𝒆𝒂𝒅𝒍𝒊𝒏𝒆 𝒇𝒐𝒓 𝒐𝒏𝒍𝒊𝒏𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅𝒂𝒕𝒊𝒐𝒏𝒔 𝒊𝒔 𝑺𝒆𝒑𝒕𝒆𝒎𝒃𝒆𝒓 15. 𝑷𝒓𝒊𝒎𝒆 𝑴𝒊𝒏𝒊𝒔𝒕𝒆𝒓 𝑵𝒂𝒓𝒆𝒏𝒅𝒓𝒂 𝑴𝒐𝒅𝒊 𝒉𝒊𝒎𝒔𝒆𝒍𝒇 𝒉𝒂𝒔 𝒂𝒑𝒑𝒆𝒂𝒍𝒆𝒅 𝒕𝒐 𝒕𝒉𝒆 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆 𝒕𝒐 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅 𝒔𝒖𝒄𝒉 𝒉𝒂𝒓𝒅𝒘𝒐𝒓𝒌𝒊𝒏𝒈 𝒑𝒆𝒓𝒔𝒐𝒏𝒂𝒍𝒊𝒕𝒊𝒆𝒔. 𝑻𝒉𝒆𝒔𝒆 𝒂𝒘𝒂𝒓𝒅𝒔 𝒂𝒓𝒆 𝒏𝒐𝒘 𝒈𝒊𝒗𝒆𝒏 𝒐𝒏 𝒕𝒉𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆 𝒑𝒆𝒐𝒑𝒍𝒆. 𝑫𝒂𝒅𝒂 𝑽𝒂𝒊𝒅𝒚𝒂'𝒔 𝒘𝒐𝒓𝒌 𝒊𝒔 𝒆𝒙𝒕𝒓𝒂𝒐𝒓𝒅𝒊𝒏𝒂𝒓𝒚. 𝑻𝒉𝒆 𝒓𝒆𝒄𝒐𝒈𝒏𝒊𝒕𝒊𝒐𝒏 𝒐𝒇 𝒉𝒊𝒔 𝒘𝒐𝒓𝒌 𝒊𝒔 𝒕𝒉𝒆 𝒉𝒐𝒏𝒐𝒓 𝒐𝒇 𝒕𝒉𝒆 𝑮𝒐𝒆𝒎𝒌𝒂𝒓𝒔. 𝑬𝒗𝒆𝒓𝒚𝒐𝒏𝒆 𝒔𝒉𝒐𝒖𝒍𝒅 𝒓𝒆𝒄𝒐𝒎𝒎𝒆𝒏𝒅 𝑫𝒂𝒅𝒂 𝒇𝒐𝒓 𝒕𝒉𝒆 𝑷𝒂𝒅𝒎𝒂 𝑽𝒊𝒃𝒉𝒖𝒔𝒉𝒂𝒏 / 𝑩𝒉𝒂𝒓𝒂𝒕 𝑹𝒂𝒕𝒏𝒂 𝒂𝒘𝒂𝒓𝒅. 𝑭𝒐𝒓 𝒕𝒉𝒊𝒔, 𝒈𝒐 𝒕𝒐 𝒉𝒕𝒕𝒑𝒔://𝒑𝒂𝒅𝒎𝒂𝒂𝒘𝒂𝒓𝒅𝒔.𝒈𝒐𝒗.𝒊𝒏 𝒂𝒏𝒅 𝒄𝒐𝒎𝒑𝒍𝒆𝒕𝒆 𝒕𝒉𝒆 𝒓𝒆𝒒𝒖𝒊𝒓𝒆𝒅 𝒔𝒖𝒃𝒎𝒊𝒔𝒔𝒊𝒐𝒏𝒔.

दादा वैद्य.......

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला गोमंतकातील बहुतांश जनता सुप्तावस्थेत होती. अज्ञानात होती. धर्म समीक्षण सभेच्या भयावह घटनेनंतर सर्वार्थाने पीडित होती. अशावेळी या समाजाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, त्या समाजसुधारकांमध्ये प्राणाचार्य रामचंद्र पांडुरंग तथा दादा वैद्य यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
आयुर्वेद शिक्षण साहित्य, कला , उद्यमिता समाजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये दादांनी तन-मन-धनाने काम केले आहे. पोर्तुगीजांच्या धर्मछळा अगोदर आणि नंतरही काही वर्ष वैद्य कुटुंबीय रायबंदर जवळच्या पनवेल गावात राहत होते. तिथून त्यांनी आपली कुलदेवी श्री विजयादुर्गा असलेल्या फोंडा तालुक्यातल्या केरी गावात स्थलांतर केलं.

केरी गावातल्या करमळें वाड्यावर ०८ सप्टेंबर १८५९ साली दादांचा जन्म झाला॰ दादांचे वडील पांडुरंग रामचंद्र वैद्य पानवेलकर हेही कुशल लोकप्रिय नामवंत वैद्य होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले दादा वैद्य हे वैद्य पनवेलकर घराण्यातल्या सहाव्या पिढीतले वैद्य. दादांचे प्राथमिक शिक्षण घरीच म्हणजे केरीत झालं. अक्षर ओळख, संस्कृत अध्ययन झाल्यानंतर वैद्यकीय ग्रंथांचाही त्यानी अभ्यास केला. पंधरा वर्षांचे असताना वडील आजारी पडून कर्णबधिर झाल्यामुळे दादांच्या शिक्षणात खंड पडला त्यामुळे घरी येणाऱ्या रोग्यांना तपासण्याची जबाबदारीही दादांवर अचानकपणे पडली. त्यामुळे पुस्तकी शिक्षणांत खंड पडला तरीही दादांना प्रात्यक्षिक ज्ञान अफाट मिळालं. वडील बरे होईपर्यंत दादा २२ वर्षांचे झाले होते. त्याना पुढच्या शिक्षणाला बाहेरगावी जाण्यासाठी घरच्यांची परवानगी नव्हती त्यामुळे दादांना बाहेर जाता आलं नाही. त्याकाळी गोव्यात रेल्वे मार्ग बनवण्याचे काम चालू झालं होतं. हजारो मजूर आणि त्यांच्यावर देखरेख करणारे युरोपियन अधिकारी असा लवाजमा त्याकाळी सावर्डे ते दूधसागर या मार्गावर ठिकठिकाणी राहत असे. सहाजिकच या मजुरांना अपघात, आजार, ताप या गोष्टी तिथे नित्याच्याच झाल्यामुळे बेळगावचे डॉक्टर माधव नारायण जोगळेकर यांची तिथल्या सरकारी दवाखान्यात नेमणूक झाली होती. तिथे त्यांच्याकडे जाऊन दादांनी ॲलोपॅथी शिक्षण घेतलं त्यानंतर दीड वर्षापर्यंत दादांनी सावर्ड्याला राहून आणि डॉक्टर जोगळेकर बेळगावला परतल्यानंतर अधून-मधून तिथे जाऊन पाश्चात्त्य वैद्यक शास्त्रावर आधारित मराठी ग्रंथांचा अभ्यास केला. दादांनी कुठल्याही कॉलेजमध्ये जाऊन वैद्यकीय पदवी घेतली नाही त्यांची आयुर्वेदातली निपुणता आणि अनुभव पाहून मुंबईच्या आयुर्वेदिक महाविद्यालयाने स्वतः त्यांना ‘प्राणाचार्य’ ही उपाधी दिली. ज्याकाळी गोव्यात एकदोन श्रीमंतांच्या घरातच केवळ मोटारगाड्या होत्या अशा काळी दुर्गम गावात स्वखर्चाने होडी, माचुल अथवा पायी जाऊन दादानी रोग्यांवर उपचार केले. पोर्तुगीज आमदानीत गोव्यात वैद्यकीय सेवा फारच कमी प्रमाणात उपलब्ध होती त्यातूनच नव्या काबीजादीत सरकारी डॉक्टर सोडून दुसरा डॉक्टरच नव्हता. पणजी मडगाव सोडून कुठेही शिकलेली सूईण सुद्धा मिळणं दुरापास्त होतं. हिंदू समाजात मुलींना जेमतेम मराठी शिक्षण मिळत असे. दादांनी आपले पोर्तुगीज मित्र डॉक्टराच्या सहाय्याने महाविद्यालयात मुलींना मराठीतून परीक्षा देता येईल असा ठराव पास करून घेतला. नंतर समाजातल्या विविध वर्गातल्या मुलींना स्वतःच्या खर्चाने पणजीत राहण्याची आणि शिकण्याची सोय करून दिली. त्यावेळच्या या आधुनिक परिचारिकांना नगरपालिकांमध्ये आपला वशिला लावून नोकरी मिळवून दिली याचा फायदा बाळंतिणी व मुलांना होऊ लागला.
आपल्या संस्कृतीवर घाला घालणं हाच पोर्तुगीजाचा प्रमुख उद्देश होता त्यामुळे आयुर्वेदिक वैद्यकशास्त्रावर पोर्तुगिजांनी अनेक निर्बंध लादले होते. पण ज्यावेळी दादांच्या औषधाने खुद्द गवर्नर साहेबांचा मुलगा वाचला तेव्हा पोर्तुगीज शासकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या घटनेनंतर दादांना आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्याचा खास परवाना मिळाला. एक नामवंत आयुर्वेदाचार्य म्हणून त्यांची कीर्ती दिगंतात पसरली होती. गोव्या बाहेर जाऊनही त्यांनी रोग्यांची सेवा केली आहे. कोल्हापूरच्या महाराजांच्या कुटुंबातल्या बाई खूप आजारी होत्या. नामवंत डॉक्टरांचे औषध करूनही त्यांना गुण आला नव्हता त्यावेळी दादांना सन्मानानं कोल्हापुरात घेऊन जाण्यात आले आणि तिथं महिनाभर राहून दादांनी त्या बाईवर उपचार करून तीला बरं केलं। त्याकाळी पणजीत शाकाहारी खानावळ नव्हती. दादा पणजीला जाताना स्वतःचा स्वयंपाकी व जेवणाचे सामान घेऊन जात असत. पणजीत जाणार्या लोकांची गैरसोय दूर होण्यासाठी दादांनी एक घर भाड्याने घेऊन १९१२-१३ साली तिथे खाणावळ सुरू केली। पणजीत आल्यावर तेही तिथेच राहत असत हवेली कुर्टी येथे त्यांनी दुर्गा भवन रसशाला नावाचा आयुर्वेदिक औषधे तयार करण्याचा कारखाना सुरू केला. केरीच्या निसर्गरम्य परिसरातून हव्या असलेल्या वनस्पती आणण्यासाठी त्यांनी काहीजणांना औषधी झाडांची ओळख करून दिली आणि त्याना रोजगार उपलब्ध करून दिला . एखादा रोगी तपासायला आला तर त्याच्यासाठी जेवणखाण , राहण्याची सोय , मोफत उपचार आणि गरज लागली तर परतीच्या प्रवासासाठी वाट खर्चाला पैसेही देण्यासाठी दादा मागेपुढे पाहत नव्हते. पणजीत हिंदू युरोपीय औषधालय नावाचे दुकान मालकांना विकायला काढलं त्यावेळी दादांचे मित्र विष्णू धेंपे यांच्या सल्ल्याने त्यांनी ते विकत घेतलं. अशा तऱ्हेने १९११ साली फार्मसीया हिंदू ची स्थापना झाली. पुढे खूप वर्ष हिंदू फार्मसीत केरी आणि हवेलीत तयार झालेली आसव आरिष्ट चूर्ण काष्टौषधी आणि श्री धूतपापेश्वर लिमिटेड पनवेल या कंपनीचे तयार उत्पादन मिळत असत. अजूनही पणजीतलं हिंदू फार्मसी आस्थापन श्री राज वैद्य यांच्या व्यवस्थापनाखाली चालू आहे. दादांनी तयार केलेल्या फॉर्मुलेचा थंडीचा कसाय आणि मुलांची कडूपुडी आजही हिंदू फार्मसीत उपलब्ध असते. भारताच्या सर्वांगीण प्रगतीविषयी दादांना फार तळमळ होती
गोमंतकाचा आणि नक्कीच भारताचा विकास औद्योगिकीकरण केल्याने होईल यावर त्यांचा विश्वास होता। त्यांचा प्रयत्नानी फोंड्यात जपानी हातमागाच्या कारखानाही सुरू झाला. १९२१ च्या चळवळीपासून दादांनी खादीचा वापर सुरू केला. या हातमागावर तयार झालेले कपडे ते वापरत होते. मयडे येथे त्यानी कौलांचा कारखाना काढला. शिक्षणाचे महत्त्व जाणून त्यांनी फोंड्यात गोवा विद्याप्रसारक मंडळ ही संस्था स्थापन केली. या संस्थेसाठी लागणारी इमारत सुद्धा त्या काळी दादांनीच संस्थेला दिली होती. गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या आल्मेदा कॉलेजात पुस्तकी शिक्षणासोबत औद्योगिक शिक्षणही द्यावं असा त्यांनी आग्रह धरला आणि त्यासाठी एक स्वतंत्र शिक्षकाची नेमणूकही केली. दादांना शेती व्यवसाय अवगत होता. साहित्यक्षेत्रात दादांचे कार्य अतुलनीय आहे त्यांनी प्राची प्रभा हे मराठीत आणि लुज दि ओरियंट हे पोर्तुगीज भाषेत मासिक सुरू केलं. हळदी कुंकू हे बायकांसाठी मासिक सुरू करून आपल्या अर्धांगिनी सरस्वतीबाई वैद्य यांच्याकडून त्याची मराठी आवृत्ती संपादित करून घेतली. पथ्यबोध मासिक स्फुरण गीता काव्य तरंगिनी खंड १ आणि २ मृत्युंजय नाटक ही त्यांची साहित्यसंपदा.
गोमंतकात कलेचा प्रसार व्हावा या हेतूने त्यांनी एक नाटक कंपनी काढली होती. तत्कालीन सामाजिक परिस्थिती व काही चुकीच्या समजुतीमुळे बाटलेल्या अर्थात हिंदू धर्मातून इतर धर्मात गेलेल्या पण मन, आचरण संस्कृती या दृष्टीने हिंदूच असलेल्या काही बांधवांना शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचा उपक्रम सुरु करण्यास दादांनी अनेक प्रयत्न केले व तो तडीस नेला. भारताच्या स्वातंत्र्याविषयी आणि नक्कीच गोमंतकात स्वातंत्र्याविषयी त्याना फारच तळमळ होती. ६ मार्च १९४७ ला रात्री साडेदहा वाजता ते ब्रह्मलीन झाले. प्राणाचार्य दादा वैद्य यांनी गोमंतकाच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय तसेच औद्योगिक इतिहासाला समृद्ध केले त्यांचे स्फूर्तीदायक आयुष्य आम्हा सगळ्यांना प्रेरणादायक आहे.```
- सुभाष जाण (केरी-फोंडा-गोवा)
१२ जुलै २०२१

_I request you to get further information about this great personality and make online nomination for posthumous Bharat Ratna/Padmavibhushan Award for him. This prestigious award will make every Goan feel proud. I humbly request you to take lead and send online nomination for this Award. At least, we can make an effort to send nomination.The work of Pranacharya Dada Vaidya is enormous and in many fields and every Goan and Indian will be proud, if he is nominated. Forward it to all you know and request them to send nominations for Dada Vaidya_

30/05/2021

Naiki Devi, the Gujarati Queen from Goa Who Defeated Muhammad Ghori

गोंयकार रणरागिणी नायकीदेवी.. समजून घेवंया हो इतिहास....

26/05/2021

पूजा MBBS झाली हो.......


अनेक दुखःद बातम्यांमधेच आज सकाळी एक सुखद, अभिनंदनीय आणि आल्हाददायक बातमी धडकली आणि लगेच माझं पेन ती बातमी टिपून तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी सरसावलं.
हो , आमची पूजा MBBS झाली. कोण पूजा ? पूजा नंदकुमार नाईक ( सातोडे - केरी ) घरात पाच भावंडं आणि आई वडिल. दीक्षा, निकिता,पूजा, दीप्ती आणि दत्तप्रसाद. केरीच्या सूरश्री केसरबाई केरकर शाळेत शिकताना या मुलीनी पहिला नंबर कधी सोडलाच नाही. कुठेही ट्यूशन्स न घेता शाळेतल्या शिकवणीच्या आधारावर या मुलांनी अगदी परीश्रमपूर्वक मार्कस मिळवले नव्हे कमावले. चिकाटी , जीद्द, आणि अविरत प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे काय ?ती ह्या मुलींकडून शिकावी. घरची परिस्थिती अगदी जेमतेम. वडील नंदू रोजंदारीवर कामाला आणि आई घरी. पण या आई वडिलांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी काहीही कमी पडू दिलं नाही. या मुलींनी पण आई-वडीलांची मेहनत वाया जाऊ दिली नाही. दीक्षानं दोन वर्षां आधी आपलं B.Ds पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं तर आज पूजा गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS उत्तीर्ण झाली. संपूर्ण गोव्यात तीनं सातवा क्रमांक पटकावलाय. पूजा तशी जात्याच हुशार हजरजबाबी. देवानं तिच्या मापात रुप आणि बुद्धी भरभरून टाकलीय. शिक्षकांच्या मागे लागून आपल्या शंका , प्रश्न सोडवून घेताना मी तीला अनुभवलीय. नुसतं पाठांतर न करता आपला अभ्यास नीट समजावून कसं शिकावं हे तीला पक्कं माहित असायचं. शाळेत येताना दररोज दीड किलोमीटर येणं आणि तेवढंच जाणं म्हणजे ३ किमी पायी चालत येणाऱ्या या मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच. शाळेचा बालरथ आहेत पण घरापर्यंत रस्ताच नाही.... पण इच्छा तिथे रस्ता आहेच.
डॉ. दिलीप, वेदेश , बिंदीया ,भोलानाथ , चेताली , दीक्षा आणि आता पूजा अशी ही केरीकर युवा डॉक्टरांची नामावली पुढं जात राहील यात शंकाच नाही.डॉक्टरी व्यवसायातल्या सगळ्या केरीकर कोवीड योद्ध्यांना शुभेच्छा आणि सलाम..... आणि हो पूजा तुला कोटी कोटी शुभेच्छा

प्रा. सुभाष जाण
केरी - फोंडा
दि. २६ मे २०२१

सेंत्रो एदुकादोर संस्था संचालित सरस्वती वाचनालय, म्हार्दोळ , गोवाआयोजितपुस्तक प्रकाशन(स्वागत) सोहळा*कॅलिडोस्कोप* लेखक : ...
12/11/2020

सेंत्रो एदुकादोर संस्था
संचालित
सरस्वती वाचनालय, म्हार्दोळ , गोवा
आयोजित
पुस्तक प्रकाशन(स्वागत) सोहळा
*कॅलिडोस्कोप*
लेखक : डॉ. मधुसूदन जोशी
*शुक्रवार , दिनांक १३ नोव्हेंबर २०२० सकाळी १०.३०*
फेसबुक वर थेट प्रसारण

Address

Satode, Keri
Ponda
403401

Telephone

+918322340327

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surashree Kesarbai Kerkar High School posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category