Nav Maharashtra Vidyalaya & Jr.College

Nav Maharashtra Vidyalaya & Jr.College EX.NAV MAHARASHTRA SCHOOL & JR.COLLEGE PIMPRI , PUNE

20/02/2024

*आमचाही एक जमाना होता !!!*
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .
पुढे ६ /७ वर्षांनंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भिती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.
☺️😊☺️😊☺️
पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं...
% चा आणि आमचा संबंध कधीच नव्हता.
😆🥹😆🥹😆
शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची....
कारण "ढ" असं
हिणवलं जायचं...
🤣🤣🤣🤣🤣
पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिसं ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास होता...
😏🥳😏🥳😏
कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मितीकौशल्य होतं.
😳😳😳😳😳
दरवर्षी जेव्हा नव्या
इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि
वह्यांना कव्हर्स घालणे,
हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा...
🤗🤗🤗🤗🤗
वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे.
😝😜😝😜😝
आई वडिलांना आमच्या शिक्षणावर फारसा बोजाही नव्हता.
🙂🙃🙂🙃🙂
कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो, हे आता आठवतही नाही...🤭🫢🤭🫢🤭
बिनचपला ,बुटांचे, कोणत्याही चेंडू आणि लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यात काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.
☺️😊☺️😊☺️☺️😊
आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही.
(मुळात पॉकेटमनी म्हणजे काय? हेच माहित नसायचे)
आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे.सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळाले तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत टिकल्या, लवंगी फटाक्यांची माळ सुटी करून एकेक फटाका उडवत बसणे यात आम्हाला काहीअपमानास्पद वाटायचं नाही.कोणी दुसरा फटाके फोडत असेल त्याच्या मागे मागे धावायचो.
😉😉😉😁😉😉😉
आम्ही आमच्या
आईवडिलांना कधी सांगूच
शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला
'आय लव यू' म्हणणं माहीतच नव्हतं...
😘😘❤️😘😘
आज आम्ही असंख्य
टक्के टोमणे खात, संघर्ष
करत दुनियेचा एक हिस्सा
झालोय. काहींना जे हवं
होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही 'काय माहीत....?
शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले आणि शाळेबाहेरच्या त्या हापपॅन्ट वाल्या गोळीवाल्याकडून काय काय ज्या मित्राच्या कृपेने मिळायचे ते मित्र,
कुठे हरवलेत ते...!
😂😂👍😂😂
आम्ही जगात कुठेही
असू पण हे सत्य आहे की,
आम्ही वास्तव दुनियेत
जगलो, आणि वास्तवात वाढलो........
😉🙄😉🙄😉
कपड्यांना सुरकुत्या पडू
न देणं आणि नात्यांमध्ये औपचारिकता जपणं
आम्हाला कधी जमलंच
नाही.भाकरी आणि भाजी शिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.
😘😘❤️😘😘
आपल्या नशिबाला
चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय !!! कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करत आहेत.
जे जीवन आम्ही
जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार
नाही.,,,,,,,,,,,,,,,,,,
😃😃😃🌹
आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही एक 'जमाना' होता !!!
अनुभवले व खूप आवडले, म्हणून आपणांस पाठवले.

हे आताचे 45--60 वयोमान असणाऱ्यांचे (काहींचे) हुबेहूब कथा व वर्णन आहे..🙏
Copy Paste from WA

लहानपण देगा देवा...!!!©® Yogesh Khairnarफोटो - साभार Google.
29/01/2024

लहानपण देगा देवा...!!!

©® Yogesh Khairnar

फोटो - साभार Google.

ही *दीपावली* आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंददायी व भरभराटीची जावो ... Happy Diwali🕯
12/11/2023

ही *दीपावली* आपणा सर्वांना सुखाची समृद्धीची आनंददायी व भरभराटीची जावो ...
Happy Diwali🕯

19/08/2023

मैत्री🍫

14/07/2023

Miss these days 🥲

07/09/2020

आठवणी जाग्या झाल्या ना🥰🥰
Miss My School & College Days😓😔

04/04/2020
"छत्रपती सूत्र विश्वाचे" । "छत्रसाल-दर्शन"________________________________________अखंड हिंदूस्थानाला प्रेरणा देणारं छत्र...
23/11/2015

"छत्रपती सूत्र विश्वाचे" । "छत्रसाल-दर्शन"
____________________
____________________
अखंड हिंदूस्थानाला प्रेरणा देणारं छत्रपती शिवरायांचं चरित्र-सूत्र काही कारणास्तव प्रादेशिक होऊ पहातंय ते जगभर दुग्गोचर करण्या-हेतू आणि छत्रपतींच्या प्रेरणेने सार्वभौम राज्य उभे करणारे बुंदेलकेसरी छत्रसाल बुंदेला ज्यांच्या समाधीवर आजही शिवरायांची महती दाखवणारं कवन दिमाखात झळकतय त्या छत्रसाल बुंदेलांचा इतिहास मराठी जनतेसमोर मांडण्यासाठीच सदरील कार्यक्रमाचे आयोजन संयुक्तरित्या करण्यात आले आहे.
आजपासून ३४९ वर्षापूर्वी छत्रपती शिवराय आणि महाराज छत्रसाल ह्या दोन महान राजांनी जो महाराष्ट्र आणि बुंदेलखंडाचा सेतू बांधला तो पुढे पानिपतापर्यंत कायम होता. ह्या दोन राज्यांमधला हा सांस्कृतिक दुवा मध्यंतरी कुठेतरी निखळला तो परत सांधावा हा उदात्त हेतू मनी बाळगून दोन्ही राज्याचे राजवंश परत एकत्र यावेत ह्यासाठीच हा सगळा अट्टाहास.
____________________
____________________
उपस्थिती:-
शिव-छत्रपती आणि महाराजा बुंदेला ह्या दोन महाबाहू योद्ध्यांची राजघराणी प्रथमच एकत्र
( सातारा गादी- कोल्हापूर गादी- पन्ना गादी )
____________________
____________________
प्रकाशन:-
१) महाराजा छत्रसाल बुंदेला आणि छत्रपती शिवराय ह्यांची तीन ऐतिहासिक तैलचैत्र
२) महाराष्ट्रातली महाराजा छत्रसाल बुंदेला ह्यांची पहिली मूर्ती
३) छत्रसाल बुंदेला ह्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशन
____________________
____________________
व्याख्यानं:-
१) छत्रपती सूत्र विश्वाचे:- दुर्गमहर्षी प्रमोद मांडे
२) छत्रसाल-दर्शन:- डॉ. प्रभाकर ताकवले
____________________
____________________
दिनांक : २८ नोव्हेंबर २०१५.
वेळ:- सकाळी १०:३० ते २
स्थळ:- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, पुणे सातारा रोड, पद्मावती, पुणे.
____________________
____________________
आयोजक:-
मराठी देशा फौंडेशन, झुंझार शिलेदार सेवा समिती, गडवाट परिवार, शिव-सह्याद्री दुर्गसंवर्धन, शिव-संस्कार, भटकंती कट्टा,PCMC कट्टा, शिवस्पर्श प्रकाशन, शिवराज्याभिषेक सोहळा समिती- उस्मानाबाद, मानाजी पायगुडे संघ, राजगड उत्कर्ष मंडळ, हरित भूमी फौंडेशन.
आणि
समस्त शिव-सह्याद्रीचे पाईक सवंगडी.

"क्रांतीकुलावतंस उमाजी नाईक"उमाजी नाईकांना पकडणारा आणि त्यांचं चरित्र लिहीणारा कॅ. मॅकिंटोश लिहीतो,"उमाजीची साम्राज्य स्...
02/08/2015

"क्रांतीकुलावतंस उमाजी नाईक"
उमाजी नाईकांना पकडणारा आणि त्यांचं चरित्र लिहीणारा कॅ. मॅकिंटोश लिहीतो,
"उमाजीची साम्राज्य स्थापन करण्याची महात्वांकांक्षा होती, असे या देशातील रहिवाशांचे मत होते, त्याने मराठा राज्याच्या संस्थापक असलेल्या शिवाजीचे वर्तन आणि त्याने अवलंबलेली कार्यप्रणाली आपल्या नजरेसमोर ठेवली होती, तथापि काळ आणि परिस्थिती फार वेगळी होती."
हा उल्लेख फार महत्वाचा आहे.
शिवकालीन काळापासून उमाजी नाईकांचे कुटुंब शिवाजी महाराजांच्या सेवेत रुजू होते,
सातारच्या राजांनी ( शंभूपुत्र शाहू महाराज) उमाजी नाईकांच्या घरातल्या वर्दुजी नामक विराला एक पत्र दिलं होतं, ते उमाजींच्या घरच्यांनी सांभाळून ठेवलं होतं. शिरवळच्या एका युद्धात मुस्लिम सेनापतीला वर्दुजी यांनी हरवलं होतं, त्याचा सरंजाम लुटला होता. त्या कौशल्याची स्तुती करणारं असं ते पत्र होतं. त्यांच्या त्या पराक्रमाबद्दल पुरस्कार स्वीकारण्यासाठी "दरबारात" उपस्थित राहण्याची आज्ञा त्यात केली होती.
शिवाजी महाराजांनी पुरंदर घेण्याचा प्रयत्न केला त्यात शिवाजी महाराजांतर्फे जे सैन्य होतं त्यात रामोशी लोकांचा भरणा जास्त होता. (जेजुरी- पुरंदरच्या टेकद्यांवर फार पूर्वीपासून रामोशी लोकांची वस्ती होती. ह्या भागाची त्यांनी अगदी खडान-खडा माहिती होती.) त्या लढाईत वर्दुजी खोमणे यांचा भाऊ "मम्ल्ह्मीपुत्ती" यांचाही सहभाग होता. त्या युद्धात जखमी झाल्याने त्यांना वीरमरण आलेलं.
शाहू महाराज गादीवर आल्यावर ह्या रामोशी लोकांनी आपल्या आजोबांना केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून त्यांना दरबारात बोलावून साकुर्डी गावाचा मोकासा आणि बरीच जमीन दिली होती.
_________________
उमाजी नाईकांचं खरं आडनाव "खोमणे",
नाईक ही त्यांची पदवी.
नाईक ही पदवी रामोशी समाजाच्या परंपरेची द्योतक आहे. रामोशी समाजातील अनेक वीर पुरुष गावाचे रखवालदार म्हणून काम करायचे, त्यामुळे त्यांना "जागृत राहणारा" या अर्थाने "जागल्या" म्हणायचे. अश्या रखवालदारांच्या प्रमुखाला "नाईक" असं म्हणायचे.
_________________
कॅ. मॅकिंटोशच्या मनोगतलं उमाजी नाईक यांच्याबद्दलचं एक वाक्य अत्यंत महत्वाचं आहे.
कॅ. मॅकिंटोश लिहीतो,
"त्याच्याकडे ( उमाजी नाईक यांच्याकडे) मोठी हुशारी, बुद्धीमत्ता आणि क्रियाशीलता होती. असंतोष आणि गोंधळ असलेल्या काळात तो "देशी शासनाचा" अत्यंत उपयोगी असा कट्टर समर्थक ठरला असता."
देशी शासन नष्ट करून त्याजागी इंग्लिश शासनाचा अंमल स्थापन करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या तोंडून "उमाजी नाईक" यांच्याबद्दल "देशी शासनाचे" उद्गार अचंबित करणारे आहेत.
उमाजी नाईक यांच्या स्वतंत्र राज्याच्या पुरस्काराचा कळत-नकळत त्याने दिलेला कबुली-जवाब होता.
_________________
उमाजी नाईकांच्या स्वतंत्र स्वराज्याची इंग्रजांनी एवढी धास्ती खाल्ली होती की त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी १०,००० रुपये आणि ४०० बिघे जमीन (अंदाजे ३०० एकर जमीन) बक्षीस म्हणून जाहीर केली होती. आणि माहिती पुरवणार्यासाठी ५,००० रुपये आणि २०० बिघे जमीनची घोषणा केलेली.
आजपासून साधारण २०० वर्षांआधी ३०० एकर जमीन आणि १०,००० रुपये ही काही साधी-सुधी बक्षिसी मुळीच नव्हती.
ह्या सगळ्या कागदोपत्री सापडणार्या (ऐकीव नोंदी नाही) नोंदी उमाजी नाईकांना खचितच "क्रांतीकुलावतंस उमाजी नाईक" बनवतात.

01/08/2015

well said.. I agreee

18/02/2015

पिंपरी चिंचवड मधील काही शिवभक्तांतर्फे उद्या दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने किल्ले तिकोना येथे स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आलेली आहे , तरी कोणी शिवभक्त या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास त्यांनी आज संध्याकाळपर्यत संपर्क साधावा.

टिप :- उद्या दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी 6.30 वाजे पर्यंत या मोहिमेत सहभागी होणार्‍या सर्व शिवभक्तांनी शिवाजी महाराज चौक , पिंपरी वाघेरे येथे जमावे.
संपर्क :-
रोहित वाघेरे :- 8888836060
योगेश रसाळ :- 8421998693

Address

Pimpri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nav Maharashtra Vidyalaya & Jr.College posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share