28/02/2024
मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024
महाविद्यालयामध्ये कवी तथा ज्येष्ठ साहित्यिक मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयामध्ये कवी अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंगनिल हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या खास खुमासदार शैलित मराठीतील कवितांचे वेगवेगळे प्रकार सादर केले. विशेषतः त्यांच्या विडंबनात्मक कवितांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. अतिशय मार्मिक व नेमक्या शब्दात कवी सारंगनिल यांनी ज्वलंत विषयावर भाष्य करत व्यवस्थेला कवितेच्या माध्यमातून आरसा दाखवला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. विनिता बसंतानी तसेच सहयोगी प्राध्यापक अझर खान प्राध्यापिका डॉ. लीना मोदी डॉ. सुजाता देशमुख प्रा.भारत देवानी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मारुती शिंदे यांनी केले, तर आभार प्राध्यापक डॉ. सुजाता देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास वाणिज्य शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.