Raje Chhatrapati Martial Arts Schools

Raje Chhatrapati  Martial Arts Schools VISION
Raje Chhatrapati Martial Arts School It is our relig

शाळेत साजरा झालेला रक्षाबंधनाचा उत्सव हा केवळ एक विधी नव्हता, तर भावंडांच्या प्रेमाची आणि बांधिलकीची गोड आठवण बनून राहिल...
12/08/2025

शाळेत साजरा झालेला रक्षाबंधनाचा उत्सव हा केवळ एक विधी नव्हता, तर भावंडांच्या प्रेमाची आणि बांधिलकीची गोड आठवण बनून राहिला. बहिणींच्या हातून बांधलेली राखी ही केवळ धागा नव्हती, तर विश्वासाचं, प्रेमाचं आणि संरक्षणाचं वचन होतं.
शाळेच्या गोकुळासारख्या वातावरणात मुलांनी एकमेकांशी राखी बांधून परस्परांतील प्रेमाची जाणीव करून दिली. परंपरा आणि संस्कृती यांचे महत्त्व सांगत, शिक्षकांनीही या सणाचा खरा अर्थ उलगडून दाखवला.

🪔 रक्षाबंधन म्हणजे नात्यांचा उत्सव, प्रेमाची शपथ आणि एकमेकांच्या सोबत असण्याचं वचन! 🪔
या सुंदर सणाच्या निमित्ताने शाळेतील प्रत्येक विद्यार्थी एकमेकांच्या आनंदात सहभागी झाला आणि एक गोड आठवण साठवून गेला... 💖

*राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल ताशांचा गजरात स्वागत*काल द...
17/06/2025

*राजे छत्रपती इंग्लिश मीडियम स्कूल पिंपळनेर येथे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल ताशांचा गजरात स्वागत*

काल दिनांक 16 जून 2025 शैक्षणिक वर्ष 2025 26 चा पहिला दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर शाळेचा पहिला दिवस प्रवेश महोत्सव म्हणून आनंदाने साजरा होत आहे. आपल्या राजे छत्रपती मार्शल आर्ट इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री संभाजी अहिरराव सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली पाटील मॅडम, तसेच संपूर्ण शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्यामार्फत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून शिक्षकांनी त्यांचे स्वागत केले.
*शाळेत उभारलेल्या सेल्फी पॉईंटवर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी घेतला फोटो काढण्याचा आनंद*

*पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले*

पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री संभाजीराव सर, संस्थेचे सचिव रा.ना.पाटील सर, संचालक श्री जगदीश ओझरकर सर, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष नानासो ज्ञानेश्वर एखंडे सर , सामाजिक कार्यकर्ते रिकब शेठ, शशिकांत मराठे, शाळेच्या मुख्याध्यापिका , ऍडमिनिस्ट्रेटर यांच्या हस्ते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षक बांधवांना संस्थेमार्फत नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

06/05/2025
प्रवेश देणे सुरू आहे....
17/04/2025

प्रवेश देणे सुरू आहे....

💯% निकालाची परंपरा कायम...दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक...
28/05/2024

💯% निकालाची परंपरा कायम...
दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉

साई खेलो इंडिया तर्फे मुंबई येथे आमच्या राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर शाळेचा इयत्ता नव...
02/05/2024

साई खेलो इंडिया तर्फे मुंबई येथे आमच्या राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल पिंपळनेर शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी 'सप्तेश लक्ष्मण धनगर' हा 17 वर्षा आतील गटात 3000 मीटर रनिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी झाला..... त्याच्या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री संभाजी अहिरराव सर,उपाध्यक्ष श्री श्याम कोठावदे सर, सचिव श्री राणा पाटील सर, संचालक श्री जगदीश ओझरकर सर,संचालक श्री अनिल बागुल सर, संचालक श्री शेखर दळवी सर,संचालक श्री सुनील अहिरराव सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून कौतुक करण्यात आले. प्रसंगी शाळेच्या प्रांगणात साक्री तालुक्याच्या आमदार सो मंजुळाताई गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.... व पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐 देण्यात आल्यात.

Address

Near Samode Chaufuli, Sakri Road
Pimpalner
424306

Opening Hours

7am - 5pm

Telephone

+919011302977

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Raje Chhatrapati Martial Arts Schools posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Raje Chhatrapati Martial Arts Schools:

Shortcuts

Share

Category