26/01/2024
पातुर्डा :युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार सलग्नित नेहरू युवा केंद्र बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्था तथा नवयुवक मंडळ तसेच सरस्वती वाचनालय पातुर्डा यांचे संयुक्त विद्यमाने 12 ते 19 जानेवारी हा राष्ट्रीय युवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला .
त्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमधील व स्पर्धेमधील बक्षिसांचे वितरण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जि प हायस्कूल पातुर्डा येथे मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू स्वरूपात प्रदान करण्यात आल्या.
यावेळी अंधेरी,मुंबई न्यायालय येथे कार्यरत न्यायाधीश सुजितकुमार तायडे, सरपंच रणजीत गंगतीरे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू भोंगळ, प्राचार्य नरवाडे सर,उपसरपंच शोभाताई रहाटे, सरस्वती वाचनालयाचे विनायक चोपडे, स्वामी विवेकानंद मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तायडे, ग्रंथपाल अनंत सातव,पत्रकार शाम इंगळे, मंडळ सचिव किशोर दसोरे,ग्रामपंचायत सदस्य निलेश चांडक, सिद्धार्थ गाडे, रामेश्वर भड , गजानन राजनकर, निखिल देशमुख आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. प्रास्ताविक सपकाळ सर तर आभार प्रदर्शन अंबादास इंगळे यांनी केले