जि. प. प्राथमिक शाळा वांझोळे येथे आज 'शनिवार विशेष उपक्रमांतर्गत' विद्यार्थ्यांकडून सीड बॉल बनवण्याचा पर्यावरणपूरक उपक्रम अत्यंत उत्साहात घेण्यात आला. केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून मुलांना निसर्गाशी जोडण्याचा आणि त्यांच्यात वृक्षसंवर्धनाचे महत्त्व रुजवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. येणाऱ्या पावसाळ्यात हेच तयार केलेले सीड बॉल योग्य ठिकाणी विखुरले जातील आणि त्यातून उद्याची हिरवीगार झाडे रुजतील.
जि. प. शाळा वांझोळे
जि.प.शाळा वांझोळे ता-पाटण जि-सातारा
या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेले उपक्रम
शुद्ध उच्चार, एकाग्रता आणि पाठांतर!
आमच्या वांझोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले श्लोक. #श्लोकपाठांतर
शुद्ध उच्चार, एकाग्रता आणि अप्रतिम पाठांतर!
आमच्या वांझोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले श्लोक. #श्लोकपाठांतर
शुद्ध उच्चार, एकाग्रता आणि अप्रतिम पाठांतर!
आमच्या वांझोळे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'मनाचे श्लोक.
विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांच्या शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहावे, म्हणून आमच्या जि.प.प्राथ.शाळा वांझोळे शाळेत 'Water Bell' (वॉटर बेल) हा उपक्रम राबविला जात आहे.
यामध्ये दर तासाला एक विशेष घंटा (बेल) वाजवली जाते, ज्यावेळी सर्व विद्यार्थी आपापल्या बॉटलमधील पाणी पितात.
15/09/2025
विद्यार्थी सुरक्षेसाठी ठोस पाऊल – जि.प.प्रा.शाळा वांझोळे
विद्यार्थी सुरक्षा - आपली सामूहिक जबाबदारी या उक्तीला सार्थ ठरवत आज सोमवार दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत वांझोळे यांच्या ग्रामनिधीतून जि.प.प्रा.शाळा वांझोळे येथे तीन अत्याधुनिक CCTV कॅमेरे बसविण्यात आले. शाळेचे मुख्य प्रवेशद्वार, खेळाचे मैदान, व्हरांडा आणि शौचालयाकडे जाणारा मार्ग व परसबाग इत्यादी परिसर CCTV च्या कक्षेत आल्यामुळे शाळा परिसरात शिस्त, आणि विद्यार्थी सुरक्षितता वाढीस लागेल. या उपक्रमासाठी पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत वांझोळे यांचे मनःपूर्वक आभार...
सुरक्षित शाळा – उज्ज्वल भविष्य
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Address
ZP PS Wanzole Ta- Patan
Patan
415206