03/05/2026
हसायदान..!
15 likes. "सुट्टीत मुलांना ' ही ' सवय लावा संजय कळमकर 8888229944 # shorts"
14/04/2026
तुमच्या नावाची किंमत तुमच्या पदवीवर ठरते? 🤔🔥 | Banugade Patil | Marathi Motivation
समाजात अनेकदा व्यक्तीची ओळख त्याच्या पदवीने होते.डॉक्टर, इंजिनिअर, अधिकारी — ही नावं प्रतिष्ठा देतात.पण खरी किंम.....
13/03/2026
*आनंदाचे डोही,आनंद तरंग*
कराडला, रोटरी क्लब ऑफ मलकापूर यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी गेलो होतो. वक्ता म्हणून बोलत असताना सभागृहातील श्रोत्यांमधून काही उत्साही चेहरे आपल्या सहज लक्षात येत असतात. कारण असे चेहरे बोलके असतात.असाच एक 70- 75 वर्षाचा बोलका चेहरा कराडच्या व्याख्यानात माझ्यासमोर होता. ते गृहस्थ योग्य ठिकाणी दादही देत होते. व्याख्यान संपल्यानंतर संयोजकांनी मला त्यांची ओळख करून दिली की हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे भाऊ अमरसिंह पाटणकर. परंतु त्यांचा चेहरा इतका शांत आणि निरागस होता की जणू त्यांना सांगायचे होते की माझ्या इतर कोणत्याही ओळखीपेक्षा मी एक उत्तम श्रोता आहे, एवढीच माझी ओळख पुरेशी आहे. अगदी काही क्षण आमचा थोडा संवाद झाला. परंतु ते माझ्या लक्षात राहिले. आपण कोणत्या स्वभावाचे आहोत आणि कोणत्या वृत्तीने जीवन जगणारे आहोत हे आपला चेहराच सांगत असतो. निगर्वी माणसं मला आवडत असतात.
त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा म्हणजेच कोयना एज्युकेशन सोसायटी पाटणचे सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर दादांचा फोन आला. त्यांच्या संस्थेतील शिक्षकांना प्रेरणादायी व्याख्यान देण्यासाठी त्यांनी मला निमंत्रण दिले. त्यासाठी त्यांनी एका सत्कार समारंभाचे निमित्त साधले.
दादा कराडला व्याख्यानाला आले होते तेव्हा त्यांनी माझ्याकडून लिहिली गेलेली जय शिवराय आणि गुड मॉर्निंग ही दोनही पुस्तके विकत घेतली होती. त्यांना ती खूप आवडली होती. विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षकांनी ही पुस्तके वाचली पाहिजेत असं त्यांना मनापासून वाटत होते. मला म्हणाले येताना गाडीमध्ये पाचशे जय शिवराय आणि पाचशे गुड मॉर्निंग अशी दोन्ही पुस्तके आमच्या शिक्षकांसाठी घेऊन या. मला शिक्षकांना द्यायची आहेत. मी म्हटले छान उपक्रम आहे. तर म्हणाले मी त्यांना फुकट देणार नाही. *फुकट दिली की त्याची किंमत राहत नाही.* ज्यांचा पगार मजबूत आहे त्यांना मी ती विकतच घ्यायला सांगणार आहे आणि ज्यांची नोकरी कायमस्वरूपी नाही त्यांना मात्र भेट म्हणून देणार आहे. मी एक सहज त्यांना माझ्या मनातली शंका बोलून दाखवली. म्हटलं दादा व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमचा माणूस पुस्तकाचा स्टॉल ठेवत असतो व आपले शिक्षक व्याख्यान संपल्यावर पुस्तक विकत घेतीलच की... तर अधिकार वाणीने म्हणाले पण सगळे शिक्षक घेतीलच असं नाही. सगळ्या शिक्षकांनी ती पुस्तके वाचावीत अशी माझी इच्छा आहे. मी पुस्तके दिली म्हणजे त्यांना घ्यावीच लागतील . *आपल्या संस्थेतील शिक्षकांना वाचनाची आवड लावून त्यांना जणू कायमस्वरूपी विद्यार्थी बनविण्यासाठीची ही अमरसिंह दादांची दादागिरी मला आवडली.*
कार्यक्रम सकाळी होता. त्यामुळे पाटणला आदल्या दिवशीच राहण्यासाठी गेलो. साधारण पाच वाजता पाटणला पोहोचलो. आजूबाजूचं काहीतरी पाहूया अशी इच्छा अमरसिंह दादांकडे व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांनी नियोजन केलं होतं. जवळच्या गडावर नेण्याचं त्यांच्या डोक्यात होतं. त्यांचे मित्र माजी प्रभारी प्राचार्य बी. एन. पाटील , ग्रंथपाल संजय इंगवले, सारथी सागर मालुसरे, दादा असे आम्ही सगळे दाते घेरा गडावर म्हणजेच सुंदर गडावर निघालो. त्यांच्या गाडीत त्यांनी आम्हाला बसवलं. 74 वर्षाचे दादा नव तरुणाच्या उत्साहात स्वतः ड्रायव्हिंग करत होते. अख्खा रस्ता त्यांच्या पाठ होता. वेगात असलेली गाडी अगदी छोटा खड्डा आल्यावर देखील कधी सावकाश होत होती ते आम्हाला कळतसुद्धा नव्हतं. *हसरा चेहरा, मनाची निर्मळता, दिलखुलास हसणं, दिलखुलास बोलणं, नवविचार समजून घेणं, अभ्यासुवृत्ती, मैत्री जोपासन, सतत कार्यमग्न राहून आनंद मिळवणं हे सर्व दादांचे गुण भावून जात होते*. छान पैकी सुंदरगड पहिला. गडावरील तलवारीच्या आकारात असलेली विहीर पाहिली. मारुतीराया आणि गणपती बाप्पाच्या दगडात कोरलेल्या जणू चैतन्य असलेल्या मूर्ती पाहिल्या. गडाच्या दरवाज्यातून संध्याकाळचा सूर्यास्त पाहिला. कोयनेच खोर पाहिलं. कोयना नदी, डोंगरांचा पडलेला घेरा, गुणवंत गड, आजूबाजूच्या डोंगरांवरच्या पवनचक्क्यांची रांगच रांग सगळं सगळं दादा आणि मित्रमंडळींसोबत गप्पा मारत मारत आनंदाने पाहता आलं. ग्रंथपालांनी गडाविषयी छान माहिती सांगितली. गड उतरेपर्यंत अंधार पडला होता. गाडीत बसल्यावर दादा पाटणच्या थोड्या उलट दिशेने निघाले. म्हटलं कुठे जायचं? तर म्हणाले चला थोडं पुढं एक राउंड मारून येऊ. जंगलात रानगवे आहेत. एखादा बिबट्या, वाघ दिसतो का तेही बघू. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाट झाडीतून आमची गाडी पुढे जात होती. सध्या लांबच लांब रस्त्यांच्या कडेच्या भकास पणाची सवय झालेल्या डोळ्यांना इथलं दृश्य मात्र सुखावत होतं. तो रस्ता इतका छान होता की दादांना मी म्हटलं आता परत जाताना मी कराड मार्गे न जाता याच मार्गे पुढे साताऱ्याला बाहेर पडून मग माझ्या गावाकडचा प्रवास सुरु करतो. तर म्हणाले तसंच करा. फक्त जाताना श्रीमती काशीबाई माधवराव गावंड संग्रहालय वाटेत आहे ते आवर्जून बघून जा.
*आतापर्यंत त्यांच्या घरी आलेली राजकारणातील उत्तुंग व्यक्तिमत्व, त्यांचा स्वभाव, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचे छोटे छोटे बारकावे, त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांची स्मरणशक्ती या सर्वांविषयी गप्पा मारत परत फिरून आम्ही पाटणला कधी आलो ते आम्हाला कळले देखील नाही.* संस्थाचालक आणि शिक्षक सेवक असा भेद न ठेवता माजी प्रभारी प्राचार्य बी. एन. पाटील आणि ग्रंथपाल संजय इंगवले यांच्यासोबत मैत्रीने वागणारे दादा खरंच आवडून गेले.
दुसऱ्या दिवशी कॉलेजला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात व्याख्यानाला मजा आली. डॉ. रामकली रमाकांत पावसकर सेवक पुरस्कार त्याचेही वितरण माझ्या हस्ते झाले. तळबीडच्या *हंबीरराव मोहिते* घराण्यातील दोघांना हा पुरस्कार माझ्या हस्ते दिला गेला, ही गोष्ट शिवव्याख्याते म्हणून माझ्यासाठी सन्मानाची होती. व्याख्यानावर शिक्षक तर खुश होतेच पण दादाही खुश होते. दादांचा चेहराच सांगत होता की ते खुश,आनंदी आणि समाधानी आहेत. मला म्हणाले ज्या उद्देशाने तुम्हाला बोलावले होते तो उद्देश सफल झाला. पिढी घडविणाऱ्या आपल्या शिक्षकांना काहीतरी छान दिलं पाहिजे याविषयीची दादांची तळमळ माझ्या मनाला भावून गेली.
येताना हजार पुस्तकांनी गाडी भरली होती. जाताना गाडी रिकामी झाली होती. येताना मनात शंका वाटत होती की आपण जे सहजपणे 500- 500 पुस्तक घेऊन या अस जे ऐकलं आहे ते *खरंच आपल्या कानांनी बरोबर ऐकल आहे ना?* परंतु त्या बाबतीत दादा इतके सजग होते की आल्याबरोबर त्यांनी पुस्तक आणलीत ना, असं विचारलं आणि लगेचच त्यांच्या माणसांना पुस्तक खाली करून घ्यायला सांगितली. दादा बोलायला स्पष्ट मोकळे होते तेवढाच त्यांचा व्यवहारही चोख आणि रोकडा होता. पुस्तकाची भरलेली गाडी रिकामी करून जाताना बहुसंख्य शिक्षक वाचकांपर्यंत आपलं पुस्तक पोहोचणार याचा लेखक म्हणून मनात अतिव आनंद होता. तसेच यातील अर्थपूर्ण व्यवहार हा लेखन क्षेत्रातील माझ्या उद्योजकतेला आणि माझ्यातील लेखकाला या दोन्हीलाही प्रेरणा देणारा होता.
*शिवचरित्र प्रचार प्रसाराच्या कार्यात दादा आपण कृतिशील सहभागी झालात याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद!*
🙏🙏
------------------------------------
व्याख्याते प्रशांत देशमुख.
मो. 9822 650 280
( जय शिवराय आणि गुड मॉर्निंग ही दोन्ही पुस्तक ॲमेझॉन वरही उपलब्ध आहेत. जय शिवराय पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झाला आहे )
03/01/2026
spot reading!!
Nyd de videoer og den musik, du holder af, upload originalt indhold, og del det hele med venner, familie og verden på YouTube.
02/01/2026
असा कसा बाबा देव लेकराला देतो👫❤️😍🌎 #viralvideos ##बाबा
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.