22/03/2025
'Arise NEET-IIT Foundation' आयोजित 'Scholarship Cum Entrance Test 2025' मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. आकाश टाकळकर तर प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून जेष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते, श्री. Adv. अशोक सोनी, वरपुडकर शिक्षण संस्थेच्या सचिव, सौ. प्रेरणा वरपुडकर आणि आर. पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कन्सल्टंट पॅथोलोजिस्ट, डॉ. पल्लवी दोडके उपस्थित होत्या. अतिथी महोदयांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आपापली मनोगते व्यक्त केली.
सत्कार समारंभात तब्बल 45 गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पालक प्रतिनिधी म्हणून सौ. मेघा सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदाम भोसले, प्रास्ताविक प्रा. अजय टाक तर आभार प्रदर्शन प्रा. अनिकेत शहाणे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. पृथ्वीराज देशमुख, प्रा. महेश रोडे, प्रा. माधवी टाकळकर यांनी परिश्रम घेतले.