Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी

  • Home
  • India
  • Parbhani
  • Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी

Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी, Education, Near Dental College, Pathri Road, Parbhani.

15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️🇮🇳
#स्वातंत्र्यदिन #जयहिंद
80th Independence Day 2026

11/08/2026

जिजाऊ आयटीआयच्या उज्वल निकालाची परंपरा कायम

गुणवंत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; विविध ट्रेडमध्ये विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

परभणी : नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग (NCVT) अंतर्गत घेण्यात आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै 2026 च्या निकालात धर्मापुरी, पाथरी रोड, परभणी येथील जिजाऊ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थेच्या विविध ट्रेडमधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुण मिळवत संस्थेच्या उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

संस्थेतून सर्वाधिक ९८.१७ टक्के गुण मिळवत इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील कर्णेश्वर कानडे याने प्रथम क्रमांक मिळविला. इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या प्रथम वर्षात कर्णेश्वर कानडे ९८.१७ टक्के प्रथम, सांची काळे ९६.८३ टक्के द्वितीय तर अश्विनी पारवे ९६.३३ टक्के गुणांसह तृतीय आली.

इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या द्वितीय वर्षात नकुल घुगे आणि गणराज बोबडे यांनी प्रत्येकी ९८.३३ टक्के गुण मिळवत संयुक्त प्रथम क्रमांक पटकावला. मारुती ढोणे यांनी ९७.६६ टक्के गुणांसह द्वितीय तर गोपाळ डोंबे यांनी ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

फिटर ट्रेडच्या प्रथम वर्षात पवन पवार यांनी ९० टक्के गुणांसह प्रथम, अंकुश कासिदे यांनी ८२.८३ टक्के गुणांसह द्वितीय तर ऋषिकेश घाडगे यांनी ८१.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय वर्षात ऋषिकेश कांगणे यांनी ९५.६६ टक्के गुणांसह प्रथम, निखिल शिंदे यांनी ९३.१६ टक्के गुणांसह द्वितीय तर रत्नदीप डोंगरे यांनी ८९.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

वायरमन ट्रेडच्या प्रथम वर्षात भागवत देसाई यांनी ८६.६३ टक्के गुणांसह प्रथम, प्रजावती वाकडे यांनी ८६.६० टक्के गुणांसह द्वितीय तर अर्जुन गरुड यांनी ८२.३३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. द्वितीय वर्षात महेश शेळके यांनी ९५ टक्के गुणांसह प्रथम, हर्षदा दुधडे यांनी ९१.१६ टक्के गुणांसह द्वितीय तर जायद खान यांनी ८८.५० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

नवीन तंत्रज्ञानाशी नाळ जोडणाऱ्या जिओ इन्फॉर्मेटिक असिस्टंट या ट्रेडमध्ये प्रसाद बिडवे यांनी ८४.१७ टक्के गुणांसह प्रथम, शैलेश रणेर यांनी ८२.३३ टक्के गुणांसह द्वितीय तर पंढरी तरवटे यांनी ८१.६७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

महिला व मुलींसाठी विशेष उपयुक्त असलेल्या बेसिक कॉस्मेटोलॉजी ट्रेडमध्ये सुप्रिया भालेराव यांनी ८९.५० टक्के गुणांसह प्रथम, पल्लवी लिपरे यांनी ८८.१७ टक्के गुणांसह द्वितीय तर मनीषा शेंगोळे यांनी ८७.८३ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेतील २७ प्रशिक्षणार्थींनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन केले, तर ८५ ते ९० टक्के गुण मिळविणारे ७० प्रशिक्षणार्थी आणि ८० ते ८५ टक्के गुण मिळविणारे ३२ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या प्रशिक्षणार्थींमध्ये शिवराज गबाळे, श्रीनिवास कराड, मारुती जाधव, श्रुती होंडे, तुषार डोंबे, विशाल राठोड, शेख आदिल, विष्णू राठोड, विठ्ठल सांगळे, पांडुरंग राऊत, श्रीनिवास पोळ, वैभव लोखंडे आणि सुरज लोखडे यांचा समावेश आहे.

या उल्लेखनीय निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रामराव लोहट, सचिव श्री. नितीन लोहट, कोषाध्यक्ष श्रीमती उषा लोहट, प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर तरवटे, गट निदेशक श्री. सिद्धेश्वर जाधव परिक्षा विभागप्रमुख श्री कैलास कुलथे तसेच संस्थेतील सर्व निदेशक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जिजाऊ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशामुळे परभणी जिल्ह्यातील व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात संस्थेचे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

10/08/2026

हार्दिक अभिनंदन!

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा – जुलै २०२६ मध्ये
जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणीच्या
प्रथम व द्वितीय वर्षातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे हार्दिक अभिनंदन! 💐

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

जिजाऊ आय.टी.आय., परभणी
📍 पाथरी रोड, परभणी
📞 9511654252 | 9404246278
🌐 www.jijauiti.in

यशाची परंपरा कायम… गुणवत्तेचा नवा विक्रम!जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुल, परभणी यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा नवा इतिहास रचल...
04/08/2026

यशाची परंपरा कायम… गुणवत्तेचा नवा विक्रम!

जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुल, परभणी यांनी शैक्षणिक गुणवत्तेचा नवा इतिहास रचला आहे.

- RE-NEET 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट निकाल.
- MHT-CET मध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल मिळवणारे 20 विद्यार्थी.
- दहावी बोर्ड परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवणारे 101 विद्यार्थी.
- NMMS परीक्षेत 170 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र.
- इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 51 विद्यार्थी यशस्वी.
- इयत्ता 4 थी व 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेत 69 विद्यार्थी पात्र.
- डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत 2 विद्यार्थी पदक विजेते.
- मॅथ्स व सायन्स ऑलिम्पियाडमध्ये 10 विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांक.

स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, बोर्ड परीक्षा, NEET, CET आणि ऑलिम्पियाड या सर्वच क्षेत्रांत सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करणारी परभणी जिल्ह्यातील एकमेव सर्वसमावेशक शैक्षणिक संस्था म्हणजे जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुल, परभणी.

29/07/2026
आजच्या वर्तमानपत्रात झळकले जिजाऊ ज्ञानतीर्थचे दैदिप्यमान यश… गुणवत्ता आणि विश्वासाची पुन्हा एकदा साक्ष!"
28/07/2026

आजच्या वर्तमानपत्रात झळकले जिजाऊ ज्ञानतीर्थचे दैदिप्यमान यश… गुणवत्ता आणि विश्वासाची पुन्हा एकदा साक्ष!"

*जिद्द, मेहनत आणि अविरत सातत्याच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये 512 गुण*परभणी येथील *जिजाऊ ज्ञानतीर्थ NEET / II...
27/07/2026

*जिद्द, मेहनत आणि अविरत सातत्याच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये 512 गुण*

परभणी येथील *जिजाऊ ज्ञानतीर्थ NEET / IIT-JEE Academy चा विद्यार्थी वरद नितीन लोहट याने पहिल्याच प्रयत्नात NEET 2026 परीक्षेत 512 गुण* मिळवून *MBBS* वैद्यकीय प्रवेशासाठी पात्रता मिळवत आपल्या जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची प्रचिती दिली आहे.
*वरदने इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणी* येथे पूर्ण केले. NEET मधील उल्लेखनीय यशासोबतच त्याने *MHT-CET मध्ये 99.15 पर्सेंटाईल, 10 वी बोर्ड परीक्षेत 96% आणि बारावी बोर्ड परीक्षेत 88% गुण* मिळवत सातत्यपूर्ण गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली.
या उल्लेखनीय यशाबद्दल आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संस्था व सर्व कर्मचारी वृद्ध यांच्या वतीने वरदचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या यशामागे मोलाचे योगदान असलेल्या त्याची *आजोबा तथा संस्था अध्यक्ष रामराव दादा लोहट,वडील व संस्था सचिव नितीन रामराव लोहट,आई व संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ. उषा नितीन लोहट* यांचाही सर्व कर्मचारीवृंद यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा हार शाल व पेढा भरून सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वरदच्या यशाचे कौतुक करत त्याच्या परिश्रम, शिस्त आणि चिकाटीचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्याने घ्यावा, असे प्रतिपादन केले. तसेच वरदला पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यासोबतच *नीट बॅचचे दोन वर्ष व्यवस्थापन करणारे विभाग प्रमुख रामकृष्ण कदम सर व शिकवणारे प्राध्यापक रितेश सिंग, संदीप कुकरेजा, विनोद पटेल ,विजय कुमार रंजन, डॉ. संदीप जाधव व नित्यानंद यादव* यांचाही सत्कार करण्यात आला
"*यश हे वारशाने मिळत नाही; ते जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी घडवावे लागते. वरद लोहटचे यश हे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय उदाहरण आहे*."

*पेडगाव येथे जिजाऊ ज्ञानतीर्थच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार**RE-NEET 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून 549...
24/07/2026

*पेडगाव येथे जिजाऊ ज्ञानतीर्थच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार*

*RE-NEET 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून 549 गुण मिळवणारा, MHT-CET मध्ये 99.31 पर्सेंटाइल तसेच बारावी बोर्ड परीक्षेत 91.67% गुण* मिळवून सर्वोत्कृष्ट यश संपादन करणारा *जिजाऊ ज्ञानतीर्थ, परभणीचा विद्यार्थी प्रणव जंगले* याचा आज पेडगाव येथे *जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी* वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे *सचिव नितीन लोहट, सरपंच आशिष हरकळ, प्रतिष्ठित नागरिक संतोषराव देशमुख, बाळासाहेब देशमुख* तसेच गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पेढे देऊन सन्मान करण्यात आला.

याच कार्यक्रमात पेडगाव ग्रामस्थांच्या वतीने संस्थेचे *सचिव नितीन लोहट यांचे सुपुत्र व जिजाऊ ज्ञानतीर्थचा विद्यार्थी वरद लोहट याने RE-NEET 2026 मध्ये 512 गुण CET 99.51 percentile* मिळवून उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल त्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. त्यामध्ये –

*- कुणाल हरकळ* – प्रयोगशाळा तंत्रज्ञान (मानवत)*
- *डॉ. पंकज हरकळ*– पीएच.डी., प्राध्यापक, डॉ. डी. वाय. पाटील फार्मसी कॉलेज, पुणे*
- *सोहम गायकवाड* – एमटीएस परीक्षेत जिल्ह्यात प्रथम*
- *आयुष देशमुख* – इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीधारक*
- *शुभम हरकळ* – इयत्ता आठवी शिष्यवृत्तीधारक*

या सत्कार सोहळ्याद्वारे पेडगाव ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करत इतर विद्यार्थ्यांनाही उच्च ध्येय ठेवून परिश्रम करण्याची प्रेरणा दिली. उपस्थित मान्यवरांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमासाठी *प्राचार्य उत्तरेश्वर शिंदे विभाग प्रमुख रामकृष्ण कदम सर, अशोक दुधारे ,नितीन घुंबरे सर, संदीप कराळे सर* व पेडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

24/07/2026

मेहनत आमची, साथ आमची!
Contact: 9420016250 | 9823526555

Address

Near Dental College, Pathri Road
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी:

Shortcuts

Share

Category