Bal Vidya Mandir,Parbhani

Bal Vidya Mandir,Parbhani " बाल विद्या मंदिर हायस्कूल " परभणी येथील सर्वात जुनी ,अतिशय शिस्तप्रिय शाळा

हि आमची शाळा " बाल विद्या मंदिर हायस्कूल " परभणी येथील सर्वात जुनी ,अतिशय शिस्तप्रिय असे शिक्षकवृंद , तेवढेच प्रेम करणारे ,व सुजाण नागरिक घडवणारे असे कुशल अनुभवी आदरणीय असे एकापेक्षा एक शिक्षक ....... आमची हि शाळा श्री शिवणकर सरांच्या अथक प्रयासाने नावारूपाला आली. त्याकाळचे काही श्रीमंतांनी देखील शिवणकर सरांच्या प्रयत्नांना आर्थिक हातभार लावला. आमची परभणी हि तशी संपन्न अशी प्रभावती नगरी ... येथील

रहिवासी हे रसिक, सर्व कलांवर ह्यांनी मनापासून प्रेम केले आहे व करताही आहेत. माझ्या लहानपणी मी आजच्या उत्तम उत्तम कलाकारांना गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमामध्ये अगदी जवळून पाहिलेही आहे व कार्यक्रमांचा आस्वाद हि घेतला आहे . आमच्या शाळेचा वर्धापन दिन असो कि स्नेहसंमेलन असो सर्व कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ होत असत. नाटकं ,नृत्याचे कार्यक्रम ,संगीत,शास्त्रीय संगीत एकापेक्षा एक , ह.प.पाटील सर ,वि .ल.पाटील सर ,औन्ढेकर सर,पोटेकर सर, नेरलेकर सर, अडणे सर, आंबेकर सर, वसेकर सर , ढोबळे सर ,किती जणांची नवे घ्यावीत तेवढी कमीच ह्या सर्वांचे एकुनेक कार्यक्रम व्यवस्थित होण्यासाठीची तळमळ असायची ... ढोबळे सरांचा धाक हि असायचा व त्यांची टर उडवण्याची सुधा मजा असायची ...सांस्कृतिक सोबतच आमची शाळा शिक्षणात हि खूप पुढे असायची ... आज आमच्या मुलांच्या शाळांचे व्यापारीकरण व शिक्षणाची दशा पाहिल्यानंतर खरच पटते कि आमच्या शिक्षकांनी आम्हाला घडवण्यासाठी व आमच्या शाळेच्या उत्कर्षा करिता किती कष्ट घेतले आहेत ते...सर आम्ही तुमचे विद्यार्थी खरोखरच तुमचे खूप खूप आभारी व कृतज्ञ आहोत कि तुमच्या मुळे आज आम्ही आमच्या पायावर उभे आहोत व समाजामध्ये आमचे नाव आहे ....

“सारखं काहीतरी होतंय…..  आज  ३ ० ० * Not Out प्रयोग ❤️प्रशांत दामले ह्या नावाला १००* , २००*……. ५००* , १०००* प्रयोग हे आक...
23/06/2024

“सारखं काहीतरी होतंय….. आज ३ ० ० * Not Out प्रयोग ❤️
प्रशांत दामले ह्या नावाला १००* , २००*……. ५००* , १०००* प्रयोग हे आकडे नवे नाहीत….
परंतु हा आकडा माझ्यासाठी खास आहे…. मी दिग्दर्शीत केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक ….. पहिलं …. लिहिलेलं तिसरं 🌺❤️
दिग्दर्शनाची हि संधी मला Prashant Damle सरांनीच दिली… “संक्या नाटक इतका छान वाचतोस मग, अजून जास्तं अभ्यास कर आणि दिग्दर्शन पण कर ….” असं म्हणाले … सरांचे खूप आभार …
ह्या नाटकाची कथासूत्रं Nikhil Madhav Khaire ह्या दोस्तानी पेरली… त्याचे आभार...
नाटक लिहितांना , दिग्दर्शीत करतांना Sameer Hampi शेठ बारकावे सांगत होता , त्याचे आभार ….
माझ्या नाटकातले माझे सगळे कलाकार
पोर्णिमा अहिरे केंडे , सिद्धी घैसास , राजसींग पुरोहीत ,
वर्षा ताई ऊसगांवकर… ह्या सगळ्यांनी मला लेखक म्हणुन समजून घेतलं आणि दिग्दर्शक म्हणुन सांभाळलं…. त्रिवार आभार……
आणि प्रेक्षक ज्यांनी ह्या लिखित दिग्दर्शीत नाटकाचे ३००* प्रयोग केले… असेच पाठीशी रहा … मी आनंद देण्याचा कायम प्रयत्नं करीन…
ह्या नाटकांत जिथे कमी पडलो ते पुढच्या नाटकांत नक्की भरून काढीन !!!🙏🏻





नेमक्या batch माहीत नाही कधीची आहे ते पण ह्या पैकी एक वर्ग 10 वि 'अ' हा 1982 चा वर्ग आहे
13/07/2018

नेमक्या batch माहीत नाही कधीची आहे ते पण ह्या पैकी एक वर्ग 10 वि 'अ' हा 1982 चा वर्ग आहे

13/07/2018

बाल विद्या मंदिर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेबद्दलच्या आप-आपल्या आठवणी, फोटो येथे शेयर कराव्यात

सर्व मित्रपरिवार व मनाने खरेखुरे भारतीय असणारया सर्वांना ..."६७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच...
15/08/2013

सर्व मित्रपरिवार व मनाने खरेखुरे भारतीय असणारया सर्वांना ..."६७ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा "……. जय हिंद !!!

06/05/2013

श्री माधवराव रामकृष्ण पोटेकर, १९ ६८ पासून परभणी येथे शिक्षण क्षेत्रात काम करणारे तपस्वी दिनांक ४ मे २०१३ रोजी स्वर्गवासी झाले.

बाल विद्या मंदिर शाळेस प्रतिष्ठा, नावलौकिक आणि पालकांच्या मनात विश्वास हे सर्व सरांच्या मेहनतीचे फळ आहे.

सरांच्या आत्म्यास शांती लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना !

Bal Vidya Mandir Highschool, Vaibhav Nagar, Parbhani
26/04/2013

Bal Vidya Mandir Highschool, Vaibhav Nagar, Parbhani

संत एकनाथ-एकनाथ षष्ठी!!!!संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ ...
03/04/2013

संत एकनाथ-एकनाथ षष्ठी!!!!

संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.

शांतिब्रह्म, ‘संत’पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह ’ज्ञानाचा एका’ या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.
एकनाथांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच एकनाथांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.
एकनाथांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. एकनाथांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चकपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. एकनाथांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.
एकनाथांचे गुरू सद्गुरू जनार्दन स्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. नाथांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे नाथांचे जीवन धन्य झाले. नाथांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.
नाथांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी नाथाच्या पादुका दरवर्षी आषाढीवारी साथी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.
संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी नाथांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी नाथांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. ‘बये दार उघड’ असे म्हणत नाथांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते ’एका जनार्दन’ म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.
अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. ’एकनाथी भागवत’ हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे अतिशय प्रासादिक (व्यासकृत) काव्य आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवर अत्यंत लोकप्रिय होते. नाथांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. नाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातीभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी देह ठेवला. हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

डॉक्टरसाहेब  कार मधून घाईघाईत उतरले व जवळपास पळत पळतच दवाखान्यामध्ये प्रवेश करते झाले. झटपट ड्रेसिंग रूम मधून सर्जरी साठ...
01/03/2013

डॉक्टरसाहेब कार मधून घाईघाईत उतरले व जवळपास पळत पळतच दवाखान्यामध्ये प्रवेश करते झाले. झटपट ड्रेसिंग रूम मधून सर्जरी साठीचे कपडे घालून स्वतःला निर्जंतुक करून ते ऑपरेशन थियेटर कडे घाईघाईत वळले तेवढ्यात ...एक गृहस्थ त्यांना अस्वस्थपणे ऑपरेशन थियेटर च्या बाहेर चकरा मारतांना दिसले त्यांनी काही म्हणायच्या आतच ...
गृहस्थ : डॉक ... काय म्हणावे तुम्हाला ...? किती हा उशीर ?
डॉक्टर : आपण ?
गृहस्थ : मी मुलाचा बाबा आहे ...! डॉक ...तुम्हाला कळत नाही का कि माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे.. एवढे कसे तुम्ही हलगर्जी असू शकता ..?
डॉक्टर : (ओशाळून )मला माफ करा .मी हॉस्पिटल मध्ये नव्हतो ..जेव्हा मला फोन आला त्यावेळी मी खूप दूर वर होतो तेथून येण्यास मला थोडा वेळ लागला ..काळजी करू नका...धीर धरा ..सर्व काही निट होईल ..!
गृहस्थ : (रागाने थरथरत ) धीर धरा ... अहो ..तुम्हाला काय जातंय धीर धरा म्हणायला ... बरे वाईट काहीही झाले तरी तुमची फीस तर तुम्हाला मिळणारच ना ...माझा मुलगा येथे मरतोय आणि म्हणे धीर धरा .... तुमचा स्वतःचा मुलगा असता व असा मरणाच्या दारात असता तर असा उशिराने आला असतात का ..?
डॉक्टर : (शांतपणे दिलासायुक्त हसत ) शांत व्हा ..! हे बघा मला माझे काम करू द्या ...आपल्याला खरच उशीर झालेला आहे अजून उशीर करणे तुमच्या मुलाकरिता बरे नव्हे..! मनोमन त्या ईश्वराची प्रार्थना करा ... तोच कर्ता करविता आहे ... तो तुमच्या मुलाचे रक्षण करेल ...मी फक्त नाममात्र आहे हो ...!
गृहस्थ : ( घुश्यातच तळमळत्या स्वरात ) हुम्म्म ...म्हणे नाममात्र ... स्वतःची जबाबदारी चांगली झटकता येते असे म्हणून ..... फुकट शहाणपण शिकवायला काय जातंय ..माझ्या मुलाला काही झाले तर याद राख गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा ..! जा आता ...

साधारण दोन तासांनंतर ऑपरेशन संपल्यानंतर ऑपरेशन थियेटर मधून बाहेर पडतांना ....

डॉक्टर ( गृहस्थाला आनंदाने ) : "हुश्श ...धन्यवाद देवा ... मी तुमच्या मुलाचे प्राण वाचवू शकलो... आता त्याच्या जीवाला काहीही धोका नाही ... तुम्हाला काही शंका असल्यास कृपया नर्स ला विचारा "... असे म्हणत घाईघाईने निघून जातात.

गृहस्थ ( मागून आलेल्या नर्स जवळ ) हा डॉक्टर काय समजतो काय स्वतःला.. माझ्या मुलाच्या तब्येती बद्दल दोन शब्द माझ्याशी बोलण्या एवढाही वेळ नव्हता काय ह्याच्याजवळ.. हा काय दोन मिनिटेही थांबू नाही शकला नसता काय?

नर्स ( रडवेल्या स्वरात ) नसते थांबू शकले ... कारण कालच त्यांचा तुमच्या मुलाच्या वयाचा मुलगा अपघातात मरण पावला आहे... आणि तुमच्या मुलाचा अपघात होऊन तो हॉस्पिटल मध्ये आणला गेला तेव्हा डॉक्टर साहेब त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी स्मशानात होते... स्वतःच्या मुलाला वाचवू शकण्याची संधी त्यांना भेटली नाही परंतु तुमच्या मुलाला जीवनदान देण्यासाठी ते स्मशानातून थेट हॉस्पिटल मध्ये आले व आता परत जाऊन ते तिथले सोपस्कार पूर्ण करणार आहेत... ते येथे आले ते केवळ त्यांच्यावर जी परिस्थिती आलेली आहे ती तुमच्यावर येवू नये म्हणून ..."

तात्पर्य : पूर्वगृह किंवा कलुषित विचारांनी कोणालाही अपशब्द बोलतांना किंवा दुषणे देतांना दहादा विचार करावा ...कारण होऊ शकते कि आज तुमच्यावर ओढवलेल्या अडचणीच्या वेळी ते स्वतःच्या अडचणींना बाजूला सारून ..तुम्हाला मदत करण्यासाठी पुढे आलेले असतात..

Moral-Never judge anyone….. because U never know how their life is & what they’re going through”

बाल विद्या मंदिर प्रशाला १० वी  १९८७ च्या मुला - मुलींचे " स्नेहमिलन - उजाळा आठवणींचा २०१०" माननीय श्री पोटेकर सर दीपप्र...
16/02/2013

बाल विद्या मंदिर प्रशाला १० वी १९८७ च्या मुला - मुलींचे " स्नेहमिलन - उजाळा आठवणींचा २०१०" माननीय श्री पोटेकर सर दीपप्रज्वलन करताना

बाल विद्या मंदिर प्रशाला १० वी  १९८७ च्या मुला - मुलींचे " स्नेहमिलन - उजाळा आठवणींचा २०१०" चे काही फोटो
16/02/2013

बाल विद्या मंदिर प्रशाला १० वी १९८७ च्या मुला - मुलींचे " स्नेहमिलन - उजाळा आठवणींचा २०१०" चे काही फोटो

Address

BAL VIDYA MANDIR PRASHALA , Near Shivaji Park , Besides NANAL PETH Police Station
Parbhani
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bal Vidya Mandir,Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category