21/07/2026
*शेतकरी कुटुंबातील मुलाने जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तेच्या बळावर साकारले एमबीबीएसचे स्वप्न... नीरज होणार डॉक्टर!*
परभणी जिल्ह्यातील मौजे *बोबडे टाकळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील* विद्यार्थी *नीरज नारायणराव बोबडे याने NEET 2026 परीक्षेत 538 गुण, बारावी बोर्ड परीक्षेत 81 टक्के गुण तसेच MHT-CET 2026 परीक्षेत 99.51* पर्सेंटाइल मिळवत पहिल्याच प्रयत्नात *MBBS* प्रवेशासाठी पात्रता मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान उंचावला आहे.
*नीरजने 6 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था, परभणी* येथे पूर्ण केले. शैक्षणिक प्रवासात त्याने *सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेत उल्लेखनीय यश* संपादन केले. मागील वर्षभरात झालेल्या विविध परीक्षांमध्ये तो सातत्याने गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अग्रस्थानी राहिला. त्याच्या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल *जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेतर्फे आज मौजे बोबडे टाकळी येथे समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत नीरज नारायणराव बोबडे व त्याच्या पालकांचा भव्य* सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी नीरजच्या यशाचे मनापासून कौतुक करत त्याच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
याच कार्यक्रमात नुकतीच *परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दिनेशराव बोबडे* यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. दोघांनाही पुढील शैक्षणिक, सामाजिक व सार्वजनिक जीवनातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास *जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेचे सचिव नितीन लोहट सर, प्राचार्य उत्तरेश्वर शिंदे सर, फाउंडेशन विभाग प्रमुख नितीन घुंबरे सर* तसेच गावातील मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, सातत्यपूर्ण परिश्रम, योग्य नियोजन आणि गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण नीरज नारायणराव बोबडे याने आपल्या यशातून घालून दिले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे केवळ बोबडे टाकळी गावाचाच नव्हे, तर संपूर्ण परभणी जिल्ह्याचा अभिमान उंचावला असून, त्याचा हा प्रवास हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. *जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि योग्य दिशा देत अनेक डॉक्टर, अभियंते व अधिकारी घडविण्याची परंपरा कायम राखली असून, नीरजचे यश* ही त्या परंपरेतील आणखी एक सुवर्णकामगिरी ठरली आहे.
..*आणि आता, नीरज होणार डॉक्टर!*