JIJAU ITI Parbhani

Call Directions Website Contact the school

JIJAU ITI Parbhani जिजाऊ आयटीआय, परभणी | आधुनिक सुविधा | तज्ज्ञ प्रशिक्षक | उद्योगाभिमुख प्रशिक्षण | उज्ज्वल करिअरची हमी

ज्येष्ठागौरी पूजन!गौरी मातेच्या पुजनातून आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो..महालक्ष्मी पूजनाच्या सर...
18/09/2026

ज्येष्ठागौरी पूजन!

गौरी मातेच्या पुजनातून आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो..
महालक्ष्मी पूजनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

🇮🇳 १७ सप्टेंबर — मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनहैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!अन्यायाविरुद्ध लढणाऱ्...
17/09/2026

🇮🇳 १७ सप्टेंबर — मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन

हैदराबाद मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!
अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, शौर्य आणि बलिदानाचे स्मरण करण्याचा हा दिवस.

“शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची प्रेरणा देणारा दिवस!”
💐 मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐

विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायांच्या आगमनाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच प्रत्येकाच्य...
14/09/2026

विघ्नहर्ता, मंगलमूर्ती श्री गणरायांच्या आगमनाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, तसेच प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्री गणेशचरणी प्रार्थना! 🌺

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ✨

#श्रीगणेशचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #मंगलमूर्तीमोरया #गणेशोत्सव #हार्दिकशुभेच्छा

फिल्ड व्हिजिट अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना वेल्डिंगचे प्राथमिक ज्ञान!फिटर प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना आज फिल्ड व्...
11/09/2026

फिल्ड व्हिजिट अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना वेल्डिंगचे प्राथमिक ज्ञान!

फिटर प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थ्यांना आज फिल्ड व्हिजिट अंतर्गत वेल्डिंग प्रक्रियेबाबत मूलभूत माहिती व प्रत्यक्ष कार्यपद्धतीची ओळख करून देण्यात आली.

फिल्ड व्हिजिटमुळे प्रशिक्षणार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञान प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी जोडता येते. उद्योगातील कार्यपद्धती, साधने व सुरक्षिततेचे नियम यांची प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने व्यावहारिक कौशल्य, आत्मविश्वास आणि रोजगारक्षमतेत वाढ होते.

शिकूया प्रत्यक्षातून, घडूया कुशलतेने!

11/09/2026

🌳 पोळा सणानिमित्त वृक्षारोपणाचा उपक्रम! 🌱

जिजाऊ आयटीआय, परभणीच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रांगणात पेरू, जांभूळ, आंबा आणि बदाम या फळझाडांची लागवड केली.

“आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे” हा विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

#बैलपोळा #शेतकरी #शेतकरी #महाराष्ट्रशासन #शिक्षक #रक्षाबंधन #आयटीआय

बळीराजाचा सोबती असणाऱ्या  वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. सर्व प्राणी मात्रांविषयी...
10/09/2026

बळीराजाचा सोबती असणाऱ्या वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेम असणाऱ्या आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा हा सण. सर्वांना बैलपोळ्याचा हार्दिक शुभेच्छा!

#बैलपोळा
#शेतकरी

बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र...
09/09/2026

बेरोजगार तरुण-तरुणींना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ चे आयोजन केले आहे. याअंतर्गत दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध ठिकाणी हे रोजगार मेळावे पार पडणार आहेत. परभणीतील अधिकाधिक उमेदवारांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त स
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांनी केले आहे.
यासंदर्भाती सविस्तर वृत्त - https://mahasamvad.in/213817/
#रोजगारमेळावा
#रोजगार
#महाराष्ट्रशासन

जिजाऊ ज्ञानतीर्थच्या विद्यार्थ्याची एम.बी.बी.एस.साठी निवडश्री. वरद नितीन लोहट यांचा जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे...
08/09/2026

जिजाऊ ज्ञानतीर्थच्या विद्यार्थ्याची एम.बी.बी.एस.साठी निवड

श्री. वरद नितीन लोहट यांचा जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे सत्कार

परभणी : जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी श्री. वरद नितीन लोहट यांची एस.एम.बी.टी. कॉलेज, नाशिक येथे एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

वरद लोहट यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुलात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्या यशाने संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्येही नवी प्रेरणा निर्माण झाली आहे.

या निमित्ताने जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमात प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर तरवटे सर, गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव व निदेशक यांच्या उपस्थितीत श्री. वरद नितीन लोहट यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी श्री. वरद नितीन लोहट यांनी जिजाऊ आयटीआयच्या प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनुभव सांगितले. ध्येय निश्चित करून सातत्याने अभ्यास करणे, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाचा स्वीकार करणे यामुळे यश मिळवता येते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी संस्थेचे उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक सिद्धेश्वर जाधव यांना दीपस्तंभ प्रतिष्ठानचा ‘राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिक्षक म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा शिल्पकार! आजच्या धावपळीच्या युगात मुलांना गुणवत्तेबरोबरच एक जबाबदार आणि संवेदनशी...
05/09/2026

शिक्षक म्हणजे जीवनाला योग्य दिशा देणारा शिल्पकार!

आजच्या धावपळीच्या युगात मुलांना गुणवत्तेबरोबरच एक जबाबदार आणि संवेदनशील नागरिक बनवणं खूप गरजेचं आहे. हीच जबाबदारी आपले #शिक्षक बंधू-भगिनी रोज मोठ्या प्रेमाने आणि निष्ठेने पेलत आहेत.

शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आज (२९ ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन... हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज (२९ ऑगस्ट) जयंती....
29/08/2026

आज (२९ ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन...

हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेले महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज (२९ ऑगस्ट) जयंती. त्यांनी हॉकीमध्ये केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळावे, उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत, हा त्यामागील मुख्य उद्देश.

ध्यानचंद यांच्यामुळेच भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत तीन वेळा (१९२८, १९३२ आणि १९३६) सुवर्णपदक पटकावले. १९५६ मध्ये ध्यानचंद यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने अनेक खेळाडूंनी देशाचा नावलौकिक जगात वाढवला आहे. त्यांचा वारसा जपू या. देशाला क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल स्थान प्राप्त करून देण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देऊ या...

मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...



Jijau Dnyanteerth Parbhani - जिजाऊ ज्ञानतीर्थ परभणी Nitin Lohat Nitin Lohat Jijau Dnyanteerth Manvat - जिजाऊ ज्ञानतीर्थ मानवत जिजाऊ ज्ञानतीर्थ गुणवंतांची खाण

Address

Pathi Road 'JIJAU Dnyantirth, CAMPUS'
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when JIJAU ITI Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to JIJAU ITI Parbhani:

Shortcuts

Share

Category