Smart Study With Lila Mam

Smart Study With Lila Mam I am Lila Aghan. Teacher at K.V.Kanya Vidyalaya Panvel. This page for Learners for acquire knowledge.

16/01/2026
*जयपाल सिंह मुंडा* *यांच्या १२३ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन* *जन्मदिन = ३ जानेवारी १९०३**मृत्यू दिन = २० मार्च  १९७०*...
03/01/2026

*जयपाल सिंह मुंडा*
*यांच्या १२३ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन*
*जन्मदिन = ३ जानेवारी १९०३*
*मृत्यू दिन = २० मार्च १९७०*
जयपाल सिंग मुंडा हे भारतीय राजकारणी, लेखक आणि खेळाडू होते. भारतीय संघराज्याच्या नवीन राज्यघटनेवर चर्चा करणाऱ्या संविधान सभेचे ते सदस्य होते. ॲमस्टरडॅम येथे १९२८ च्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांनी भारतीय फील्ड हॉकी संघाचे नेतृत्व केले.
स्वतंत्र आदिवासी राज्य म्हणून झारखंडला मान्यता द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली. पुढे ते १९४६ साली बिहारमधून संविधान सभेसाठी निवडून आले. १९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरवण्यात आली. या बैठकीमध्ये त्यांनी स्वतःची ओळख ‘जंगली’ म्हणून करून दिली. आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले,” आज मी त्या लाखो वीरांच्या वतीने बोलत आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपले अमूल्य योगदान दिले आहे. पण आज त्यांची काही ओळख नाहीये. आपल्या देशाचे मूळनिवासी असणाऱ्या या लोकांना मागास जमाती, चोर, अपराधी, जंगली म्हणून हिणवले जाते. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की मला अभिमान आहे मी जंगली असल्याचा. देशाच्या अनेक भागात आम्हाला याच नावाने ओळखले जाते. मला फक्त हे समजत नाही की आदिवासींच्या हक्काचा प्रस्ताव मंजूर करण्यात संविधान सभेला नेमकी अडचण काय आहे? तुम्ही आदिवासींना लोकशाही मूल्य नाही शिकवू शकत. उलट तुम्हीच त्यांच्या लोकशाही परंपरा शिकून घ्यायला हव्यात. ते या पृथ्वीवरील सगळ्यात लोकशाहीने वागणारे लोक आहेत.असे सागनारे जयपाल सिंग मुंडा यांचे 20 मार्च 1970 रोजी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सेरेब्रल हॅमरेजमुळे निधन झाले . ते 67 वर्षांचे होते अशा महान समाजसेवक जयपाल सिंह मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

भारतातील प्रथम महिलाशिक्षिका, प्रथम महिला मुख्याध्यापिका, समाजसुधारक,कवयित्री , क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, विद्याज्योती...
03/01/2026

भारतातील प्रथम महिलाशिक्षिका, प्रथम महिला मुख्याध्यापिका, समाजसुधारक,कवयित्री , क्रांतीज्योती, ज्ञानज्योती, विद्याज्योती अशा नावाने ओळखतो या महान सावित्रीबाई फुले यांच्या 195 या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन 🙏💐

09/12/2025
विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
02/10/2025

विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Address

Panvel
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Smart Study With Lila Mam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category