SKN Sinhgad College of Engineering, Korti Pandharpur

SKN Sinhgad College of Engineering, Korti Pandharpur Engineering for Excellence "SPSPM was established under the able and dynamic leadership Prof. M. N.

Navale with an objective of providing quality education in the field of engineering, management, computer and school education, Kindergarten onwards. All the institutions under the SPSPM are recognized by the concerned statutory authority and meticulously meets the norms and standard laid down by them. SPSPM has handpicked eminent personalities from the field of education and industry as members of the management committee who are committed to provide necessary guidance on academic and professional fronts from time to time. To serve the interest of the student's community as well as the corporate and industrial sectors SPSPM maintains a close liaison with the industry and other leading organizations. There are experts from different fields contributing their valuable experience to build the institution as a place of learning and discipline. Entrusted by society to create a sustainable world and enhance the global quality of life, engineers serve competently, collaboratively, and ethically.

Placement Success,A.Y. 2025–26.Celebrating the remarkable placement achievements of the talented students of S. K. N. Si...
10/08/2026

Placement Success,A.Y. 2025–26.

Celebrating the remarkable placement achievements of the talented students of S. K. N. Sinhgad College of Engineering, Korti, Pandharpur.

Their dedication, skills, perseverance, and commitment have transformed dreams into careers and efforts into success.

Congratulations to all the placed students, and best wishes for a bright and successful professional journey ahead.

Proud of our achievers,Proud of Pandharpur Sinhgad.

CareerSuccess EngineeringPlacements DreamsIntoCareers FutureEngineers AagazOfSuccess ProudMoment

Placement Success A.Y. 2025–26.Proudly celebrating the remarkable placement achievements of the talented students of S. ...
09/08/2026

Placement Success A.Y. 2025–26.

Proudly celebrating the remarkable placement achievements of the talented students of S. K. N. Sinhgad College of Engineering, Korti, Pandharpur. Their dedication, skills, and perseverance continue to create new milestones and inspire future generations.

Dreams into Careers, Efforts into Success.

प्लेसमेंटमध्ये यशाची दमदार वाटचाल – शैक्षणिक वर्ष २०२५–२६.

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूरच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय प्लेसमेंट यशाचा अभिमानाने गौरव.

त्यांच्या मेहनती, कौशल्य, समर्पण आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी यशाची नवी शिखरे गाठत भविष्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

स्वप्नांना करिअरची दिशा, प्रयत्नांना यशाची साथ.

CareerSuccess EngineeringPlacements SinhgadPride AspirationsToAchievements AY202526

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा.मेकॅनिकल विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ₹७.५...
07/08/2026

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पंढरपूर सिंहगडचा दबदबा.

मेकॅनिकल विभागातील पाच विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंटमधून वार्षिक ₹७.५ लाखांच्या आकर्षक पॅकेजवर निवड.

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाने आणखी एक उल्लेखनीय यश आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विभागातील अंतिम वर्षातील पाच गुणवंत विद्यार्थ्यांची देशातील अग्रगण्य आणि जागतिक कीर्तीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली असून, या सर्वांना वार्षिक ₹७.५ लाखांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले आहे. या यशामुळे महाविद्यालयाच्या उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरेला आणखी एक सुवर्ण अध्याय लाभला आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ओंकार राजेंद्र मुंढे (बोरगाव, ता. बार्शी), सौरभ संजय दिघे (वाढेगाव, ता. सांगोला), सोहेल बाबू खान (वाठार, ता. कराड, जि. सातारा), वैष्णवी धनंजय पाटील (पिंपळनेर, ता. माढा) आणि श्रेयस सिताराम दामोदरे (पंढरपूर) यांचा समावेश असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित औद्योगिक समूहांपैकी एक असून फॉर्च्युन ५०० यादीत स्थान मिळवणारी जागतिक दर्जाची कंपनी आहे. ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, ऑइल अँड गॅस, दूरसंचार, वस्त्रोद्योग आणि अत्याधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या या कंपनीचे मुख्यालय मुंबई येथे असून जगभरात तिचा विस्तार आहे. उत्कृष्ट गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि करिअरच्या अमर्याद संधींसाठी ही कंपनी ओळखली जाते.

या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. शाम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी यांच्यासह सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

🎉 Another Outstanding Placement Achievement at SKN Sinhgad, Pandharpur! 🌟Heartiest congratulations to Prajakta Tanaji Ba...
02/08/2026

🎉 Another Outstanding Placement Achievement at SKN Sinhgad, Pandharpur! 🌟

Heartiest congratulations to Prajakta Tanaji Bagal, a Mechanical Engineering student of SKN Sinhgad College of Engineering, Korti, Pandharpur, on being selected as Assistant Development Design Engineer at Cooper Lighting Solutions, Pune with an impressive ₹9.79 LPA annual package.

Your dedication, technical excellence, and hard work have brought pride to the entire Sinhgad family. Wishing you a successful career and many more achievements ahead!

CooperLightingSolutions FutureEngineer EngineeringExcellence Pandharpur ProudMoment 9_79LPA CareerSuccess ExcelForever

*सिंहगड पंढरपूर येथे काँक्रिट मिक्स डिझाइन आणि एसपीएसएस सॉफ्टवेअर या विषयावर मूल्यवर्धित कार्यक्रम संपन्न*पंढरपूर : एस. ...
02/08/2026

*सिंहगड पंढरपूर येथे काँक्रिट मिक्स डिझाइन आणि एसपीएसएस सॉफ्टवेअर या विषयावर मूल्यवर्धित कार्यक्रम संपन्न*

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत तृतीय वर्ष बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी "काँक्रिट मिक्स डिझाइन आणि एसपीएसएस सॉफ्टवेअर" या विषयावर चार दिवसीय मूल्यवर्धित कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम दि. २८ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये तृतीय वर्ष बी.टेक. स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना आधुनिक काँक्रिट मिक्स डिझाइनची तत्त्वे, भारतीय मानकांनुसार मिश्रण रचना, विविध दर्जाच्या काँक्रिटचे प्रमाण निश्चिती, सुपरप्लास्टिसायझरचा वापर, तसेच प्रयोगशाळेमध्ये प्रत्यक्ष काँक्रिट मिक्स डिझाइनची प्रात्यक्षिके देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व टिकाऊ काँक्रिट निर्मितीची सखोल माहिती प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी उपयुक्त असलेल्या एसपीएसएस या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये माहिती संकलन, डेटा एन्ट्री, वर्णनात्मक सांख्यिकी (डिस्क्रिप्टिव स्टॅटिस्टिक्स), सहसंबंध (कोरिलेशन), प्रतिगमन विश्लेषण (रिग्रेशन ऍनालिसिस), परिकल्पना चाचण्या ( हायपोथिसिस टेस्टिंग) तसेच संशोधनातील सांख्यिकीय निष्कर्षांचे विश्लेषण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष उदाहरणांवर आधारित सराव करून संशोधन व डेटा विश्लेषणासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात केली.

या मूल्यवर्धित कार्यक्रमासाठी अल्ट्राटेक आरएमसी येथील गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रमुख श्री. वैभव जगताप आणि प्रा. अजित करांडे यांनी काँक्रिट मिक्स डिझाइन विषयावर तर प्रा. ओंकार बिडकर यांनी एसपीएसएस सॉफ्टवेअर विषयावर मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी उद्योग व संशोधन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामकाजातील अनुभवावर आधारित प्रशिक्षण दिले.

कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी आधुनिक तांत्रिक सॉफ्टवेअर आणि संशोधन साधनांचे ज्ञान आत्मसात करून उद्योग व उच्च शिक्षण क्षेत्रातील संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इस्रो मार्फत ऑनलाइन कार्यशाळा संपन्न*सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस क...
01/08/2026

*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इस्रो मार्फत ऑनलाइन कार्यशाळा संपन्न*

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आय आय आर एस), डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने 1054 व्या आउटरीच कार्यक्रमांतर्गत “ अर्थ ऑब्झर्वेशन्स अँड न्यूमरिकल मॉडेल एप्लीकेशन फॉर ट्रॉपकल सायकल मॉनिटरिंग अँड फोरकास्टिंग ” या विषयावरील ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दिनांक 30 जुलै 2026 रोजी या कार्यशाळेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते. ही कार्यशाळा द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेमध्ये पृथ्वी निरीक्षण (अर्थ ऑब्झर्वेशन) तंत्रज्ञान, उपग्रहाद्वारे प्राप्त होणाऱ्या माहितीचा उपयोग, उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे निरीक्षण, संख्यात्मक (न्यूमरिकल) मॉडेलच्या साहाय्याने चक्रीवादळाचा अंदाज, डेटा विश्लेषण व व्हिज्युअलायझेशन तंत्र तसेच विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिक याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे समन्वयक व नोडल सेंटर समन्वयक प्रा. मिलिंद तोंडसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वयन केले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, हवामान निरीक्षण व नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाल्याने त्यांचा शैक्षणिक व संशोधनात्मक दृष्टिकोन अधिक व्यापक होण्यास मदत झाली.

ISRO–IIRS Online Workshop Successfully Conducted at SKN Sinhgad College of Engineering, Pandharpur.

The online workshop on "Earth Observations and Numerical Model Application for Tropical Cyclone Monitoring and Forecasting" empowered Civil Engineering students with insights into satellite technology, remote sensing, weather monitoring, and disaster management.

Heartfelt thanks to the guidance of Dr. Kailash Karande (Principal), Dr. Swanand Kulkarni (Vice Principal), Dr. Yashwant Pawar (HOD, Civil Engineering), and the coordination of Prof. Milind Tondse (Nodal Centre Coordinator) for making this program a success.

EarthObservation CivilEngineer

*कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिंहगडचा दबदबा*सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची इका केमिकल्समध्ये निवड*वार...
01/08/2026

*कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सिंहगडचा दबदबा*
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १० विद्यार्थ्यांची इका केमिकल्समध्ये निवड
*वार्षिक ४ लाखांच्या पॅकेजवर मिळाली नोकरी*

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील दहा विद्यार्थ्यांची पुणेस्थित इका केमिकल्स या नामांकित कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक चार लाख रुपयांचे वेतन पॅकेज मिळणार असल्याची माहिती विभागप्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी दिली.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुप बालाजी नाईकल (पंढरपूर), साहिल संतोष घाळके (कोर्टी), राज विकास काटवटे (उस्मानाबाद), तुषार संजय पवार (पंढरपूर), आसावरी भगवानराव महाडिक (कोळेगाव), साक्षी आबासो बनसोडे (मंगळवेढा), तेजस्वी यशवंत खांडेकर (कलढोण), ज्ञानेश्वरी महेश खरात (पंढरपूर), प्रसाद पंडित डोके (पंढरपूर) तसेच अभिषेक चंद्रकांत देवरे (पापरी, ता. मोहोळ) यांचा समावेश आहे.

इका केमिकल्स ही बांधकाम क्षेत्रासाठी उच्च दर्जाची व टिकाऊ रासायनिक उत्पादने विकसित करणारी पुणेस्थित अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीतील निवडीमुळे विद्यार्थ्यांना करिअरची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश संपादन केल्याचे सांगितले. ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले की, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्त्व विकासावर महाविद्यालय विशेष भर देत असून, त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांची सातत्याने नामांकित कंपन्यांमध्ये निवड होत आहे.

या यशाबद्दल उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडुरु, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अमोल कांबळे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

CivilEngineering FutureEngineers CareerGrowth EngineeringExcellence TrainingAndPlacement

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा वाखरी पालखी तळ स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभागपंढरपूर: आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरप...
30/07/2026

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा वाखरी पालखी तळ स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग

पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वारीचा संदेश देण्यासाठी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी वाखरी पालखी तळ येथे स्वच्छता अभियान 27 जुलै 2026 रोजी राबवून उल्लेखनीय सामाजिक योगदान दिले.

या अभियानामध्ये स्वयंसेवकांनी पालखी तळ परिसराची स्वच्छता, प्लास्टिक व कचरा संकलन, परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती तसेच वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य केले. "स्वच्छ वारी – सुंदर वारी" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजापर्यंत पोहोचवली.

या उपक्रमामुळे पालखी तळ परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत राहण्यास मदत झाली. वारकरी, स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ आणि प्रा. अजित करांडे यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन करत समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहन केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य "Not Me But You" प्रत्यक्ष कृतीतून साकार करत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी वाखरी पालखी तळ येथे राबविलेले स्वच्छता अभियान हे सामाजिक उत्तरदायित्व आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.

SundarWari SwachhBharat AshadhiWari Wakhari Pandharpur SocialResponsibility CommunityService EnvironmentalAwareness YouthForChange CleanlinessDrive ServiceToHumanity ProudSinhgad NSSActivities GreenInitiative EngineeringWithValues

Successfully Completed. The 3-Day Value Addition Program (VAP) on "Practical Skills in Electronic Components, Testing an...
30/07/2026

Successfully Completed.

The 3-Day Value Addition Program (VAP) on "Practical Skills in Electronic Components, Testing and Electronic Measurement Instruments" was successfully conducted from 28th to 30th July 2026 for S.Y. B.Tech (E&TC) students at SKN Sinhgad College of Engineering, Pandharpur, under the association of IETE.

The program was successfully organized under the visionary guidance of Dr. Kailas Karande (Principal), Dr. Swanand Kulkarni (Vice Principal).

The event was conducted under the leadership of Dr. A. O. Mulani (Head, E&TC Department), and coordinated by Mr. A. D. Harale (VAP Coordinator).

The program equipped students with hands-on experience in electronic components, testing techniques, and electronic measurement instruments, enhancing their practical knowledge and industry readiness.

Congratulations to all the participants, resource persons, and organizers for the successful completion of the program.

SkillDevelopment HandsOnLearning Electronics IndustryReady EngineeringEducation Pandharpur LearnTodayApplyTomorrow ExcelForever

*सिंहगडच्या श्रेयस अत्रेची ८.४० लाखांच्या पॅकेजवर 'मॅडव्हर्स म्युझिक'मध्ये भरारी!*एस.के.एन. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्य...
29/07/2026

*सिंहगडच्या श्रेयस अत्रेची ८.४० लाखांच्या पॅकेजवर 'मॅडव्हर्स म्युझिक'मध्ये भरारी!*
एस.के.एन. सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या यशाने पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी श्रेयस राजेंद्र अत्रे याची भारतातील आघाडीची म्युझिक डिस्ट्रिब्युशन आणि प्रमोशन कंपनी मॅडव्हर्स म्युझिकमध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावर वार्षिक ८.४० लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजसह निवड झाली आहे. या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयासह पंढरपूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतातील स्वतंत्र संगीत कलाकार आणि रेकॉर्ड लेबल्सना जागतिक स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मॅडव्हर्स म्युझिक ही वेगाने प्रगती करणारी कंपनी असून, कलाकारांचे संगीत विविध आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पोहोचविणे, त्यातून उत्पन्न वाढविणे आणि त्यांच्या करिअरच्या विकासासाठी आवश्यक सेवा पुरविण्याचे काम ती करते. श्रेयस अत्रे हे ३ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीत रुजू होणार आहेत.
महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना उद्योगजगतासाठी सक्षम बनविण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स, एप्टिट्यूड ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, इंडस्ट्री एक्स्पर्ट सेशन्स, करिअर मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्त्व विकास अशा विविध कौशल्यविकास उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, व्यावसायिक कौशल्ये आणि स्पर्धात्मकता विकसित होत असून त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये उच्च वेतनाच्या नोकरीच्या संधी मिळत आहेत.
श्रेयस अत्रे यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, विभागप्रमुख डॉ. शाम कुलकर्णी तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
CampusPlacement Pandharpur FutureReady EngineeringExcellence ProudMoment

Address

Korti
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when SKN Sinhgad College of Engineering, Korti Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SKN Sinhgad College of Engineering, Korti Pandharpur:

Shortcuts

Share

Category