SVIPE's Institute of Computer and Management Studies,Kasegaon Pandharpur

  • Home
  • India
  • Pandharpur
  • SVIPE's Institute of Computer and Management Studies,Kasegaon Pandharpur

SVIPE's Institute of Computer and Management Studies,Kasegaon Pandharpur Shri Vithal Institute of Progressive Education (SVIPE)
Dr. B.P. Ronge
Founder Secretary

On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvan Day, we pay tribute to his thoughts and struggles, reaffirmin...
10/12/2024

On the occasion of Dr. Babasaheb Ambedkar's Mahaparinirvan Day, we pay tribute to his thoughts and struggles, reaffirming our commitment to promoting equality, liberty, and fraternity in society.







श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढ...
14/04/2023

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वांना शिक्षणाचा अधिकार, सर्व धर्म समभावाची भावना, सर्वांना सामाजिक न्याय या ठिकाणी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळू लागला आहे.असा विचार महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एस.भोईटे यांनी व्यक्त केला. सदर जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल, उपाध्यक्ष बी.ङी.रोंगे व संस्थेचे विश्वस्त व खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद...
12/04/2023

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन संचलित, इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये महात्मा जोतिराव फुले यांची १९६ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर त्या म्हणाल्या की,शिक्षणाचे जनक असलेल्या फुले दांपत्यामुळेच आज शैक्षणिक क्षेत्रात ऐतिहासिक बदल दिसून येत आहेत. महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळेच आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्य करत आहेत. त्याचे संपूर्ण श्रेय महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना जाते. महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य खूप महान आहे आणि ते कधीच विसरता येणार नाही. आज समाजात कोठेही भाषण असो अथवा शैक्षणिक सभा असो, महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव हमखास निघते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने महात्मा जोतिबा फुले यांनी समाज सुधारण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य अविस्मरणीय असे आहे.’

महात्मा जोतिराव फुले यांच्या योगदानामुळे आज समाजात स्त्री व पुरुष खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत असा विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे यांनी मांडला. महात्मा जोतिराव फुले यांची १९६ वी जयंती साजरी करण्यासाठी महाविद्यालयाचे विभागप्रमुख प्रा.मुकुंद चौगुले, अॕकॅडमीक इन्चार्ज, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर जयंती अगदी मोठ्या उत्साहात साजरी केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल, उपाध्यक्ष बी.ङी.रोंगे व संस्थेचे खजिनदार व विश्वस्त दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले आहे.

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढर...
08/04/2023

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज, कासेगाव पंढरपूर या महाविद्यालयामध्ये जागतिक आरोग्य दिन (World Health Day) संपन्न झाला.आज महाविद्यालयामध्ये जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉ.स्नेहा रोंगे डॉक्टर (बी.पी.रोंगे हॉस्पिटल, पंढरपूर) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आरोग्य कसे सुधारते, आरोग्याविषयी महत्त्वाच्या टिप्स,व आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी, आहार व व्यायाम यामुळे शरीर कसे तंदुरुस्त राहते.तसेच त्यांनी आहार कोणत्या पद्धतीचा आवश्यक आहे, व कोणत्या वेळेमध्ये घेतला पाहिजे आणि किती घेतला पाहिजे, कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वतःच्या शरीरातील हार्मोन्स संतुलन कशाप्रकारे व्यवस्थित ठेवता येईल यावर सुद्धा मार्गदर्शन केले. "दिनचर्या असावी व्यायामयुक्त, निरोगीच जीवन त्यांचे चिंतामुक्त नित्य प्राणायाम आणि करता योग जीवनाचा खरा घेता येईल उपभोग." असा आरोग्य विषयी कानमंत्र देखील डॉ.स्नेहा रोंगे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.या कार्यक्रमानिमित्त कॉलेजच्या कॅम्पसप्रमुख डॉ.जयश्री भोसले, प्राचार्य डॉ.ए.एस.भोईटे, विभाग प्रमुख प्रा मुकुंद चौगुले,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.डॉ.स्नेहा रोंगे यांचा सत्कार डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे,खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले

Address

Old Kasegaon Road, Kasegaon Pandharpur
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when SVIPE's Institute of Computer and Management Studies,Kasegaon Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SVIPE's Institute of Computer and Management Studies,Kasegaon Pandharpur:

Shortcuts

Share

Category