Shanta-Prabhu Prashala,Ajansond.

Shanta-Prabhu Prashala,Ajansond. "KNOWLEDGE IS POWER"

शिस्त,संस्कार,गुणवत्ता यांच्या आधारे आमचा विद्यार्थी उत्तम माणूस म्हणून समाजात कसा जगू शकेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हेच व्रत स्वीकारून यशस्वी वाटचाल सुरु आहे.परंतु आपणा सर्वांचे साहकार्य अनमोल आहे...���

15/08/2025
15/08/2025
*शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड*               🇮🇳 *स्वातंत्र्य दिन* 🇮🇳      प्रशालेत आज शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोज...
15/08/2025

*शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड*

🇮🇳 *स्वातंत्र्य दिन* 🇮🇳

प्रशालेत आज शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:00 वाजता *स्वातंत्र्य दिन* सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांता- प्रभू शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ, अजनसोंडचे सचिव माननीय श्री. हरिदास कोंडीबा घाडगे व संस्थेचे सदस्य माननीय श्री. सुरेश ज्ञानदेव डुबल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच व्यासपीठावरील इतर मान्यवर यांचे गुलाब पुष्प देऊन प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. व्ही. एल. सर्वगोड सर यांनी त्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीस अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजगीत, राष्ट्रगीत, राज्यगीत व संविधान झाल्यानंतर सन 2024- 25 या वर्षांमध्ये प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी शासकीय सेवेत नोकरी मिळवली अशा विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सूर्योदय फाउंडेशनतर्फे प्रशालेतील इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
प्रशाला विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत असते. याची दखल समाजातील संस्था व दानशूर व्यक्ती यांनी घेतली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी या दातृत्ववान व्यक्तींकडून इयत्ता पाचवी ते दहावीमध्ये सर्वप्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही पारितोषिके देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते.
पारितोषिक वितरणानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेला विद्यार्थी चिरंजीव कमेश नानासो बंगाळे व चिरंजीव रणजित दादासो घाडगे यांनी स्पर्धा परीक्षा तसेच या विद्यार्थ्यांनी वापरलेली अभ्यासाची पद्धत,त्यांना आलेले अनुभव आपल्या भाषणातून सांगितले व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत उतरण्यासाठी प्रेरित केले. त्यानंतर प्रशालेने साधलेली प्रगती,विद्यार्थ्यांसाठी प्रशाला करत असलेले प्रयत्न व माजी विद्यार्थी व पालकांचे सहकार्य याविषयी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. व्ही. एल. सर्वगोड सर यांनी आपले विचार मांडले व सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक श्री. एस. एच. घाडगे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, इयत्ता पाचवी ते दहावीमधील विद्यार्थी, प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!शांता प्रभु प्रशाला अजनसोंड ता पंढरपुर आपल्या प्रशालेचा माजी विध्यार्थी कमेश नानासो बंगा...
22/07/2025

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
शांता प्रभु प्रशाला अजनसोंड ता पंढरपुर
आपल्या प्रशालेचा माजी विध्यार्थी
कमेश नानासो बंगाळे
( M. TECH. MECH ENGG )
यांचे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये ज्युनियर इंजनियर या पदाकरिता निवड झाली. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिकअभिनंदन 💐💐 (edited)

शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड       तालुका पंढरपूर. जिल्हा सोलापूर               🧘‍♀️  जागतिक योग दिन 🧘‍♂️         आज शन...
21/06/2025

शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड
तालुका पंढरपूर. जिल्हा सोलापूर

🧘‍♀️ जागतिक योग दिन 🧘‍♂️

आज शनिवार दिनांक 21 जून रोजी शांता प्रभू प्रशाला अजनसोंड येथे जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात प्रशालेच्या प्रांगणात सकाळी ठीक 7:00 वाजता साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम आरोग्यासंबंधी प्रार्थना घेण्यात आली त्यानंतर प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.टी.एस. नाईकनवरे सर यांनी योगांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्याकडून करून घेतली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहात योगासनांची प्रात्यक्षिके केली. ताडासन, वज्रासन, सर्वांगासन, त्रिकोणासन, धनुरासन, शीर्षासन, नौकासन, हलासन, शलभासन, शवासन ही योगासने याशिवाय इतर योगासनाची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली. भस्त्रिका प्राणायाम,भ्रामरी प्राणायाम, वज्रासन प्राणायाम, स्ट्रेचिंग प्राणायाम, बटरफ्लाय प्राणायाम, कनिष्ठ प्राणायाम, मध्यम प्राणायाम, बटरफ्लाय प्राणायाम या प्राणायमांची प्रात्यक्षिके प्रशालेतील शिक्षक श्री. टी.आर. कांबळे सर यांनी करून घेतली. तसेच त्यांना प्रणायमांचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांबरोबर प्रशालेतील शिक्षकांनीही योगांची प्रात्यक्षिके मोठया उत्साहात केली. नंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रतिज्ञा घेतली . प्रतिज्ञा नंतर प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री.व्ही.एल. सर्वगोड यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
🧍‍♀️🧎🧎‍♂️🏃🏻‍♂️🧘‍♀️🧘‍♂️

💐शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड  ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर 💐🌹 माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम       ( दहावी बॅच -2003 ) ...
22/05/2025

💐शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड ता.पंढरपूर जिल्हा सोलापूर 💐

🌹 माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रम
( दहावी बॅच -2003 ) 🌹

प्रशालीमध्ये रविवार दिनांक 18 मे 2025 रोजी दहावी बॅच 2002 - 2003 या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.व्ही. एल. सर्वगोड उपस्थित होते तर प्रशालेची माजी मुख्याध्यापक माननीय श्री.सी. यू. गुळमे सर, माननीय श्री. ए. एस.खांडेकर सर तर प्रशालेतील माजी शिक्षक माननीय श्री. एन. व्ही. जाधव सर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिमापूजनानंतर माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा शाल, हार, श्रीफळ व विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट देऊन सत्कार केला. सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचेही प्रशालेत स्वागत करण्यात आले.नंतर माजी विद्यार्थ्यांची हजेरी श्री. एस. एच. घाडगे सर यांनी घेतली. हजेरीनंतर विद्यार्थी परिचय घेण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांनी दहावीनंतर घेतलेले शिक्षण,विद्यार्थी करत असलेली नोकरी किंवा व्यवसाय यासंबंधी माहिती दिली. नोकरी व्यवसाय या कारणामुळे विद्यार्थी एकमेकांना भेटू शकत नव्हते परंतु या माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या वर्गातील मित्र मैत्रिणींना तसेच त्यांना अध्यापन केलेल्या सर्व शिक्षकांना भेटणे शक्य झाले त्यामुळे विद्यार्थ्यांना 22 वर्षानंतर एकमेकांना भेटून खूप आनंद झाला व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जुन्या आठवणींनाही उजाळा मिळाला. या बॅचचे विद्यार्थी 22 वर्षानंतर एकत्र आलेले होते.त्यामुळे या परिचयाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला.
विद्यार्थी परिचयानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली या मनोगतातून विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यावर केलेले संस्कार,भावी वाटचालीसाठी केलेले मार्गदर्शन त्यांचे उत्कृष्ट अध्यापन याविषयी सांगितले. आम्ही शिक्षकांमुळे कसे आदर्श नागरिक घडत गेलो याविषयीही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले व इतक्या कालावधीनंतर भेटून सर्वांना खूप आनंद झाला व ऋणानुबंधामध्ये वाढ झाल्याचे सांगितले.
शारीरिक तंदुरुस्तीकडे लक्ष द्या, नवीन ज्ञान मिळवत रहा, प्रत्येक क्षण आनंदाने जगा असे आपल्या मनोगतातून कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.तर जीवन सुंदर सुंदर आहे त्याकडे सकारात्मक दृष्टीने पहा असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. सर्वगोड सर यांनी सांगितले. नंतर माजी विद्यार्थी श्री.समीर घाडगे याने सर्वांचे आभार मानले. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे फोटोसेशन झाले फोटोसेशननंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील शिक्षक माननीय श्री. एस. एच. घाडगे सर यांनी उत्कृष्टरित्या केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी गायत्री कांबळे हिने सुंदर,आकर्षक रांगोळी काढली. मा. श्री.कांबळे सर यांनी सुंदर फलक लेखन केले. शिवराज मोरे,ओम मोरे, राज नाईकनवरे, रवी भोई, प्रेम कांबळे, गायत्री कांबळे, वेदश्री घाडगे या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी दिवसभर थांबून कार्यक्रमासाठी मोलाची मदत केली.
या कार्यक्रमासाठी दहावी बॅच 2003 चे सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
💐💐💐💐💐💐💐

आपल्या शांता-प्रभू प्रशालेस कृतिशील शाळा पुरस्कार जाहीर! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!🏆💥✌️🎂💐📚📊
01/05/2025

आपल्या शांता-प्रभू प्रशालेस कृतिशील शाळा पुरस्कार जाहीर! सर्वांचे हार्दिक अभिनंदन!🏆💥✌️🎂💐📚📊

शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड  तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर      💐शिक्षण परिषद कार्यक्रम 💐      आज शुक्रवार दिनांक 27 ड...
27/12/2024

शांता- प्रभू प्रशाला, अजनसोंड
तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर

💐शिक्षण परिषद कार्यक्रम 💐

आज शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी प्रशालेमध्ये तुंगत केंद्र शिक्षण परिषद - माहे डिसेंबर 2024 दुपारी 2:00 ते 5:00 या कालावधीमध्ये अतिशय उत्साहात पार पडली. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री. व्ही. एल.सर्वगोड सर उपस्थित होते तर तुंगत केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री.एम. डी.काळुंगे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमापूजननंतर केंद्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सोलापूर जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांच्यामार्फत आयोजित केलेल्या विज्ञान प्रज्ञा स्पर्धा परीक्षेमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रशालेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थीनी कुमारी अंकिता समाधान घाडगे हिचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर माननीय श्री. सावळकर सर यांनी रंगोत्सव व समृद्धी या विषयावरती, शाळासिद्धि या विषयावरती माननीय श्री. गोसावी सर व हॅ केथॉन या विषयावरती माननीय श्री. आर. डी. घाडगे सर यांनी अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केले. तर निपुणोत्सव या विषयावरती केंद्रप्रमुख माननीय श्री. काळुंगे साहेब यांनी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सर्व शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही व्हावे, विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत असा मोलाचा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री.व्ही. एल.सर्वगोड सर यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना दिला. प्रशालेतील शिक्षक श्री. टी. आर. कांबळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी तुंगत केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
💐💐💐💐💐

09/09/2024

#स्वच्छतामॉनिटर2024 चा च्या करण्याचा अनुभव.

#महाराष्ट्र मध्ये जो घाण करेल, त्याला थांबवून केलेली चूक त्यांनेच दुरुस्त करण्याची विनंती करणार.

उद्दिष्ट: कचऱ्याबाबत निष्काळजी मुक्त #महाराष्ट्र

🌹आपल्या "शांतप्रभू प्रशाला,अजनसोंड " या शाळेला राज्यस्तरीय "आदर्श शाळा " पुरस्कार मिळाला. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्या...
07/09/2024

🌹आपल्या "शांतप्रभू प्रशाला,अजनसोंड " या शाळेला राज्यस्तरीय "आदर्श शाळा " पुरस्कार मिळाला. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक,सर्व विद्यार्थी, संस्था अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य "शांतप्रभू शैक्षणिक व सामाजिक विकास मंडळ," अजनसोंड व सर्व ग्रामस्थ अजनसोंड, देगांव, बिटरगाव यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹

Address

Pandharpur
413304

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 7:45am - 11:30am

Telephone

+919975092029

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shanta-Prabhu Prashala,Ajansond. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shanta-Prabhu Prashala,Ajansond.:

Shortcuts

Share

Category