Krushi Vasant Farm & Nursery

Krushi Vasant Farm & Nursery Official page by "Krushi Vasant" Farm ,Paithan Mega Food Park Road,Dhangaon,Ta.Paithan,Dist.Aurangabad (Sambhajinager)
Maharashtra, India Pin-431105

एका जनार्दनी सांवता तो धन्य। तयाचे महिमान न कळे काही॥भक्ती, श्रम आणि समतेचा संदेश आपल्या आचरणातून देणारे संत शिरोमणी साव...
11/08/2026

एका जनार्दनी सांवता तो धन्य। तयाचे महिमान न कळे काही॥

भक्ती, श्रम आणि समतेचा संदेश आपल्या आचरणातून देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

संत सावता महाराजांनी आपल्या कार्यातून ‘कर्म हीच भक्ती’ आणि सेवेतूनच ईश्वरप्राप्तीचा मार्ग समाजाला दाखवला. त्यांचे विचार आणि संतपरंपरेचा वारसा आपल्याला सदैव प्रेरणा देत राहो, हीच प्रार्थना !

वनश्री | युवा शेतकरी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त श्री.यज्ञेश वसंतराव कातबने यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय, नाविन...
10/08/2026

वनश्री | युवा शेतकरी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त
श्री.यज्ञेश वसंतराव कातबने यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय, नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत
“वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार – २०२६”
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान,पुसद
यांच्यावतीने देण्यात येणारा हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐

शेतीकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे माध्यम म्हणून केलेले आपले कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, फळबाग लागवड,शाश्वत शेती, शेतकरी मार्गदर्शन तसेच कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग यांच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

आपल्या कार्याची दखल घेत मिळालेला वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार – २०२६” हा केवळ एक पुरस्कार नसून, आपल्या आजवरच्या प्रामाणिक कृषी कार्याचा सन्मान आणि भविष्यातील कार्यासाठी मिळालेली प्रेरणेची नवी ऊर्जा आहे.

आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि नाविन्यपूर्ण विचारांचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळत राहो. आपल्या कार्यातून आधुनिक, समृद्ध आणि आत्मनिर्भर शेतीचा नवा आदर्श निर्माण व्हावा, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या या यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, मार्गदर्शक, सहकारी आणि संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी निश्चितच अभिमानाचा क्षण निर्माण झाला आहे.

आपल्या पुढील कृषी वाटचालीस उत्तरोत्तर यश लाभो,
आपल्या हातून शेतकरी हिताचे आणि कृषी विकासाचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडो,
आणि आपल्या कार्याला भविष्यातही असेच अनेक मान-सन्मान प्राप्त होत राहोत,
हीच मनःपूर्वक सदिच्छा!

“शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेले कार्यच खऱ्या अर्थाने कृषी सेवेचा गौरव आहे.”

हार्दिक अभिनंदन...!
हार्दिक शुभेच्छा.....! 🙏

#वसंतरावनाईककृषीगौरवपुरस्कार२०२६
#वसंतरावनाईकस्मृतीप्रतिष्ठानपुसद
#यज्ञेशवसंतरावकातबने
#कृषीगौरव #कृषीसेवा #शेतकरी #सन्मान #अभिमान #अभिनंदन #प्रेरणा #आधुनिकशेती #फळबाग-लागवड

04/08/2026
महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तथा शेतकरी - शास्त्रज्ञ फेलो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी. प...
11/07/2026

महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त तथा शेतकरी - शास्त्रज्ञ फेलो, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी. प्रयोगशील शेतकरी श्री. यज्ञेश वसंतराव कातबने यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार – २०२४' हा सन्मान जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी निस्वार्थ भावनेने केलेल्या समर्पित कार्याचा हा सन्मान असून, त्यांच्या या यशामुळे पर्यावरण क्षेत्राचा गौरव अधिक उंचावला आहे. वृक्ष लागवड,वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीसाठी आपण केलेले सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे. पर्यावरण संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आपले कार्य असेच वृद्धिंगत होत राहो. आपल्या भावी यशस्वी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!

🥭 केशर आंबा लागवडीची सुवर्णसंधी..! एकरी उत्पन्न : ₹५ लाख ते ₹१० लाख!✅ दिर्घकालीन उत्पन्नाची हमी देणारी शेती - केशर आंबा ...
13/06/2026

🥭 केशर आंबा लागवडीची सुवर्णसंधी..!
एकरी उत्पन्न : ₹५ लाख ते ₹१० लाख!

✅ दिर्घकालीन उत्पन्नाची हमी देणारी शेती - केशर आंबा शेती - आता आपल्या शेतात!

▪️कृषि वसंत नर्सरी अँड फार्म
सन २०२० पासून लाखो शेतकऱ्यांचा विश्वास!
🏅 महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

🏆 कृषिरत्न श्री.वसंतराव कातबने ( से.नि.उप कृषी अधिकारी,कृषी विभाग,महाराष्ट्र शासन यांचे अमूल्य मार्गदर्शन

🏆 युवा शेतकरी-महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त संचालक श्री.यज्ञेश वसंतराव कातबने यांचे मार्गदर्शन

🌟 केशर आंबा लागवडीचे फायदे:
✔️ एकदाच लागवड, ३०-४० वर्ष दरवर्षी उत्पन्न.
✔️ २ वर्षांत उत्पन्नाची सुरुवात.
✔️ शाश्वत आणि फायदेशीर फळपिक.
✔️ एकरी ₹५ लाख - ₹१० लाख उत्पन्न.

🌿 कृषि वसंत नर्सरीकडून मिळणारे विशेष लाभ:
✔️ १००% जातिवंत व शास्त्रशुद्ध कलमे.
✔️ लागवडीसाठी संपूर्ण मार्गदर्शन.
✔️ जमीन निवडण्यापासून विक्रीपर्यंत सल्ला.
✔️ दर महिन्याचे कामकाज व तांत्रिक मदत.
✔️ छाटणी, खत, फवारणी व पाणी व्यवस्थापन मार्गदर्शन.

🪴 स्वतःच्या मदरप्लांटपासून तयार केलेली दर्जेदार, रोगमुक्त, जातीवंत रोपे.🥭

🌱 कृषि वसंत नर्सरीचे व्हिजन:
२०३० पर्यंत १ लाख शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण

🎯 आमचे मिशन:
शेतकऱ्याला कृषी उद्योजक बनवणे व आर्थिक उत्पादन वाढवणे

📣 चला तर मग, शेतीला उद्योग बनवूया आणि केशर आंब्याच्या लागवडीतून उज्वल भविष्य घडवूया!

💰 आजच रोपांची बुकिंग करा आणि आपल्या शेतीत सोनं पिकवा!

▪️संपर्क करा किंवा नर्सरीला भेट द्या...
📍 कृषि वसंत फार्म अँड फार्म,
पैठण मेगा फूड पार्क रोड,धनगांव,
ता.पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

नर्सरी लोकेशन - https://maps.app.goo.gl/1CunPeeNoDWmBUhM9?g_st=ac

☎️7083739999 | 9021836262 |

✨ केशर आंबा शेती — तुमच्या दोन पिढ्यांचे भविष्य उज्वल करणारी शेती! ✨

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ।।श्रीरामनवमी आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
26/03/2026

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ।।

श्रीरामनवमी आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! भारतीय संस्कृतीची परंपरा, सणांचे महत्त्व आणि नवचैतन्याचा संदेश देणारा ...
19/03/2026

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! भारतीय संस्कृतीची परंपरा, सणांचे महत्त्व आणि नवचैतन्याचा संदेश देणारा हा पवित्र सण आपल्या जीवनात नव्या आशा, नवीन संधी आणि यशाची सुवर्णसंधी घेऊन येवो.

गुढी उभारण्याच्या या पावन क्षणी सकारात्मक विचार, उत्तम संस्कार आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करूया !

आपणा सर्वांना आणि आपल्या परिवारास आनंद, समृद्धी, आरोग्य व भरभराटीने परिपूर्ण असे हे नवीन वर्ष लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

19/03/2026

Celebrating my 11th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

Address

Krushi Vasant
Paithan
431105

Telephone

9021836262

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Vasant Farm & Nursery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Krushi Vasant Farm & Nursery:

Shortcuts

Share

Category