27/07/2022
परीक्षा संदर्भातील प्रश्न तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू - अभाविप
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा संचालक श्री. गणेश मंझा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
विधी शाखेतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालय ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊन फक्त दहा दिवस उलटले असतानाच अचानक परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने काढलेल्या परीक्षेचे वेळापत्रकातून निदर्शनातून लक्षात येताच विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. विद्यार्थी मानसिक दबावाखाली आला आहे. तसेच दुसरी मागणी दिनांक 11/06/2022 रोजी B.Com TY. (6th sem) Advance Financial Accounting IT Subject [Coad 3041 चा पेपर झाला असून त्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रकारच्या चुका दिसून आल्या या चुकामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. या दोन मागण्या घेऊन निवेदन देण्यात आले.
समस्या
१) महाविद्यालय सुरू होऊन ६० दिवसच झाले.
आतापर्यंतचे सर्व तासिका ऑनलाईन झाले.
ऑफलाइन पद्धतीने तासिका सुरू होऊन फक्त १० दिवसच झाले.
अभ्यासक्रम पूर्ण न होताच परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
२) दिनांक 11/06/2022 रोजी B.Com TY. (6th sem) Advance Financial Accounting IT Subject [Coad 3041 चा पेपर झाला असून त्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रकारच्या चुका दिसून आल्या आहेत.
अभाविपची मागणी :-
१) विद्यार्थ्याना अभ्यासासाठी पुर्णपणे वेळ देण्यात यावा. त्यासाठी एकूण पूर्व किमान १५ दिवस वेळ देण्यात यावा.
हॉलतिकिट वेळेवर न देता,हॉलतिकिट परीक्षेच्या काही दिवस आधी देण्यात यावे.
२) दिनांक 11/06/2022 रोजी B.Com TY. (6th sem) Advance Financial Accounting IT Subject [Coad 3041 चा पेपर झाला असून त्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रकारच्या चुका दिसून आल्या या चुकामुळे विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तरी या विषयात योग्य तो निर्णय विद्यापिठाकडून घेण्यात यावा.
वरील मागण्याचे निवेदन परीक्षा संचालक यांना अभाविप कडून देण्यात आले, योग्य निर्णय न झाल्यास अभाविप तीव्र आंदोलन करेल असा इशारा अभाविप महानगर सहमंत्री ऋषिकेश केकान यांनी दिला.
यावेळी चिन्मय महाले, सुनील निगोटे व माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाचे व इतर विद्यार्थी उपस्थित होते.