Shri. G S Highschool, Pachora

Shri. G S Highschool, Pachora Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri. G S Highschool, Pachora, High School, Pachora.

23/02/2019

Guidance about Scout

20/02/2019
20/02/2019
20/02/2019

श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे आज छत्रपती शिवाजी महाराज व संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब खलील देशमुख ,शालेय समितीचे चेअरमन होते. प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था चेअरमन माननीय नानासाहेब संजय वाघ व व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही टी जोशी उपस्थित होते .याप्रसंगी सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .श्री रुपेश पाटील सर व श्री थोरात सर यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली .त्यानंतर शब्दसुमनांनी पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले . प्रास्ताविक श्री एस डी पाटील मुख्याध्यापक यांनी सादर केले .याप्रसंगी शिवजयंती का साजरी करायची ? विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे कर्तुत्व त्यांनी केलेले काम, समाजाबद्दल असलेलं प्रेम आणि नवनिर्माण करण्याची त्यांच्यात असलेली चाणाक्ष बुद्धी, त्याचबरोबर महाराजांना सदैव साथ देणारे त्यांचे मावळे , महाराजांचे साथीदार यांची ओळख व्हावी हा हेतू त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडला . त्यानंतर विद्यार्थ्यांचे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्यात . वर्गावर्गातून निवडक असे स्पर्धक निवडून त्यांना आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी देण्यात आली. आज कुठल्याही प्रकारच्या स्पर्धकांमध्ये स्पर्धा न ठेवता सर्वच विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले . ज्या विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेतर्फे प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. या विद्यार्थ्यांचे वक्तृत्व ऐकल्यानंतर महाशय चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी प्रत्येक विद्यार्थ्यास रुपये दोनशे असे बारा विद्यार्थ्यांना बक्षिसे दिलीत. अध्यक्षीय समारोपात माननीय दादासाहेब खलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . त्यांना वक्तृत्व यासंदर्भात काही सूचनाही दिल्या .त्याचबरोबर नवगिरे नावाच्या विद्यार्थ्यांनीस उत्कृष्ट वक्तृत्व केल्याबद्दल पेन बक्षीस म्हणून देण्यात आला. त्याचबरोबर नगरपालिका पाचोरा यांनी राबवलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत सहा विद्यार्थ्यांना उत्कृष्ट निबंध लिहिल्याबद्दल बक्षीस म्हणून प्रमाणपत्र व भेट देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कौंडिण्य सर यांनी केले तर आभार श्री बोरसे सर यांनी मानले .आजचा कार्यक्रम श्री आर एल पाटील यांच्या व श्रीमती पी एम वाघ सांस्कृतिक विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला . सदर कार्यक्रमास सर्व विभागातील उपमुख्याध्यापक ,पर्यवेक्षक, विभाग प्रमुख ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते . सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Address

Pachora
424201

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri. G S Highschool, Pachora posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category