भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब-Bhairavnath D.Ed.College,Kallam

  • Home
  • India
  • Osmanabad
  • भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब-Bhairavnath D.Ed.College,Kallam

भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब-Bhairavnath D.Ed.College,Kallam Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब-Bhairavnath D.Ed.College,Kallam, Education Website, Sambhajinagar Dhoki Road Kallam, Osmanabad.

भैरवनाथ अध्यापक विद्यालय(डी.एड्.) हे धाराशिव जिल्ह्यातील एक नामांकित शिक्षक प्रशिक्षण केंद्र आहे. प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गासाठी ४९.५०% व मागास प्रवर्गासाठी ४४.५०% गुण आवश्यक आहेत. प्रवेशासाठी 9881914434 या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता.

कळंब येथील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील  वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ ...
16/06/2026

कळंब येथील धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील वेद शैक्षणिक संकुलातील भैरवनाथ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (ITI) विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात कळंबच्या अप्पर तहसीलदार प्राजक्ता पाटील-साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंत्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी त्या म्हणाल्या की, "आजच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाला मोठी मागणी आहे. आयटीआयमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य अधिक विकसित केले तर त्यांना देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील."

त्यांनी विद्यार्थ्यांना आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबतचा स्वतःचा अनुभवही विद्यार्थ्यांशी शेअर केला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुशील शेळके, भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य प्रा. सतीश बबनराव मातने, आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे तसेच प्रा. सुकेशनी गव्हाणे उपस्थित होते.

प्रा. सुशील शेळके यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT सारख्या साधनांचा उपयोग करून नवीन कौशल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रा. सतीश मातने यांनी सांगितले की, "भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी कौशल्यसंपन्न असल्यामुळे त्यांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी मेहनत घ्यावी."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुरज भांडे यांनी केले. सूत्रसंचालन अविनाश म्हेत्रे यांनी केले तर आभार कवडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार शिंदे, चव्हाण, दीक्षा गायकवाड आणि विनोद कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.

"शिक्षक होण्याची इच्छा असेल तर हीच योग्य वेळ! D.El.Ed. प्रवेश सुरू आहेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा." 📚👨‍🏫 प्रवेशाकरिता...
09/06/2026

"शिक्षक होण्याची इच्छा असेल तर हीच योग्य वेळ! D.El.Ed. प्रवेश सुरू आहेत. आजच आपला प्रवेश निश्चित करा." 📚👨‍🏫

प्रवेशाकरिता संपर्क -9881914434

#अध्यापकविद्यालय #प्रवेशसुरूआहेत #शिक्षकहोऊया #कळंब #धाराशिव

सीटीईटी व टीईटी परीक्षेत प्रा.मोहिनी शिंदे यांच्यासह अजिंक्य व आदित्य हाजगुडे बंधूंचे यश; भैरवनाथ अध्यापक विद्यालयात सत्...
20/04/2026

सीटीईटी व टीईटी परीक्षेत प्रा.मोहिनी शिंदे यांच्यासह अजिंक्य व आदित्य हाजगुडे बंधूंचे यश; भैरवनाथ अध्यापक विद्यालयात सत्कार

भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेले अजिंक्य हाजगुडे व आदित्य हाजगुडे या दोन्ही बंधूंनी सीटीईटी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करत विद्यालयाचा गौरव वाढवला आहे.

नवीन नियमानुसार प्रथम वर्षातच ही परीक्षा देण्याची संधी मिळाल्यानंतर, पहिल्याच वर्षी यश मिळवणारे हे भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे द्वितीय वर्षाच्या परीक्षेनंतर शिक्षक अभिरुची व बुद्धिमत्ता चाचणी(TAIT) ही परीक्षा त्यांना देता येणार आहे.

या यशाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य सतीश मातने, आयटीआयचे प्राचार्य सुरज भांडे, प्रा. सुकेशनी गव्हाणे, प्रा.श्रीकांत पवार, प्रा. मोहिनी शिंदे, निदेशक अविनाश म्हेत्रे, राजकुमार शिंदे आणि आदित्य गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, अध्यापक विद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा. मोहिनी शिंदे यांनी देखील टीईटी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
तसेच, राहुल ढेले व प्रिती महाद्वार या विद्यार्थ्यांनीही सीटीईटी व टीईटी परीक्षेत यश मिळवून विद्यालयाची परंपरा कायम राखली आहे.

“मनुष्य घडविण्याचे खरे शिल्पकार म्हणजे व्यायाम, वाचन आणि ध्येय. या त्रिवेणी संगमातूनच एक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत...
03/10/2025

“मनुष्य घडविण्याचे खरे शिल्पकार म्हणजे व्यायाम, वाचन आणि ध्येय. या त्रिवेणी संगमातूनच एक सक्षम, सजग आणि यशस्वी व्यक्तिमत्त्व घडते,” असे प्रतिपादन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी केले.

दि. ३ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांनी वेद शैक्षणिक संकुल, कळंब येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले ⬇️
✨ “आजच्या धावत्या युगात केवळ पाठांतर पुरेसे नाही, तर कौशल्य आत्मसात करून चालू घडामोडींशी निगडित राहिले पाहिजे. ज्ञानासोबत जिद्द, शिस्त आणि ध्येय यांचा संगम साधला तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. आत्मविश्वास हा तरुणाईचे सर्वात मोठे भांडार असून, त्याचा योग्य उपयोग करून भविष्य उज्ज्वल करता येते.”

यावेळी प्राचार्य प्रा. सतिश मातने, प्रा. सुरज भांडे, प्रा. श्रीकांत पवार, प्रा. सुकेशनी गव्हाणे, प्रा. मोहिनी शिंदे, प्रा. अविनाश घोडके, अविनाश म्हेत्रे, राजकुमार शिंदे, बालाजी रामरुळे, आदित्य गायकवाड, विनोद कसबे, सोनाली ढमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

🛑 वेद शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरीकळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील स...
02/10/2025

🛑 वेद शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

कळंब – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतीश मातने सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुलात दि.२ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे व मराठी विभाग प्रमुख प्रा. श्रीकांत पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा. मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

🌍 लिंगसमभावाशिवाय समाजाचे सर्वांगीण आरोग्य अशक्य – गणमित्र फुले 🌍📍 भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंबडायट धाराशिव व मावा मुंब...
26/09/2025

🌍 लिंगसमभावाशिवाय समाजाचे सर्वांगीण आरोग्य अशक्य – गणमित्र फुले 🌍

📍 भैरवनाथ अध्यापक विद्यालय,कळंब

डायट धाराशिव व मावा मुंबई संस्थेच्या पुढाकाराने आयोजित लिंगसमभाव कार्यशाळेत मावा संस्थेचे प्रवर्तक गणमित्र फुले यांनी मार्गदर्शन करताना समाजातील विदारक वास्तवावर प्रकाश टाकला.

👉 “पुरुषप्रधान मानसिकता, स्त्रियांवरील अन्याय आणि संधींच्या असमान वाटपामुळे समाजात ताणतणाव निर्माण होतात.लिंगसमभाव जपला गेला तरच कुटुंब, शैक्षणिक संस्था आणि व्यापक समाजाची प्रगती शक्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

✨ या कार्यशाळेच्या आयोजनाला धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील यांची प्रेरणा आणि प्राचार्य सतिश मातने सरांचे मार्गदर्शन लाभले.

👩‍🏫 उपस्थित मान्यवर व शिक्षक वर्ग
मावा संस्थेचे पंकज पडोळे,प्रविण थोटे, मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, निर्देशक राजकुमार शिंदे, निर्देशक बालाजी रामरुळे,दीक्षा गायकवाड,विनोद कसबे आदी.

💡 लिंगसमभाव हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे!

#लिंगसमभाव #समानता ाराशिव #भैरवनाथविद्यालय #समाजविकास

🛑 विद्यार्थ्यांनी विचारवंत होण्याचा ध्यास घ्यावा – प्रा.श्रीकांत पवारकळंब –“आजच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्या...
25/09/2025

🛑 विद्यार्थ्यांनी विचारवंत होण्याचा ध्यास घ्यावा – प्रा.श्रीकांत पवार

कळंब –“आजच्या विद्यार्थ्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्यासारखे विचारवंत, राजकारणी व कुशल संघटनकार बनले पाहिजे,” असे प्रतिपादन भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार यांनी केले.

धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष मा.डॉ.प्रतापसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेने आणि भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांनी भूषविले.
या प्रसंगी प्रा.सुकेशनी गव्हाणे,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे,आदित्य गायकवाड,दिक्षा गायकवाड,विनोद कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले,तर आभार प्रदर्शन निदेशक अविनाश म्हेत्रे यांनी मानले.कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी व छात्राध्यापकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

👌👌👌👌👍👍👍👍

19/09/2025
🛑 स्वच्छतेतून समाज जागृतीचा आदर्श उपक्रम : डिकसळ येथे स्वच्छता पंधरवडा उत्साहातकळंब – आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरें...
19/09/2025

🛑 स्वच्छतेतून समाज जागृतीचा आदर्श उपक्रम : डिकसळ येथे स्वच्छता पंधरवडा उत्साहात

कळंब – आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब यांच्या वतीने दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी डिकसळ गावात स्वच्छता अभियान मोठ्या उत्साहात पार पडले.
या उपक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस अतिश वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

स्वच्छता उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत परिसर,हनुमान मंदिर, वस्ती,संत बोधले महाराज शाळा तसेच डिकसळ गावातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.संस्थेचे निदेशक व एकूण ६८ प्रशिक्षणार्थी उत्साहाने सहभागी झाले.

दि.२ ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिन’ म्हणून देशभर साजरा केला जातो. तसेच २०१७ पासून “स्वच्छता ही सेवा” हा उपक्रम संपूर्ण देशभर राबविला जात आहे. त्याच परंपरेनुसार याही वर्षी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट प्रशिक्षणार्थ्यांमध्ये स्वयंसेवकत्वाची जाणीव निर्माण करणे,सामाजिक बांधिलकी दृढ करणे व एकत्रित कार्य करण्याची क्षमता विकसित करणे हे होते.या निमित्ताने ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व,प्लास्टिकमुक्त गावाची गरज व पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,निदेशक अविनाश म्हेत्रे, निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक बालाजी रामरुळे आदींची उपस्थिती होती.
या यशस्वी उपक्रमाबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी व शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक करण्यात आले.

Address

Sambhajinagar Dhoki Road Kallam
Osmanabad
413507

Alerts

Be the first to know and let us send you an email when भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब-Bhairavnath D.Ed.College,Kallam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share