MpscGuider

MpscGuider Mpsc smbadhit exam chi mahiti tumchya paryant pohchavnyacha ha chotasa pryatn

03/06/2022

मेहनत मोजता येत नसते.. मोजता येतं ते फक्त अंतिमतः तुम्ही मिळवलेलं यश.. जगाला फक्त तुम्ही मिळवलेलं यश दिसणार असतं घेतलेली...
03/09/2021

मेहनत मोजता येत नसते.. मोजता येतं ते फक्त अंतिमतः तुम्ही मिळवलेलं यश.. जगाला फक्त तुम्ही मिळवलेलं यश दिसणार असतं घेतलेली मेहनत नाही.. त्यामुळे मेहनतीचं व्यावहारिक भाषेतील यशात रूपांतर करणं हे प्रत्यक्ष मेहनत घेण्याइतकच किंबहुना त्यापेक्षाही थोडं जास्तच महत्त्वाचं ठरतं.😌
# संयुक्त पूर्व परीक्षा 2021 साठी सर्वांना प्रेमळ शुभेच्छा.👏🏻
❤️💚🖤

15/08/2021
मराठीतून UPSC ची तयारी करताना विद्यार्थ्यांना निरनिराळे प्रश्न असतात. यातल्या महत्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेताना चाणक्य...
18/10/2020

मराठीतून UPSC ची तयारी करताना विद्यार्थ्यांना निरनिराळे प्रश्न असतात. यातल्या महत्वाच्या प्रश्नांचा मागोवा घेताना चाणक्य मंडल परिवार चे फॅकल्टि IPS सुभ्रमण्य केळकर (AIR 497)
पाहा आज (१७ ऑक्टोबर) सायंकाळी ७ वाजेपासून चाणक्य मंडल परिवार च्या यूट्यूब चॅनल वर
📌सायं. ७ वा: मराठीतून तयारी करताना येणाऱ्या अडचणी
https://youtu.be/I8Q7WIG2JAE
📌सायं. ७.१५ वा.: मुलाखत आणि मराठी
https://youtu.be/q-420HKjsk8
📌सायं. ७.३० वा.:चालू घडामोडींचा अभ्यास कसा करावा?
https://youtu.be/6NKoGBJ7M9A
📌सायं. ७.४५ वा.: Plan B असावा की नसावा?
https://youtu.be/bI0qXrS-saI
📌सायं. ८.00 वा. MPSC आणि UPSC चा अभ्यास एकत्र करावा का?
https://youtu.be/CUYZEMHguXE
✨Updates मिळत राहण्यासाठी आत्ताच channel ला subscribe करून ठेवा.
चाणक्य मंडल परिवार च्या UPSC च्या बॅचेस नुकत्याच सुरू झाल्या आहेत. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि प्रवेश मिळवण्यासंबंधी संपर्क करा : 9850891383, 9850089788, 9850089373

🧩🧩मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’🧩🧩👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇⚜भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर...
20/08/2020

🧩🧩मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’🧩🧩

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

⚜भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे.

🅾ठळक बाबी...

⚜नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.हा प्रकल्प जिरीबाम-तुपुल-इंफाळ BG लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.

🅾भारतीय रेल्वे विषयी....

⚜भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो.

⚜भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

⚜भारतात पहिली रेलगाडी 22 डिसेंबर 1951 रोजी रूडकीमध्ये बांधकाम साहित्याच्या वहनासाठी चालवण्यात आली. त्यानंतर 22 एप्रिल 1853 रोजी भारतात पहिली प्रवासी रेल्वेगाडी बोरीबंदर (मुंबई) ते ठाणे अशी 34 किलोमीटर अंतर धावली. साहिब, सिंध आणि सुलतान अशी नावे असलेल्या तीन वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीला खेचले गेले होते.

⚜1951 साली झालेल्या राष्ट्रीयीकरणानंतर, सहा रेल्वे विभागांमध्ये (झोन) त्यांची विभागणी करण्यात आली. यानुसार हैदराबादची निझाम रेल्वे, ग्वाल्हेरची सिंदिया रेल्वे आणि घोलपूर रेल्वे यांची मिळून 'मध्य रेल' असा विभाग बनवला. 'बॉम्बे बरोडा अ‍ॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे', सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे आणि जयपूर रेल्वे यांना एकत्र करून 'पश्चिम रेल्वे' विभाग बनवण्यात आला. उत्तर रेल्वे ही 'ईस्टर्न पंजाब रेल्वे' व जोधपूर रेल्वे, बिकानेर रेल्वे यांना मिळून बनवण्यात आली. अवध, आसाम, तिरहुत या रेल्वे कंपन्यांच्या एकत्रीकरणातून ईशान्य रेल्वे (उत्तर-पूर्व रेल) याची स्थापना झाली. 'पूर्व रेल'मध्ये बंगाल-नागपूर रेल्वे आणि 'ईस्ट इंडिया रेल्वे कंपनी' यांचा समावेश होता.

⚜वर्तमानात व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे 16 विभाग करण्यात आले आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा दिला गेला आहे.

Join -
23/04/2020

Join -

Address

Osmanabad
413501

Opening Hours

Monday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MpscGuider posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category