SSJP College Of Agriculture, Alani-Gadpati,Nh-52, Osmanabad

SSJP College Of Agriculture, Alani-Gadpati,Nh-52, Osmanabad college of Agriculture.
& Quality education

**कृषी महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड**वी. पी. शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालय येथ...
18/04/2026

**कृषी महाविद्यालयातील पंधरा विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्यू मध्ये निवड**
वी. पी. शैक्षणिक संकुलातील कृषी महाविद्यालय येथे दिनांक १७ एप्रिल रोजी आयडियल ऍग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड (Ideal Agro Search Pvt. Ltd.) या कंपनीचा कॅम्पस इंटरव्यू कार्यक्रम पार पडला. सदर निवड प्रक्रियेमध्ये महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांमधून अंतिम १३ विद्यार्थ्यांची निवड कंपनीच्या निवड समितीने केली. आयडियल ऍग्री सर्च प्रा.ली. ही कंपनी पिकांच्या आरोग्य आणि उत्पादनवाढीसाठी विविध प्रकारचे कृषी इनपुट्स उपलब्ध करून देते. कंपनी विशेषतः जैवखते, सूक्ष्मअन्नद्रव्ये, वनस्पती वाढ नियंत्रक, आणि पाण्यातील विद्रव्य खते इ. उत्पादने आधारित अग्रगण्य कंपनी असून खत निर्मिती मध्ये मोलाची कामगिरी बजावत आहे. सध्याच्या बेरोजगारीच्या काळामध्ये महाविद्यालयाच्या अथक पाठपुराव्यातून आयडियल ऍग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू साठी आमंत्रित करण्यात आले होते कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये सांगुळे संकेत, माळी ज्ञानेश्वर, मदने सौरभ, अनुभूले अभिषेक, घेवारे अजय, घुगे अभिजित, शेंडगे अनिकेत, साखरे प्रतिक्षा, जाधव दिप्ती, पाठक राजश्री, गंजे सरिता, मस्के मस्के प्रतीक्षा आणि भक्ती चौधरी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सदरील निवड झालेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांच्या कंपनीच्या कार्यक्षेत्रात कंपनीचे कृषी संलग्न काम पाहणार आहेत. तसेच मागील मागील आठवड्यामध्ये आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या कॅम्पस इंटरव्यू मध्ये वाघ वैष्णवी आणि काळे अभिनव या या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी एक सक्षम रोजगार मिळवून देण्याचा उत्तम प्रयत्न महाविद्यालयाने सदरील उपक्रमातून दर्शविला आहे.
कॅम्पस इंटरव्ह्यू मधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील आणि श्री. करण पाटील यांनी अभिनंदन केले तसेच भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
भविष्यामध्ये कृषी क्षेत्रातील विविध नामांकित कंपन्या तसेच कृषी आधारित उद्योग यामध्ये महाविद्यालयाचे जास्तीत जास्त विद्यार्थी कसे निवडले जातील यासाठी जास्तीत जास्त कृषी औद्योगिक कंपन्यांना कॅम्पस प्लेसमेंट साठी आमंत्रित करण्याचे त्यांनी आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.
सदरील कॅम्पस प्लेसमेंट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिसिंह पाटील, महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्राध्यापक हरी घाडगे, प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. शेख मोहसीन, डॉ. गांधले अमित, डॉ. इंगळे रोहित, डॉ. खोसे प्रताप, प्रा. सुमिथा पाटील, प्रा. दळवे सतेश, प्रा. डोके आकाश, प्रा. माळी प्रवीण, प्रा. शेटे देवानंद, प्रा. भालेकर सुनील, प्रा. शिंदे अक्षय, प्रा. मुंडे नवनाथ, प्रा. गोटे प्रिया, प्रा. मगर प्रगती, प्रा. नागरगोजे विजय, श्री. सुतार रामचंद्र, श्री. मुजावर गुलाब, श्री.गिरी ओंकार यांनी मोलाची भूमिका बजावली

✍️ अंतर महाविद्यालयीन कृषी युवक महोत्सव 2024 यामध्ये विविध सहभागात कृषी महाविद्यालय आळणी ( गडपाटी) धाराशिव यास पाच पारित...
28/10/2024

✍️ अंतर महाविद्यालयीन कृषी युवक महोत्सव 2024 यामध्ये विविध सहभागात कृषी महाविद्यालय आळणी ( गडपाटी) धाराशिव यास पाच पारितोषिक मिळाल्याबद्दल सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांचे गुणगौरव व मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे हार्दिक अभिनंदन....💐

**व्ही. पी. कॅम्पस मध्ये नवगतांचे स्वागत**व्ही.पी. कॅम्पस मधील कृषी महाविद्यालयामध्ये दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी शैक्ष...
03/10/2024

**व्ही. पी. कॅम्पस मध्ये नवगतांचे स्वागत**
व्ही.पी. कॅम्पस मधील कृषी महाविद्यालयामध्ये दिनांक ०१ ऑक्टोंबर २०२४ रोजी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ मध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमासाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील हे अध्यक्ष म्हणून लाभले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून धाराशिव शहरातील डॉ.लक्ष्मी स्वामी, डॉ. स्वामी टी. वाय. श्री. अक्षय ढोबळे, श्री. निखिल पाटील, श्री. आशिष पवार आणि पोलिस उपनिरीक्षक श्रीमती गीता हाके
इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना मान्यवरांनी कृषी क्षेत्र व भारताच्या आर्थिक दडणघडणीमध्ये कृषी क्षेत्राचे असलेले योगदान याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांकडून कृषी क्षेत्रामध्ये काही चांगले बदल होतील अशी अपेक्षा व्यक्त केली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी चालू तंत्रज्ञान व बदलत्या जीवनशैलीनुसार विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी योग्य ते प्रयत्न करावे व स्वतःबरोबरच आपल्या पालकांचे तसेच महाविद्यालयाचे नाव उंच व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी प्राची देवकते व विद्यार्थी करण ढगे यांनी उत्तमरीत्या पार पाडले सूत्रसंचालनाचे दिग्दर्शन करण्यासाठी प्रा. सुतार एन.एस. यांचे साह्य लाभले तसेच प्रा. डॉ. गांधले ए. ए. यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कांतीकुमार पाटील, प्रा. पाटील एस. एन. प्रा. शेटे डी.एस. प्रा. दळवे एस. ए. प्रा. माळी पी. पी. प्रा. शिंदे ए. एस., प्रा. भालेकर एस. व्ही., प्रा. सोन्ने ए. एस. प्रा.दळवी व्ही.एम., प्रा. शेख एम. आर. प्रा. खोसे पी. जे. बनसोडे, एस.एस.महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. घाडगे एच. एस. तसेच कांबळे ए.बी., श्री. महबूब मुजावर, श्री. रामचंद्र सुतार, श्रीमती कोरे मावशी, श्री. संदीप वीर, श्री. आकाश गिरी आणि तृतीय सत्रातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Freshers party 24-25
30/09/2024

Freshers party 24-25

दीक्षारंभ प्रथम वर्ष-२४-२५
25/09/2024

दीक्षारंभ प्रथम वर्ष-२४-२५

Contact-9421691289.  9807251111 ADMISSIONS OPEN 2024.https://www.collegeofagriculturealni.com/College Code-11300नामांकित...
28/08/2024

Contact-9421691289. 9807251111
ADMISSIONS OPEN 2024.
https://www.collegeofagriculturealni.com/
College Code-11300
नामांकित कृषी महाविद्यालय.
100% Placements.

College of Agriculture Alani (Gadpati)NH-52,Chatrapati Sambhajinager Road,Dharashiv.(Osmanabad)

#निसर्गप्रेमी

प्रवेश देणे सुरू -शैक्षणिक वर्ष-2024-25
04/06/2024

प्रवेश देणे सुरू -शैक्षणिक वर्ष-2024-25

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूलात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. यावेळी धनेश्वरी...
17/09/2023

आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकूलात ध्वजारोहन कार्यक्रम पार पडला. यावेळी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले.यावेळी आर.पी.कॉलेज ऑफ फॉर्मसीचे प्राचार्य डॉ. गाजी शेख,कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने,एस.पी.पॉलिटेक्निकचे प्राचार्य अमर कवडे,अध्यापक महाविद्यालयाचे प्रा.ऋषिकेश लोमटे,डी.फार्मसी विभागप्रमुख सुबोध कांबळे,कृषी महाविद्यालय व्यवस्थापक हरि घाडगे, आय.टी.आय.व्यवस्थापक दत्तात्रय घावटे,वरिष्ठ लिपिक बालाजी मुंडे,रोखपाल योगेश मंडलिक यांच्यासह विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या  प्रवेश फॉर्म भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ अंतिम दिनांक. 20-7-2023
17/07/2023

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश फॉर्म भरण्यास दुसऱ्यांदा मुदतवाढ अंतिम दिनांक. 20-7-2023

माझा एक दिवस - माझ्या बळीराजासाठी..कृषी महाविद्यालय आळणी - धाराशिव येथील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांनी आपला ...
28/06/2023

माझा एक दिवस - माझ्या बळीराजासाठी..
कृषी महाविद्यालय आळणी - धाराशिव येथील प्राध्यापक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी यांनी आपला एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.

Address

NH-52, Sambhaji Nagar Road (Gadpati), Dharashiv
Osmanabad
413501

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+919421691289

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSJP College Of Agriculture, Alani-Gadpati,Nh-52, Osmanabad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to SSJP College Of Agriculture, Alani-Gadpati,Nh-52, Osmanabad:

Shortcuts

Share

Category