दिव्यांग सेवक तानाजी घोडके

  • Home
  • India
  • Osmanabad
  • दिव्यांग सेवक तानाजी घोडके

दिव्यांग सेवक तानाजी घोडके Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from दिव्यांग सेवक तानाजी घोडके, Educational consultant, paranda, Osmanabad.

संस्थापक अध्यक्ष :-ज्ञानेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ देऊळगाव
अध्यक्ष :- दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य
संचालक :- डी आय आय टी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परांडा
संपादक :-माझं गांव माझं शहर(ई न्यूज)

21/09/2026

‘सेवा संकल्प अभियानातून शासकीय सेवा नागरिकांच्या दारी

जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम ; विविध दाखले, नोंदींसह महत्त्वाच्या सेवा गावपातळीवर धाराशिव दि.२१ सप्टेंबर (माझं गांव माझं शहर) शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध विभागांच्या समन्वयातून सेवा शिबिरे घेऊन पात्र लाभार्थ्यांना आवश्यक सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे....

21/09/2026

खो-खो तालुकास्तरीय स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचा दबदबा

१४ वर्षे वयोगटाचा संघ उपविजेता; १७ वर्षे वयोगटातील मुलींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखात निवड परंडा, दि. २१ सप्टेंबर : येथील महात्मा गांधी विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मुलींच्या तालुकास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. १४ वर्षे वयोगटातील संघाने उपविजेतेपद पटकावले, तर १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद मिळविले. या कामगिरीच्या जोरावर १७ वर्षे वयोगटातील संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे....

21/09/2026

कळंब विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ॲड. आनंद फाटक; उपाध्यक्षपदी ॲड. अमर पायाळ; महिला उपाध्यक्षपदी ॲड. किरण गालफाडे

कळंब : कळंब विधीज्ञ मंडळाच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीची निवडणूक सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. आनंद केशवराव फाटक यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी ॲड. अमर पायाळ, तर महिला उपाध्यक्षपदी ॲड. किरण गालफाडे यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत सचिवपदी ॲड. कुणाल डिकले, तर कोषाध्यक्षपदी ॲड. दत्तात्रय कवडे यांची निवड झाली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कळंब विधीज्ञ मंडळातील सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या....

21/09/2026

दुष्काळाच्या मागणीच्या मोर्चात आमदार प्रवीण स्वामींवर सोयाबीन फेकले; शेतकऱ्यांचा संताप

लोहारा : लोहारा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर-बैलगाडी मोर्चादरम्यान ठाकरे गटाचे उमरगा-लोहारा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलनादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी आमदार स्वामी यांच्या दिशेने वाळलेले सोयाबीन फेकल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. लोहारा तालुक्यात पावसाचे प्रमाण आणि पर्जन्यमानासंदर्भात महसूल मंडळांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालावर शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे....

21/09/2026

रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भूममध्ये सामाजिक उपक्रम; ५६ गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलींचे वाटप

भूम : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेतृत्व अक्षय (अक्की) बर्वे यांच्या वतीने भूम येथे ५६ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. यासोबतच ‘खेळात रंगली पैठणी’ या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ये-जा करताना होणारा त्रास कमी व्हावा आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात मदत व्हावी, या उद्देशाने सायकल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला....

21/09/2026

धाराशिव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांत २८ सप्टेंबरला ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करा

माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन परंडा, प्रतिनिधी : नागरिकांना माहितीच्या अधिकाराबाबत अधिकाधिक जागरूक करण्यासाठी तसेच शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविण्याच्या उद्देशाने धाराशिव जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये २८ सप्टेंबर रोजी ‘माहिती अधिकार दिन’ साजरा करण्यात यावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघ, परंडा यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी परंडा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती मिळवून देणारा महत्त्वाचा कायदा आहे....

21/09/2026

दुर्मिळ नाणी, मुद्रांक अन् विदेशी चलनाने सजले हंसराज गणेश मंडळाचे प्रदर्शन

इतिहास, संस्कृती आणि संग्रहाचा अनोखा ठेवा पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गर्दी परंडा : शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने सोमवारी (दि. २१) मुद्रांक, पुरातन नाणी, टपाल तिकिटे तसेच विविध देशांतील चलनांच्या संग्रहाचे प्रदर्शन व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला विद्यार्थी, इतिहासप्रेमी, नागरिक व गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनाचे उद्घाटन युवा नेते विश्वजीत पाटील व प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले....

कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीरकळंब : कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची नि...
21/09/2026

कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर

कळंब : कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. फोटोग्राफर बांधवांच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्यासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत अध्यक्षपदी पांडुरंग गव्हाणे, उपाध्यक्षपदी प्रीतम डिकले, सचिवपदी संतोष कोठावळे, कोषाध्यक्षपदी दयानंद शिंदे, संघटकपदी आर. आर. गर्जे तर सल्लागारपदी रणजित मडके यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ फोटोग्राफर शिंदे मामा, बालाजी बाहेती, गजानन तोडकर, हरीश पवार, अश्रूबा शेवते, श्रीकांत खापे, संतोष घुले, हज्जू अरब,वसीम सय्यद, सतीश अडसूळ तसेच कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे सर्व सदस्य फोटोग्राफर उपस्थित होते....

कळंब : कळंब तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. फोटोग्राफर बांधवांच्या संघटनात...

कळंब नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टी च्या नगरसेवकांची मांजरा धरणावर भेट. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा.कळंब...
21/09/2026

कळंब नगर परिषदेच्या भारतीय जनता पार्टी च्या नगरसेवकांची मांजरा धरणावर भेट. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा.

कळंब : प्रतिनिधीकळंब नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत विषय क्रमांक २० वर चर्चा होणार आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार कळंब नगर परिषदेतील भाजपच्या नगरसेवक व नगरसेविकांनी रविवारी मांजरा धरणाला भेट देत पाणीस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी शिष्टमंडळाने प्रकल्प अभियंता विकास ठोंबरे तसेच पाणीपुरवठा कर्मचारी भैरवनाथ राखूंडे यांच्याशी चर्चा करून धरणातील उपलब्ध पाणीसाठा, पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि आगामी काळातील संभाव्य परिस्थितीची माहिती जाणून घेतली....

कळंब : प्रतिनिधीकळंब नगर परिषदेच्या आगामी सर्वसाधारण सभेत संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाय.....

हंसराज गणेश मंडळाच्या महाआरोग्य शिबिरात २५१ जणांची तपासणीजिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; मंडळा...
21/09/2026

हंसराज गणेश मंडळाच्या महाआरोग्य शिबिरात २५१ जणांची तपासणी

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक परंडा : प्रतिनिधी तानाजी घोडके परंडा शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळख असलेल्या हंसराज गणेश मंडळाच्या वतीने मंडळाच्या ६० व्या वर्षानिमित्त रविवार (दि. २०) मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सर्वरोग निदान तसेच नेत्ररोग तपासणी करण्यात आली असून तब्बल २५१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा …...

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते उद्घाटन; मंडळाच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक

Address

Paranda
Osmanabad
413502

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918308118788

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिव्यांग सेवक तानाजी घोडके posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to दिव्यांग सेवक तानाजी घोडके:

Shortcuts

Share